2021 Apache RTR 160 4V भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

| Updated on: Mar 10, 2021 | 1:01 PM

चेन्नईस्थित कंपनी टीव्हीएस मोटरने (TVS Motor) बुधवारी त्यांचं नवीन मोटारसायकल मॉडेल अपाचे आरटीआर 160 4V (Apache RTR 160 4V) लाँच केले आहे.

2021 Apache RTR 160 4V भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
2021 Apache RTR 160 4V
Follow us on

नवी दिल्ली : चेन्नईस्थित कंपनी टीव्हीएस मोटरने (TVS Motor) बुधवारी त्यांचं नवीन मोटारसायकल मॉडेल अपाचे आरटीआर 160 4V (Apache RTR 160 4V) चे 2021 व्हेरिएंट लाँच केले आहे. या मोटारसायकलची किंमत 1,07,270 रुपयांपासून (एक्स-शोरूम दिल्ली) पासून सुरू होते. 159.7 सीसी सिंगल सिलेंडर, 4-व्हॉल्व्ह ऑइल-कूल्ड इंजिनवर चालणारी ही बाइक 17.63 PS पॉवर जनरेट करते.

टीव्हीएस मोटर कंपनीच्या म्हणण्यानुसार, Apache RTR 160 4V दोन ब्रेक व्हेरिएंटमध्ये बाजारात सादर केली आहे. याच्या डिस्क ब्रेक व्हेरिएंटची किंमत 1,10,320 रुपये आहे आणि ड्रम ब्रेक व्हेरिएंटची किंमत 1,07,270 रुपये आहे (एक्स-शोरूम दिल्ली). 2021 व्हेरिएंट अपाचे आरटीआर 160 4V ही बाईक जुन्या मॉडेलपेक्षा 2 किलो हलकी झाली आहे, या बाईकचं डिस्क व्हेरिएंट 147 किलो आणि ड्रम व्हेरिएंटचे वजन 145 किलो आहे. (TVS Motor launches 2021 Apache RTR 160 4V, know price and specs)

Apache RTR 160 4V मध्ये काय आहे खास

  1. ही बाईक कार्बन फायबर पॅटर्नसह नवीन ड्युअल टोन सीटसह सादर करण्यात आली आहे आणि स्टायलिश पोझिशन लॅम्पसह एलईडी हेडलॅम्पमुळे या बाईकला प्रीमियम लुक मिळाला आहे.
  2. मोटारसायकलचे इंजिन 5-स्पीड सुपर-स्लीक गियरबॉक्ससह जोडण्यात आले आहे जे अचूक आणि शक्तिशाली राइडिंग अनुभव देते.
  3. या बाईकचे इंजिन 9,250rpm वर 17.63PS उर्जा आणि 7,250rpm वर 14.73Nm पीक टॉर्क तयार करण्यास सक्षम आहे.
  4. नवीन इंजिन सुमारे 1.6PS अधिक शक्तिशाली आहे आणि किंचित जास्त टॉर्क जनरेट करतं. यापूर्वी अपाचे मॉडेलचे इंजिन 16.02PS पॉवर आणि 14.12Nm टॉर्क जनरेट करण्यालायक डिझाइन केले होते.
  5. 2021 टीव्हीएस अपाचे आरटीआर 160 4V स्ट्रीटफायटर 3 रंगाच्या पर्यायांसह उपलब्ध आहे. ज्यामध्ये बाइक रेसिंग रेड, नाईट ब्लॅक आणि मेटॅलिक ब्लू या रंगांचा समावेश आहे.

टीव्हीएस मोटरचे प्रीमियम मोटारसायकल्स विभागाचे सहअध्यक्ष मेघश्याम दिघोल म्हणाले की, “आम्हाला खात्री आहे की आम्ही टीव्हीएस अपाचे आरटीआर 160 4 व्ही मोटरसायकलची यशोगाथा आणखी बळकट करू. नवीन 2021 अपाचे आरटीआर 160 4 व्ही (2021 Apache RTR 160 4V) कमी वजनासह आणि अधिक टॉर्क व्हॅल्यूसह बेस्ट-इन-क्लास परफॉर्मन्स देईल.

हेही वाचा

बंपर ऑफर! 1.45 लाखांची बाईक अवघ्या 45 हजारात

1 लीटर पेट्रोलमध्ये 99 किलोमीटर धावणार, Bajaj, Hero च्या ‘या’ बजेट बाईक्स

पेट्रोलचे दर वाढल्याने महाराष्ट्रातील ‘या’ शहरात इलेक्ट्रिक वाहनं आऊट ऑफ स्टॉक

(TVS Motor launches 2021 Apache RTR 160 4V, know price and specs)