
Tata Punch EV : भारतातील आघाडीची वाहन तयार करणारी कंपनी Tata Motors ने आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रिक मायक्रो-SUV Tata Punch EV फेसलिफ्टची डिलिव्हरी देशात सुरू केली आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये लॉन्च झालेल्या या अपडेटेड मॉडेलमध्ये आकर्षक डिझाइन, जास्त रेंज आणि अनेक आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत.
बजेटमध्ये इलेक्ट्रिक कार खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी ही कार एक चांगला पर्याय ठरू शकते. नवीन Tata Punch EV फेसलिफ्टच्या फ्रंट डिझाइनमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. जुन्या मॉडेलमध्ये असलेली काळ्या रंगाची पट्टी काढून टाकून आता बॉडी कलर पॅनलमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे कारचा लुक अधिक आधुनिक आणि ‘फ्युचरिस्टिक’ दिसत आहे. याशिवाय हेडलाइट्सची जागाही बदलण्यात आली आहे. नवीन कनेक्टेड DRLs मुळे या कारचा लुक Tata Nexon EV आणि Tata Harrier EV सारखा दिसत आहे.
दोन बॅटरीचे पर्याय
Tata Motors ने या कारमध्ये दोन वेगवेगळे बॅटरी पर्याय दिले आहेत. 30 kWh बॅटरी पॅक असणारी कार ही दोन शहरात वापरासाठी योग्य आहे. 40 kWh बॅटरी पॅक ही कार लांब प्रवासासाठी अधिक उपयुक्त आहे. कंपनीच्या दाव्यानुसार मोठ्या बॅटरी पॅकसह ही कार एका पूर्ण चार्जमध्ये सुमारे 468 किमीपर्यंत रेंज देऊ शकते. फास्ट चार्जिंगची सुविधा देखील यात आहे. 65 kW फास्ट चार्जर वापरल्यास ही कार फक्त 26 मिनिटांत 20% ते 80% पर्यंत चार्ज होऊ शकते.
फीचर्स आणि किंमत
कारच्या आतील भागातही अनेक अपडेट्स देण्यात आले आहेत. यात 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम. डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. नवीन दोन-स्पोक स्टीयरिंग व्हील. इल्यूमिनेटेड लोगो. याशिवाय ग्राहकांना व्हेंटिलेटेड सीट्स, कूल्ड ग्लोव्हबॉक्स आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलसारखे प्रीमियम फीचर्स देखील मिळतात.
सुरक्षेच्या दृष्टीनेही या कारमध्ये अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. 6 एअरबॅग्स. 360-डिग्री कॅमेरा. हिल होल्ड असिस्ट. इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम. हे फीचर्स विशेषतः डोंगराळ भागात किंवा अवघड रस्त्यांवर गाडी चालवताना अधिक सुरक्षितता देतात. नवीन Tata Punch EV फेसलिफ्टची सुरुवातीची किंमत 9.69 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.