कोरोना काळातही Maruti Suzuki चा बाजारात धुमाकूळ, एप्रिलमध्ये रेकॉर्डब्रेक विक्री

| Updated on: May 08, 2021 | 4:20 PM

विक्रीच्या बाबतीत देशात मारुती सुझुकी कंपनी आघाडीवर राहिली आहे. कारण सर्वाधिक विक्री होणार टॉप 5 वाहने मारुती सुझुकीची आहेत.

कोरोना काळातही Maruti Suzuki चा बाजारात धुमाकूळ, एप्रिलमध्ये रेकॉर्डब्रेक विक्री
Maruti Suzuki
Follow us on

मुंबई : एक वर्षापूर्वी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता, त्यामुळे वाहन उद्योगातील विक्री पूर्णपणे ठप्प झाली होती. परंतु कालांतराने सर्वकाही सुरळीत होऊ लागले आहे आणि आज ऑटोमोबाईल क्षेत्रात भरभराट पाहायला मिळत आहे. गेला महिना (एप्रिल) ऑटो इंडस्ट्रीसाठी चांगला होता. वाहनांच्या विक्रीच्या आकडेवारीवरुन ही बाब स्पष्ट होते. दरम्यान, विक्रीच्या बाबतीत देशात मारुती सुझुकी कंपनी आघाडीवर राहिली आहे. कारण सर्वाधिक विक्री होणार टॉप 5 वाहने मारुती सुझुकीची (Maruti Suzuki) आहेत. (Top 5 cars sold in India in April 2021, Maruti suzuki leads in market)

मारुती वॅगनआर (Maruti Suzuki WagonR)

मारुती वॅगनआरने बलेनो आणि स्विफ्ट सारख्या प्रीमियम हॅचबॅक कार्सना मागे टाकत विक्रीच्या बाबतीत अव्वल स्थान पटकावलं आहे. एप्रिलमध्ये मारुतीने वॅगनआरच्या एकूण 18,656 युनिट्सची विक्री केली आहे. तथापि, ही विक्री मार्चमध्ये झालेल्या विक्रीपेक्षा (18,757) कमी आहे.

मारुती स्विफ्ट (Maruti Suzuki Swift)

गेल्या काही वर्षांपासून मारुती स्विफ्ट ही भारतीय कार उद्योगातील सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. तथापि, मार्च 2021 च्या तुलनेत यावर्षी एप्रिलमध्ये स्विफ्टची विक्री सुमारे 2,600 युनिट्सने कमी झाली आहे. मार्च महिन्यात या कारच्या 21,714 युनिट्सची विक्री झाली होती. तर एप्रिल 2021 मध्ये स्विफ्टच्या 18,316 युनिट्सची विक्री झाली आहे.

मारुती ऑल्टो (Maruti Suzuki Alto)

या यादीत तिसऱ्या क्रमांकावर मारुती ऑल्टो ही कार आहे. एप्रिलमध्ये कारच्या 17,303 युनिट्सची विक्री झाली आहे. तर मार्च महिन्यात कंपनीने ऑल्टोच्या 17,401 युनिट्सची विक्री केली होती.

मारुती बलनो (Maruti Suzuki Baleno)

देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या प्रीमियम हॅचबॅक कार्समध्ये मारुती बलेनो नंबर एकवर आहे. तर सर्व प्रकारच्या कार्सच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. गेल्या महिन्यात कंपनीने बलेनोच्या एकूण 16,384 युनिट्सची विक्री केली आहे. तर कंपनीने मार्च 2021 मध्ये या कारच्या 21,217 युनिट्सची विक्री केली होती.

मारुती डिझायर (Maruti Suzuki Dezire)

मारुतीची सेडान कार असलेली डिझायर ही कार देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सच्या यादीत 5 व्या क्रमांकावर आहे. कंपनीने एप्रिल 2021 मध्ये डिझायरच्या 14,073 युनिट्सची विक्री केली आहे.

इतर बातम्या

देशात कोरोनाची दुसरी लाट, तरीही Bajaj ची घोडदौड सुरुच, एप्रिलमध्ये 3.88 लाख गाड्यांची विक्री

टाटा समूह 60 क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर्स एअरलिफ्ट करणार, देशभर 400 ऑक्सिजन प्लांट उभारणार

ऑक्सिजन कंटेनर आणि टँकर्सवर GPS Tracking Device बसवणं अनिवार्य, केंद्राचा मोठा निर्णय

(Top 5 cars sold in India in April 2021, Maruti suzuki leads in market)