AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्याचं टेन्शन खल्लास, मुंबईत 10 नवे चार्जिंग स्टेशन्स सुरु

अ‍ॅथर एनर्जीकडून मुंबईत फास्ट चार्जिंग पब्लिक नेटवर्कची सुरूवात करण्यात आली आहे. कंपनीने आता अ‍ॅथर ग्रीडची मुंबईत सुरूवात केली आहे.

इलेक्ट्रिक वाहन चार्ज करण्याचं टेन्शन खल्लास, मुंबईत 10 नवे चार्जिंग स्टेशन्स सुरु
| Updated on: Apr 17, 2021 | 6:18 PM
Share

मुंबई : अ‍ॅथर एनर्जीने (Ather Energy) अ‍ॅथर 450 एक्स (Ather 450X) आणि 450 एक्स सीरिज 1 (450X Series 1) इलेक्ट्रिक स्कूटरची मुंबईत अधिकृतपणे डिलीव्हरी सुरु केली आहे. त्यानंतर आता अ‍ॅथर एनर्जीकडून मुंबईत फास्ट चार्जिंग पब्लिक नेटवर्कची सुरूवात करण्यात आली आहे. कंपनीने आता अ‍ॅथर ग्रीडची मुंबईत सुरूवात केली आहे. मुंबईतील 10 विविध ‍अशा हॉट स्पॉट्स वर म्हणजेच लिंकिंग रोड, गोरेगाव, अंधेरी, फोर्ट इत्यादी ठिकाणी ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. (Ather Grid fast charging network now active across 10 locations in Mumbai)

पुढील वर्षी अ‍ॅथर एनर्जीकडून मुंबईतील विविध ठिकाणी 30 फास्ट चार्जिंग पॉईंट्स सुरु करण्यात येणार आहेत. या करता अ‍ॅथर एनर्जीने पार्क+ बरोबर भागीदारी केली असून त्यांच्या कडून मुंबईत इव्ही लोकेशन्स सुरु करण्यात येणार आहेत. पार्क+ हा स्मार्ट पार्किंग सोल्युशन्स प्रदाता ब्रॅन्ड असून यामध्ये युजर्सना पार्किंग शोधणे, स्लॉट बुक करणे आणि डिजिटली पैसे देणे, अशा सुविधा प्रदान केल्या जातात. अ‍ॅथर एनर्जीकडून सातत्याने अधिक प्रगतीशील अशा कंपन्यांबरोबर करार केले जाणार असून यामुळे ईव्ही मालकांना सोप्या पध्दतीने मुंबईत ईव्ही वापरणे शक्य होणार आहे. अ‍ॅथर एनर्जीकडून सहकारी गृहनिर्माण संस्था आणि ओनर्स असोसिएशन्स बरोबरही सहकार्य करार केले जाणार असून त्याअंतर्गत अ‍ॅथरचे मालक हे त्यांच्या बिल्डिंग आणि अपार्टमेंट्समध्ये होम चार्जिंग सुविधा सुरू करु शकतील.

अ‍ॅथर एनर्जीकडून भारतातील 18 शहरांमध्ये 128 पब्लिक चार्जिंग पॉईंट्सची सुरुवात केली आहे. फास्ट चार्जिंग नेटवर्क चा उपयोग हा भारतातील सर्व इलेक्ट्रिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांकडून केला जाऊ शकतो आणि त्याच बरोबर या सुविधांचा वापर ते सप्टेंबर २०२१ पर्यंत अगदी मोफत करू शकतील. या चार्जिंग नेटवर्क वर नियंत्रण हे अ‍ॅथर ग्रीड अॅपच्या माध्यमातून करण्यात येणार असून यामुळे ईव्ही चे मालकांना लगेच रिअल टाईम तत्वावर जवळचे चार्जिंग सटेशन शोधणे व त्याची उपलब्धता तपासता येईल.

अ‍ॅथर चीफ बिझनेस ऑफिसर रवनीत फोकेला म्हणाले की, “ ज्या शहरांमध्ये आम्ही डिलिव्हरीज सुरू केल्या आहेत त्या शहरांमध्ये अ‍ॅथर ग्रीडचा वापर सुरू झाला आहे आणि आम्ह्ला असा विश्वास आहे की, चार्जिंगच्या सुविधा या आमचे उत्पादन ज्या बाजारपेठेत आम्ही आणत आहोत त्या बाजारपेठेसाठी महत्त्वपूर्ण आहे. आम्ही अनेक भागीदारांबरोबर याआधीच करार केले असून पुढील काही महिन्यांमध्येसुध्दा आम्ही ही प्रक्रिया सुरू ठेवणार आहोत.

अ‍ॅथर ग्रीडचे मुंबईतील चार्जिंग स्टेशन्स

  1. रूणवाल अँथेरियम, मुलूंड पश्चिम
  2. काळा घोडा कॅफे, फोर्ट
  3. सुबा इंटरनॅशनल, अंधेरी पूर्व
  4. अ‍ॅथर स्पेस मुंबई, लिकिंग रोड
  5. क्लब ॲक्वेरिया, बोरिवली
  6. के स्टार मॉल, चेंबूर
  7. सेलेस्टिया स्पेसेस, शिवडी
  8. लोढा फ्लोरेंझा, गोरेगाव
  9. ब्ल्यू टोकाई, महालक्ष्मी
  10. कार्निव्हल सिनेमा आयमॅक्स, वडाळा

इतर बातम्या

Tesla ने त्वरित भारतात उत्पादन सुरु करावं, अन्यथा… नितीन गडकरींचा सल्लावजा इशारा

3.3 सेकंदात 40 किमी वेग पकडणार, ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरचं भारतात वितरण सुरु

सिंगल चार्जवर 480KM रेंज, Hyundai Ioniq 5 च्या बुकिंगसाठी ग्राहकांच्या रांगा

(Ather Grid fast charging network now active across 10 locations in Mumbai)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.