Toyota ची सूर्यकिरणांद्वारे चार्ज होणारी Electric Car सादर, जाणून घ्या खास फीचर्स आणि किंमत

| Updated on: Apr 22, 2021 | 7:07 AM

जपानची आघाडीची वाहन निर्माता कंपनी टोयोटाने (Toyota Motor Corporation) आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही bZ4X चे अनावरण केले आहे.

Toyota ची सूर्यकिरणांद्वारे चार्ज होणारी Electric Car सादर, जाणून घ्या खास फीचर्स आणि किंमत
Follow us on

नवी दिल्ली : प्रदूषण आणि पेट्रोल, डिझेल यांच्या वाढत्या किंमतींमुळे लोकांचा इलेक्ट्रिक वाहनांकडे (Electric Vehicle) कल वाढत चालला आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती शंभरी पार (Petrol Price hike) गेल्या आहेत, तर काही शहरांमध्ये पेट्रोलच्या किंमती 90 रुपयांच्या पुढे आहेत. त्यामुळे 2021 मध्ये अनेक दिग्गज वाहन कंपन्या इलेक्ट्रिक व्हीकल लाँच करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वी इलेक्ट्रिक कार्सच्या बजेटमुळे लोक चिंतेत असायचे, परंतु आता तसे चित्र राहिले नाही. कार कंपन्या कमीत कमी बजेटमध्ये जास्तीत जास्त फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक कार्स, बाईक आणि स्कूटर लाँच करत आहेत. दरम्यान, टोयोटाने (Toyota) कंपनीने आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही bZ4X चे अनावरण केले आहे. विशेष म्हणजे या कारची बॅटरी सौर उर्जेद्वारे चार्ज केली जाऊ शकते. (Toyota bZ4x Electric SUV concept revealed at Auto Shanghai 2021)

जपानची आघाडीची वाहन निर्माता कंपनी टोयोटाने (Toyota Motor Corporation) आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही bZ4X चे अनावरण केले आहे. सोमवारी पार पडलेल्या 2021 शांघाय ऑटो शोमध्ये (Shanghai Auto Show 2021) कंपनीने ही एसयूव्ही सादर केली. येत्या 5 वर्षात ते 15 नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. ही bZ4X इलेक्ट्रिक एसयूव्ही e-TNGA प्लॅटफॉर्मवर तयार केली गेली आहे. कंपनीने हा प्लॅटफॉर्म केवळ इलेक्ट्रिक वाहनांसाठी तयार केला आहे. हा प्लॅटफॉर्म वापरुन, कंपनी वेगवेगळ्या आकार आणि किंमतीच्या कार तयार करण्यास सक्षम असेल आणि प्रत्येक श्रेणीच्या ग्राहकांपर्यंत पोहोचू शकेल.

खास फीचर्स

शांघाय ऑटो शोमध्ये सादर केलेल्या या एसयूव्हीमध्ये काही खास फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये सामान्य स्टीयरिंग व्हीलऐवजी डिस्टिंक्टिव्ह योकचा वापर केला आहे. या कारची बॅटरी सौर उर्जेद्वारे चार्ज केली जाऊ शकते. म्हणजेच ही कार सूर्याच्या किरणांसह चार्ज केली जाईल. या कारची ही वैशिष्ट्ये उर्वरित इलेक्ट्रिक कार्सच्या तुलनेत उत्कृष्ट असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ही कार 2022 च्या मध्यात बाजारात विक्रीसाठी सादर केली जाऊ शकते.

झिरो एमिशन कार

टोयोटाचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी Masahiko Maeda यांनी सोमवारी सांगितले की, कंपनीची 2025 पर्यंत 15 इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची योजना आहे. या योजनेंतर्गत कंपनी “bz” सिरीजच्या 7 गाड्यांचे वेगवेगळे मॉडेल्स बाजारात सादर करणार आहे. कंपनीची bZ4X इलेक्ट्रिक एसयूव्ही ही “bZ” सिरीजअंतर्गत लाँच होणारी पहिली कार असेल. “bz” सिरीज म्हणजे ‘बियाँड झिरो’ म्हणजेच झिरो एमिशनवाली (शून्य उत्सर्जन) कार.

‘टेस्ला’शी स्पर्धा

टेस्ला (Tesla) कंपनीच्या इलेक्ट्रिक कार्सची चर्चा भारतात मोठ्या प्रमाणात सुरु आहे. कंपनी भारतात इलेक्ट्रिक वाहनांच उत्पादन करणार आहे. त्यामुळे देशातील लोकांचं इलेक्ट्रिक वाहनांकडे लक्ष वेधलं आहे. अशा परिस्थितीत टोयोटाच्या इलेक्ट्रिक कारला टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारशी टक्कर द्यावी लागणार आहे.

संबंधित बातम्या

येत्या काळात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीत भारत पहिल्या क्रमांकावर असेल; गडकरींना विश्वास

इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्याचं टेन्शन खल्लास, मुंबईत 10 नवे चार्जिंग स्टेशन्स सुरु

Tesla ने त्वरित भारतात उत्पादन सुरु करावं, अन्यथा… नितीन गडकरींचा सल्लावजा इशारा

(Toyota bZ4x Electric SUV concept revealed at Auto Shanghai 2021)