Tesla च्या चार इलेक्ट्रिक गाड्यांना भारतात मंजुरी, लवकरच लाँचिंग

| Updated on: Sep 01, 2021 | 9:03 AM

भारतीय कार बाजाराला ईव्ही जायंट टेस्लाच्या एंट्रीची प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षा आहे. वाहन निर्मात्या कंपनीने हे शक्य करण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

Tesla च्या चार इलेक्ट्रिक गाड्यांना भारतात मंजुरी, लवकरच लाँचिंग
Tesla Model 3
Follow us on

मुंबई : भारतीय कार बाजाराला ईव्ही जायंट टेस्लाच्या एंट्रीची प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षा आहे. वाहन निर्मात्या कंपनीने हे शक्य करण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे, कारण कंपनीला देशातील त्यांच्या चार मॉडेल्सचे उत्पादन किंवा आयात करण्यास मान्यता मिळाली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वेबसाईटवर पोस्टिंगचा संदर्भ देत, ब्लूमबर्गने नोंदवले आहे की, टेस्लाच्या चार मॉडेल्सना भारतीय रस्त्यांवर चालवण्यासाठी प्रमाणित करण्यात आले आहे. (Tesla receives approval for four models in India)

वेबसाईटवर पोस्ट केलेल्या माहितीनुसार, टेस्लाचे चार मॉडेल्स भारतीय बाजारपेठेतील सुरक्षा आणि उत्सर्जन आवश्यकतांशी जुळतात. पोस्टिंगमध्ये असे म्हटले आहे की, “चाचणी हे सुनिश्चित करते की टेस्लाचे वाहन उत्सर्जन आणि सुरक्षा तसेच रस्त्याच्या योग्यतेच्या दृष्टीने भारतीय बाजारपेठेतील आवश्यकतांशी जुळते.” टेस्ला फॅन क्लबद्वारे पूर्वी नोंदवल्याप्रमाणे, हे मॉडेल 3 आणि मॉडेल Y चे व्हेरिएंट्स आहेत.

कंपनी लवकरच कारखाना सुरू करण्याची शक्यता

टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी यापूर्वी संकेत दिले होते की, जर त्यांनी भारतातील कारखान्यात वाहने आयात केली तर त्यांना बाजाराची माहिती मिळेल. EV निर्माण करणारी कंपनी आधीच इंपोर्टेड EVs वर कर कमी करण्याची मागणी सरकारकडे करत आहेत, कारण हा कर भारतात सर्वाधिक आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, एका वायर एजन्सीद्वारे कळवण्यात आले होते की, भारत सरकारने ईव्ही उत्पादकांना स्थानिक खरेदीला गती देण्यास सांगितले आहे आणि कर कपातीच्या मागणीवर विचार करण्यापूर्वी डिटेल्ड मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्स शेयर करण्यास सांगितले आहे.

EV निर्मात्या कंपनीने केलेल्या कर कपातीच्या मागणीला देशातील इतर OEM कडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. फोक्सवॅगन आणि ह्युंडईने टेस्लाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे, तर महिंद्राने आयात शुल्काचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. टाटा मोटर्सने येथील केंद्राला सर्व इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना समान वागणूक देण्यास सांगितले आहे. परंतु ताज्या निकालांवरून असे दिसून येते की, टेस्ला आता लॉन्चिंच्या अगदी जवळ आहे.

इतर बातम्या

हॉर्नचा सूर बदलणार, भारतीय संगीत वापरलं जाणार; नितीन गडकरी यांची माहिती

कोणकोणती वाहने स्क्रॅप होणार? जाणून घ्या स्क्रॅपिंग धोरणातील निकष

मुंबई मनपाच्या ताफ्यात 5 नवी इलेक्ट्रिक वाहनं, स्वच्छ मुंबईसाठी आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत व्हिजन-2030 ऑनलाईन सर्वेक्षण सुरु

(Tesla receives approval for four models in India)