AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हार्ले डेविडसनने भारतात लाँच केली क्रुझर बाइक, 1923 सीसीचं इंजिन आणि…

हार्ले डेविडसन हा मोठा ब्रँड आहे. लक्झरी बाइकसाठी हा ब्रँड ओळखला जातो. त्यामुळे तरुणाईमध्ये याबाबत कायमच उत्सुकता असते. आता हार्ले डेविडसनने भारतात पॉवरफूल क्रुझर बाइक लाँच केली आहे. चला जाणून घेऊयात या बाइकमध्ये काय आहे खास ते...

हार्ले डेविडसनने भारतात लाँच केली क्रुझर बाइक, 1923 सीसीचं इंजिन आणि...
हार्ले डेविडसनने भारतात लाँच केली क्रुझर बाइक, 1923 सीसीचं इंजिन आणि...Image Credit source: TV9 Network
| Updated on: Aug 19, 2025 | 6:45 PM
Share

हार्ले डेविडनस इंडियाने गेल्या काही वर्षात भारतीय बाजारात घट्ट पाय रोवले आहेत. आता प्रिमियम क्रुझर बाइक्सच्या रेंजला प्रोत्साहन देत 2025 स्ट्रीट बॉब लाँच केली आहे. भारतात लाँच केलेल्या या बाइकमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. यात सर्वाधिक इलेक्ट्रॉनिक फीचर्स दिले आहेत. तसेच नव्या इंजिनसह लाँच केली आहे. या बाइगमध्ये 117 सीआय इंजिन आहे. यापूर्वी हे इंजिन मोठ्या हार्ले बाइक्समध्ये दिली आहे. या बाइकचा लूक आकर्षक असून मागच्या बाइकसारखाच आहे. यात क्लासिक लाइन्स आणि लो स्टांस कायम आहे. राउंड हेडलँप, पुढे वाकलेली फ्रंट सस्पेंशन आणि मिनी एप हँगर आहे. त्यामुळे या बाइकला खऱ्या अर्थाने क्रुझर लूक येतो. नव्या बाइकला टू इन वन लाँगटेल एग्जॉस्ट पाइप दिला आहे. तर जुन्या मॉडेलमध्ये ब्लॅक फिनिश टू इन टू एग्जॉस्ट होता. या गाडीची एक्स शोरूम किंमत 18.77 लाख रुपये आहे.

इंजिन स्पेसिफिकेशन्स

या बाइकमध्ये 1923 सीसी व्ही ट्वीन एअर आणि लिक्विड कूल्ड इंजिन दिलं आहे. या इंजिनने जुन्या मिलवॉकी एट 107 सीआय मोटरची जागा घेतली आहे. या इंजिनमुळे 90 बीएचपी पॉवर 5020 आरपीएमवर आणि 156 एनएम टॉर्क 2750 आरपीएमवर मिळतो. यात 6 स्पीड गियरबॉक्स दिला आहे. पुढे 49 एमएम नॉन एडजेस्टेबल टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागे प्रीलोड एडजस्टेबल मोनोशॉक दिला आहे. बाइकला फ्रेम ट्युबलर क्रॅडल चेसिस दिली आहे. तसेच दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक्स दिले आहेत. 117सीआय इंजिन असलेल्या नवीन हार्ले बाइक्समध्ये ही सर्वात हलकी मोटरसायकल आहे.

२०२५ हार्ले डेव्हिडसन स्ट्रीट बॉब (१)

इलेक्ट्रॉनिक फीचर्स

नव्या स्ट्रीट बॉबमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक फीचर्स दिले आहेत. यात तीन रायडिंग मोड्स दिले आहेत. यात स्पोर्ट, रोड आणि रेन असे तीन पर्यात आहेत. तसेच ट्रॅक्शन कंट्रोलसाठी ड्यूल चॅनेल एबीएस विथ कॉर्नरिंग फंक्शन, क्रूझ कंट्रोल, ड्रॅग टॉर्क स्लिप कंट्रोल फीचर्स दिलं आहे. तसेच सेमी अनालॉग इंस्ट्रुमेंट क्लस्टर आणि डिजिटल रीडआऊट दिलं आहे.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.