भारतातील ‘या’ राज्यात सर्वाधिक कार… लहान असूनही देशात पहिल्या क्रमांकावर

गोव्यासारख्या एका छोट्या राज्यामध्ये प्रत्येक दुसऱ्या घरात कार दिसून येत आहे. त्याच वेळी बिहारसारख्या मोठ्या लोकसंख्येच्या राज्यात मात्र याहून उलटे चित्र आहे. बहुतेक लोकांकडे कार नाही. भारतातील कोणत्या राज्यात किती कुटुंबांकडे कार आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

भारतातील ‘या’ राज्यात सर्वाधिक कार... लहान असूनही देशात पहिल्या क्रमांकावर
भारतातील ‘या’ राज्यात सर्वाधिक कारImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 11:49 AM

भारत (India) हा जगातील टॉप 5 कार उत्पादक आणि कार मार्केटपैकी एक आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, देशातील कोणत्या राज्यात किती कुटुंबांकडे गाड्या (cars) आहेत आणि कुठल्या राज्यात सर्वाधिक व कुठल्या राज्यात सर्वात कमी कार आहेत? भारतातील गोवा राज्य कार खरेदीच्या बाबतीत सर्वात पुढे असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी प्रत्येक दुसर्या घरात कार आहे. तर, दुसरीकडे बिहारमध्ये सर्वात कमी कुटुंबांकडे कार आहे. इंडिया इन पिक्सल (IIP) ने राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 (2019-21) च्या डेटाच्या आधारे ही मनोरंजक माहिती दिली आहे. यामध्ये प्रत्येक राज्यातील किती घरांमध्ये कार आहे, याचा संपूर्ण तपशिल आहे.

कोणत्या राज्यात किती कार?

देशातील सर्वात लहान राज्यांपैकी एक असलेल्या गोव्यात 45.2 टक्के कुटुंबांकडे कार आहे. ही भारतातील कोणत्याही राज्याची सर्वोच्च पातळी आहे. त्याच वेळी, बिहारमधील केवळ 2 टक्के घरांमध्ये कार आहे. या यादीतील टॉप-5 राज्यांवर नजर टाकली तर, केरळ दुसऱ्या क्रमांकावर आहे तिथे 24.2 टक्के कुटुंबांकडे कार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये 23.7 टक्के, हिमाचलमध्ये 22.1 टक्के आणि पंजाबमध्ये 21.9 टक्के लोकांकडे कार आहे. दुसरीकडे, जर आपण या यादीतील सर्वात खालच्या 5 राज्यांवर नजर टाकली, तर ओडिशातील 2.7 टक्के कुटुंबांमध्ये कार आहे. पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशमध्ये 2.8 टक्के, झारखंडमध्ये 4.1 टक़्के आणि छत्तीसगडमध्ये 4.3 टक़्के लोकांकडे कार आहे.

हे सुद्धा वाचा

दिल्लीत 20 टक़्के घरांमध्ये गाड्या नाहीत

दिल्लीचा कार बाजार हा भारतातील सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. येथे दरवर्षी लाखो कार विकल्या जातात. असे असूनही, दिल्लीतील केवळ 19.4 टक्के कुटुंबांकडे कार आहे. तर हरियाणात हा आकडा 15.3 टक्के, उत्तराखंडमध्ये 12.7 टक्के, गुजरातमध्ये 10.9 टक्के, कर्नाटकात 9.1 टक्के, महाराष्ट्रात 8.7 टक्के, राजस्थानमध्ये 8.2 टक्के, तामिळनाडूमध्ये 6.5 टक्के, उत्तर प्रदेशमध्ये 5.5 टक्के, मध्य प्रदेश आणि तेलंगणामध्ये 5.3 टक्के आहे.

ईशान्येकडील राज्यांची स्थिती अशी

कार खरेदीबाबत ईशान्येकडील राज्यांची स्थिती चांगली आहे. नागालँडमध्ये सर्वाधिक 21.3 टक्के कार आहेत. त्यापाठोपाठ सिक्कीम 20.9 टक्के, अरुणाचल प्रदेश 19.3 टक़्के, मणिपूर 17 टक्के, मिझोराम 15.5 टक्के, मेघालय 12.9 टक़्के, आसाम 8.1 टक़्के आणि त्रिपुरातील 4.6 टक़्के कुटुंबांकडे कार आहे.

भारतातील एकूण 7.5 टक़्के कुटुंबांकडे कार आहे. तर 2018 मध्ये केवळ 6 टक्के कुटुंबांकडे कार होती.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.