AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंपर ऑफर! 1.45 लाखांची बाईक अवघ्या 45 हजारात

तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही.

बंपर ऑफर! 1.45 लाखांची बाईक अवघ्या 45 हजारात
Buy Bajaj Avenger 220 BS6
| Updated on: Mar 08, 2021 | 3:48 PM
Share

मुंबई : तुम्हाला एखादी बाईक खरेदी करायची असेल परंतु कमी बजेटमुळे तुम्हाला बाईक खरेदी करता येत नसेल, अथवा त्यात अडचणी येत असतील, तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला एका शानदार ऑफरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करु शकाल. (Buy Bajaj Avenger 220 BS6 in just Rs 45000)

आज आम्ही तुम्हाला अशा एका वेबसाइटबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यावरून तुम्ही अगदी कमी किंमतीत बाईक खरेदी करू शकता. यावर तुम्हाला कमी किंमतीत दुचाकी आणि स्कूटर दोन्ही खरेदी करता येतील. CredR असं या या वेबसाईटचं नाव आहे. या वेबसाईटवर तुम्हाला सर्व प्रकारच्या सेकेंड हँड बाईक्स आणि स्कूटर खूपच कमी किंमतीत मिळतील. CredR जुन्या बाइक्सचं नूतनीकरण करून त्या बाईक्सची विक्री करते. सोबतच वॉरंटी आणि RC हस्तांतरणाची सुविधादेखील प्रदान करते.

अवघ्या 45 हजारात Avenger 220 बाईक

CredR वर तुम्हाला केवळ 45 हजार रुपयांमध्ये नुतनीकरण करण्यात आलेली Bajaj Avenger 220 BS6 बाईक खरेदी करता येईल. ही बाईक 220cc ची आहे. वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही सेकेंड ओनर बाईक आहे. ही बाईक खरेदी केल्यास तुम्हाला 7 दिवसांचा बाय प्रोटेक्ट, 6 महिन्यांची वारंटी, अश्योर्ड आरसी ट्रान्सफरची सुविधा दिली जाईल.

ग्राहक या लिंकवर (https://www.credr.com/all-used-bikes-in-Pune-Hinjawadi-Road/Bajaj-Avenger-220/17575) जाऊन या बाईकबाबतची माहिती घेऊ शकतात. ही बाईक पुण्यात उपलब्ध आहे. तसेच वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही बाईक फक्त 25,496 किलोमीटर धावली आहे. तसेच केवळ 399 रुपये देऊन तुम्ही या बाईकची डोरस्टेप डिलिव्हरी प्राप्त करु शकता. तसेच शोरुमवर जाऊन तुम्ही या बाईकबाबतची माहिती घेऊ शकता.

Bajaj Avenger 220 BS6 चे फीचर्स

कंपनीने गेल्या वर्षी ही बाईक बीएस 6 इंजिनसह बाजारात सादर केली होती. यात तुम्हाला सिंगल सिलिंडर ट्विन्सपार्क ऑइल कूल्ड इंजिन मिळेल ज्यामध्ये फ्यूल इंजेक्शन तंत्रज्ञानासह कॅटालिटिक कन्व्हर्टर देखील आहे, जे 7508rpm वर 18.7bhp आणि 7000rpm वर 17.5nm पीक टॉर्क जनरेट करते. याव्यतिरिक्त, या बाईकच्या फ्रंटला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस अॅडजस्टेबल ट्विन स्प्रिंग सस्पेंशन देण्यात आलं आहे. सोबतच या बाईकमध्ये तुम्हाला सिंगल चॅनल एबीएस सिस्टिम देण्यात आली आहे. या बाईकची किंमत 1,45,930 रुपये इतकी आहे.

(सूचना : या बातमीत संबंधित बाईकबद्दल दिलेली माहिती ही CredR वेबसाईटवरुन घेतली आहे. अधिक माहितीसाठी संबंधित वेबसाईटवर संपर्क साधावा.)

संबंधित बातम्या

धमाकेदार ऑफर! 4 लाखांची कार अवघ्या 2 लाखात

7 रुपयात 100 KM प्रवास करा, ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक चालवण्यासाठी रजिस्ट्रेशन, लायसन्सची गरज नाही

(Buy Bajaj Avenger 220 BS6 in just Rs 45000)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.