Tata Tigor iCNG : टाटा टिगोर आयसीएनजीची नवी कार, परवडणाऱ्या कारची किंमत आणि फीचर्स जाणून घ्या…

| Updated on: Aug 09, 2022 | 2:04 PM

Tata Tigor iCNG : टिगोरच्‍या 75 टक्‍क्‍यांहून अधिक ग्राहक बुकिंग्‍ज आयसीएनजी व्‍हेरिएण्‍टसाठी केल्‍या जात आहेत, ज्‍यामधून टिगोर पोर्टफोलिओमधील या तंत्रज्ञानाची प्रबळ मागणी दिसून येते. याविषयी तुम्ही अधिक जाणून घ्या..

Tata Tigor iCNG : टाटा टिगोर आयसीएनजीची नवी कार, परवडणाऱ्या कारची किंमत आणि फीचर्स जाणून घ्या...
टाटा टिगोर आयसीएनजीची नवी कार
Image Credit source: S
Follow us on

नवी मुंबई : आपल्‍या आयसीएनजी (Tata Tigor iCNG) तंत्रज्ञानाच्‍या यशाला अधिक पुढे घेऊन जात आणि श्रेणी विस्‍तारित करत टाटा मोटर्स या भारतातील (India) आघाडीच्‍या ऑटोमोटिव्‍ह ब्रॅण्‍डने आज रूपये 7,39,900 लाख (एक्‍स-शोरूम किंमत, दिल्‍ली) या आकर्षक किंमतीमध्‍ये टिगोर एक्‍सएम आयसीएनजी व्‍हेरिएण्‍ट लॉन्‍च केली. यंदा वर्षाच्‍या सुरूवातीला सादर करण्‍यात आलेल्‍या उत्‍पादनांच्‍या आयसीएनजी श्रेणीला अल्‍पावधीतच अद्भुत प्रतिसाद मिळाला आहे. ज्‍यामुळे सीएनजीमध्‍ये (CNG) बदल करू पाहणा-या अनेक ग्राहकांसाठी ती पसंतीची वेईकल बनली आहे. ड्रायव्हिंग क्षमता, सुरक्षितता व सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांसाठी प्रशंसा करण्‍यात आलेल्‍या टाटा मोटर्सच्‍या आयसीएनजी तंत्रज्ञानाने आपली छाप निर्माण केली आहे, ज्‍यामुळे टियागो व टिगोरच्‍या विक्रीला त्‍यांच्‍या संबंधित विभागांमध्‍ये चालना मिळाली आहे. कंपनीच्‍या आयसीएनजी तंत्रज्ञानाच्‍या 4 आधारस्‍तंभांवर आधारित ही नवीन व्‍हेरिएण्‍ट टिगोर आयसीएनजीसाठी एण्‍ट्री-लेव्‍हल ट्रिम बनेल आणि अनेक सुरक्षितता व सोईस्‍कर वैशिष्‍ट्यांसह ऑफर करण्‍यात येईल.

या लाँचबाबत बोलताना टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स लि.चे सेल्‍स, मार्केटिंग व कस्‍टमर केअरचे उपाध्‍यक्ष राजन अम्‍बा म्‍हणाले, ”टिगोर आमच्‍यासाठी अत्‍यंत विशेष उत्‍पादन राहिली आहे आणि आयसीएनजी व्‍हेरिएण्‍टच्‍या समावेशामुळे विभागातील आमची गती अधिक वाढली आहे. सध्‍या टिगोरच्‍या 75 टक्‍क्‍यांहून अधिक ग्राहक बुकिंग्‍ज आयसीएनजी व्‍हेरिएण्‍टसाठी केल्‍या जात आहेत, ज्‍यामधून टिगोर पोर्टफोलिओमधील या तंत्रज्ञानाची प्रबळ मागणी दिसून येते. टिगोर आयसीएनजीची वाढती लोकप्रियता आणि आमच्‍या न्‍यू फॉरेव्‍हर ब्रॅण्‍ड तत्त्वाशी बांधील राहत नवीन टिगोर एक्‍सएम आयसीएनजी आम्‍हाला एण्‍ट्री लेव्‍हल ट्रिमसह आमच्‍या आयसीएनजी तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्‍याची इच्‍छा असलेल्‍या ग्राहकांच्‍या नवीन समूहाच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यास मदत करेल. मला विश्‍वास आहे की, हे समावेशन या विभागातील, तसेच सीएनजी क्षेत्रातील आमच्‍या विकासाला अधिक गती देईल.”

टाटा मोटर्सला दर महिन्‍याला त्‍यांच्‍या एकूण प्रवासी वाहन विक्री आकारमानांमध्‍ये उच्‍च वाढ होताना दिसत आहे. टिगोरने देखील तिच्‍या विभागामधील 21 टक्‍के बाजारपेठ हिस्‍सासह देशातील दुसरी सर्वाधिक विक्री होणारी सेदान बनत या प्रवासामध्‍ये योगदान दिले आहे. टिगोर ही भारतातील एकमेव सेदान आहे, जी पेट्रोल, इलेक्ट्रिक व सीएनजी पर्यायांमध्‍ये, तसेच मॅन्‍युअल व ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन्‍समध्‍ये उपलब्‍ध आहे, ज्‍यामुळे ग्राहकांच्‍या व्‍यापक गरजांची पूर्तता होत आहे. कंपनीच्‍या आयसीएनजी तंत्रज्ञानाच्‍या 4 आधारस्‍तंभांवर आधारित ही नवीन व्‍हेरिएण्‍ट टिगोर आयसीएनजीसाठी एण्‍ट्री-लेव्‍हल ट्रिम बनेल आणि अनेक सुरक्षितता व सोईस्‍कर वैशिष्‍ट्यांसह ऑफर करण्‍यात येईल.

(हेडलाईन व्यतिरीक्त सदर वृत्तातील मजकूर tv9marathi ने संपादीत केलेला नसून उपरोक्त माहिती ही सिंडीकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे.)