
ऑटोक्षेत्रातील विक्रीचा आकडा पाहता गेल्या काही वर्षात एसयुव्ही गाड्या खरेदी करण्याकडे कललेला दिसत आहे. भारतीय ग्राहक एसयुव्ही गाड्यांना सर्वाधिक पसंती देत आहेत. कारण एसयुव्ही गाड्यांना ग्राउंड स्पेस जास्त आहे. उंच आणि मोठ्या दिसतात. त्यामुळे एसयुव्हीने छोट्या कार्संना विक्रीच्या यादीतून दूर लोटलं आहे. कारण भारतीय कारप्रेमींच्या मनात आता एसयुव्ही कारने घर केलं आहे. मागच्या आकडेवारी देखील असंच सांगत आहे. यात टॉप 5 कारमध्ये एसयुव्हीचा क्रमांक लागतो. या कार कोणत्या ते जाणून घ्या.
ह्युंदाई क्रेटा : जुलै महिन्यात सर्वाधिक या गाडीची मागणी पाहायला मिळाली आहे. ही ह्युंदाईची सर्वाधिक विक्री होणारी कार देखील आहे. जुलै 2025 मध्ये ह्युंदाईने 16898 युनिट्सची विक्री केली. पण कार कंपनीच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 3 टक्क्यांनी घट झाली. जुलै 2024 मध्ये ह्युंदाई क्रेटाचे 17350 युनिट्स विकले गेले होते.
मारुती ब्रेझा : मारुती सुझुकी ब्रेझा या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जुलै 2025 मध्ये 14065 युनिट्स कारची विक्री झाली. पण मागच्या वर्षीच्या तुलनेत यात 4 टक्क्यांनी घट झाली आहे. मारुती सुझुकीने जुलै 2024 मध्ये 14676 युनिट्स विकले होते.
महिंद्रा स्कॉर्पिओ : एसयुव्ही कार विक्रीच्या यादीत महिंद्रा स्कॉर्पिओ तिसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही कार कारप्रेमींच्या पसंतीस उतरली आहे. विशेष म्हणजे या कारची विक्री 12 टक्क्यांनी वाढली आहे. मागच्या वर्षी जुलै 2024 महिन्यात 12237 युनिट्सची विक्री झाली होती. यंदा ही विक्री 13747 युनिट्स झाली आहे. यात महिंद्रा स्कॉर्पिओमध्ये स्कॉर्पिओ एन आणि स्कॉर्पिओ क्लासिक या गाड्यांचा समावेश आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ ही एकमेव एसयुव्ही आहे. तर इतर क्रॉसओव्हर आहेत. स्कॉर्पिओसाठी 1 ते 3.5 महिन्यापर्यंत प्रतीक्षा कालावधी आहे.
मारुती सुझुकी फ्रॉन्क्स : ही एसयुव्ही विक्रीच्या आकडेवारीत चौथ्या स्थानावर आहे. जुलै 2025 मध्ये मारुती सुझुकी फ्रॉन्क्सने 12872 युनिट्सची विक्री नोंदवली.विशेष म्हणजे, मारुती सुझुकी फ्रॉन्क्स ही एकमेव कार अशी आहे की, वार्षिक वाढ 18 टक्के इतकी सर्वाधिक होती.
टाटा नेक्सन : टाटा नेक्सन पाचव्या स्थानावर आहे. टाटा नेक्सनने 12825 युनिट्सची विक्री केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत टाटा नेक्सनच्या विक्रीत 8 टक्क्यांनी घट झाली आहे.