AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketaki Chitale : केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी, वादग्रस्त फेसबुक पोस्ट करणं भोवलं! आता महाराष्ट्रदर्शन?

शरद पवारांच्या विरोधात वादग्रस्त फेसबुक पोस्ट करणं केतकी चितळेला भोवलंय.

Ketaki Chitale : केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी, वादग्रस्त फेसबुक पोस्ट करणं भोवलं! आता महाराष्ट्रदर्शन?
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: May 15, 2022 | 12:00 PM
Share

मुंबई : शरद पवारांच्या विरोधात वादग्रस्त फेसबुक पोस्ट करणं अभिनेत्री केतकी चितळे हीला (Ketaki Chitale) भोवलंय. केतकी चितळे हीला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ठाणे कोर्टात (Thane Court) याप्रकरणी युक्तिवाद करण्यात आला. शनिवारी केतकी चितळे हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. विशेष म्हणजे यावेळी केतकी चितळे हीनं स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. तिच्या वतीनं कुणीही वकील कोर्टात युक्तिवाद करण्यासाठी नेमण्यात आलेला नव्हता. कोर्टात झालेल्या युक्तिवादानंतर आता केतकीला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी (Ketaki Chitale Police Custody) सुनावणी आली. शरद पवार यांच्यावर वादग्रस्त फेसबुक पोस्ट लिहिल्यानंतर केतकी चितळेच्या अडचणी वाढल्या आहेत. केतकी चितळेवर कारवाई व्हावी, या अनुशंगानं सगळ्यात आधी कळव्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. अखेर तिच्या अडचणीत वाढ झाल्याचं कोर्टानं सुनावलेल्या निर्णयानंतर स्पष्ट झालंय.

कोर्टात केतकीनं काय युक्तिवाद केला?

वकील नसल्यानं केतकी चितळेनं स्वतःच कोर्टात युक्तिवाद केला.  मला बोलण्याचं लिहिण्याचं स्वातंत्र्य नाही का? मी राजकीय व्यक्ती नाही, मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का, असा युक्तिवाद केतकी चितळेनं कोर्टात करत आपली बाजू मांडली

आता केतकीचं महाराष्ट्र दर्शन?

दरम्यान, केतकी विरोधात महाराष्ट्रभर आता तक्रारी नोंदवण्यात येणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिलाय. तिचं महाराष्ट्र दर्शन घडवून आणू, असं राष्ट्रवादी नेत्यांनी म्हटलंय. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी एकत्र येत केतकी चितळेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

पाहा लाईव्ह अपडेट :

‘वेडी आहे.. वेडी आहे…’

वेडी आहे वेडी आहे केतकी चितळे वेडी आहे, अशी घोषणाबाजी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून ठाणे कोर्टाबाहेर करण्यात आली. दरम्यान, रविवारी केतकी चितळे हिला ताब्यात घेत असताना गोंधळ उडाला होता. तिच्यावर अंडी आणि शाई फेकण्यात आलेली. त्यामुळे पोलिसांनी खबरदारी बाळगत गुप्तपणे केतकी चितळे हिला आज सकाळी ठाणे कोर्टासमोर सादर केलं. आतापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी अभिनेत्री केतकी चितळेविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

नेमकी केतकी चितळेनं केलेली पोस्ट काय होती?

Ketaki Chitale Facebook Post

केतकीची पोस्ट

सोशल मीडियात गदारोळ

अभिनेत्री केतकी चितळे हीनं केलेल्या पोस्टवरुन चर्चांना उधाण आलंय. अनेकांनी तिच्या पोस्टवर आक्षेप नोंदवलाय. दरम्यान, याआधीदेखील अनेकवेळा केतकी चितळे ही चर्चेत आली होती. वादग्रस्त पोस्ट करुन सातत्यानं चर्चेत येणाऱ्या केतकीवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.

केतकी चितळे आधी नाशिकच्या दिंडोरीमधूनही एका तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. शरद पवारांवर आक्षेपार्ह भाषेत सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी आता अनेकांवर कारवाईचा बडगा उगारला जातोय.

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड