जबरदस्त मायलेज देतात या 5 बाईक, रोज ऑफिसला जाण्यासाठी एकदम बेस्ट, पैशांची मोठी बचत
Best Mileage Budget Bike: E 20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरून एकच गदारोळ उठलेला असताना मायलेजची चर्चा होत आहे. रोज ऑफिसला जाण्यासाठी आणि जवळपास जाण्यासाठी 100cc च्या या बाईक एकदम बेस्ट आहेत. यामुळे तुमच्या खिशाला झळ बसणार नाही. कोणत्या आहेत त्या बाईक?

पेट्रोलच्या वाढत्या किंमतीने हैराण झाला असाल तर रोजच्या वापरासाठी जोरदार मायलेज देणारी बाईक खरेदी करणे अत्यावश्यक ठरते. या बाईकच्या देखभालीचा खर्चही कमी झालेला असावा. 100cc सेगमेंटमधील बाईक तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. Hero, Honda आणि TVS सारख्या कंपन्या या सेगमेंटमधील बाईकची विक्री करत आहेत. या बाईक जबरदस्त मायलेज आणि दमदार परफॉर्मन्स देतात. रोज ऑफिस जाण्यासाठी ही बाईक फायदेशीर ठरू शकते.
Hero Splendor Plus
Hero Splendor Plus गेल्या काही वर्षांपासून भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईकपैकी एक आहे. यामध्ये 97.2cc इंजिन देण्यात आले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार ही बाईक 65 ते 70 kmpl पर्यंत मायलेज देते. यामध्ये i3S (Idle Stop-Start System) तंत्रज्ञान मिळते. यामुळे वाहतूक गर्दीवेळी इंजिन आपोआप बंद होते आणि इंधनाची बचत होते. कमी देखभाल खर्च आणि दमदार परफॉर्मंन्समुळे ही रोजच्या वापरासाठीची एक लोकप्रिय बाईक ठरली आहे.
Hero HF Deluxe
जर तुमचे बजेट मर्यादीत असेल आणि अधिक मायलेजची बाईक हवी असेल तर Hero HF Deluxe हा एक चांगला पर्याय आहे. कंपनीनुसार, ही बाईक जवळपास 70 kmpl पर्यंत मायलेज देते. ही वजनाला हलकी आहे. या बाईकचा देखभाल खर्च कमी आहे. ही बाईक कार्यालयात जाण्यासाठी चांगली आहे.
Honda Shine 100
Honda Shine 100 मध्ये 99.7cc Fuel Injected इंजिन देण्यात आले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही बाईक 60 ते 65 kmpl पेक्षा जास्त मायलेज देण्यात सक्षम आहे. स्मूद इंजिन, कमी व्हायब्रेशन आणि 786mm सीट हे या बाईकचे वैशिष्ट्ये आहे. गर्दीतून जाण्यासाठी ही बाईक चांगली मानली जाते.
TVS Sport
TVS Sport मध्ये 100cc सेगमेंटपेक्षा जास्त मायलेज देणार्या पर्यायांपैकी ही एक बाईक आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही बाईक 70 kmpl पेक्षा अधिक मायलेज देते. हिचे रिफाईंड इंजिन शहर आणि महामार्गासाठी एकदम चांगले आहे. यामुळे अनेक ग्राहक तिला “Mileage Champion” म्हणतात.
TVS Radeon
जर तुम्हाला चांगला मायलेजसह आरामदायक राईड आणि काही अतिरिक्त फीचर्स हवे असतील तर TVS Radeon एक चांगला पर्याय आहे. ही बाईक जवळपास 68 kmpl पर्यंतची मायलेज देते. यामध्ये USB Charging Port, Side Stand Indicator, आरामदायक सीटसारखे चांगले फीचर्स आहेत.