Car Launch: भारतात या वर्षी लाँच होणार धमाकेदार कार्स… यातील तुमची ड्रीम कार कोणती?

| Updated on: Jun 30, 2022 | 4:26 PM

ग्राहकांची मागणी आणि मार्केटमधील स्पर्धा लक्षात घेउन अनेक कंपन्या आपल्या अपकमिंग कारमध्ये विविध फीचर्स देत आहेत. मार्केटमध्ये टोयोटा हाइराइडर, मारुती S-Cross 2022, Citroen C3, बोलेरो नियो प्लस सारखे अनेक नवीन मॉडेल येत्या काही दिवसांमध्ये बघायला मिळू शकतात.

Car Launch: भारतात या वर्षी लाँच होणार धमाकेदार कार्स... यातील तुमची ड्रीम कार कोणती?
यातील तुमची ड्रीम कार कोणती?
Image Credit source: Social Media
Follow us on

भारतामध्ये कार्सच्या खरेदीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. कार कंपन्यादेखील दरवर्षी आपले नवनवीन मॉडेल (Model) ग्राहकांच्या भेटीला आणत आहेत. भारतात पुढील काही महिन्यांमध्ये सणासुदीचे दिवस आहेत. या दिवसांनाही डोळ्यासमोर ठेवून अनेक कार निर्मात्या कंपन्या आता कामाला लागलेल्या दिसून येत आहेत. सणासुदीत नागरिक वाहन खरेदीकडे वळतात, हीच संधी साधून कार निर्मात्या कंपन्या जास्तीत जास्त नवीन कार्स आणून आपला नफा कमावण्याच्या प्रयत्नांमध्ये असतात. ग्राहकांची (Customers) मागणी आणि मार्केटमधील स्पर्धा लक्षात घेउन अनेक कंपन्या आपल्या अपकमिंग कारमध्ये विविध फीचर्स (Features) देत आहेत. मार्केटमध्ये टोयोटा हाइराइडर, मारुती S-Cross 2022, Citroen C3, बोलेरो नियो प्लस सारखे अनेक नवीन मॉडेल येत्या काही दिवसांमध्ये बघायला मिळू शकतात. 2022 मध्ये कोणत्या अजून कार बाजारात दाखल होतील, याची माहिती घेणार आहोत.

टोयोटा अर्बन क्रूजर

टोयोटाची अपकमिंग एसयुव्ही अर्बन क्रूजर Hyryder ला 1 जुलै 2022 रोजी जागतिक बाजारात लाँच करण्यात येणार आहे. युजर्सला यात माइल्ड हायब्रिड टेक्नॉलोजीसह 1.5 लीटरचे पेट्रोल इंजिन मिळणार असून यामुळे कारला स्टार्ट किंवा बंद करण्यास मदत होणार आहे. अपकमिंग एसयुव्ही कारची अंदाजीत एक्सशोरुम किंमत 10 ते 16 लाखांच्या दरम्यान असू शकते.

सिट्रोन सी3

सिट्रोन सी3 ही या सेगमेंटमधील सर्वाधिक बजेट कार असणार आहे. फ्रांसची कार निर्माता कंपनी ही कार साधारणत: 5 ते 7 लाख रुपयांच्या एक्सशोरुम किमतीमध्ये उपलब्ध करणार आहे. 20 जुलै 2022 रोजी लाँच होत असलेल्या या कारमध्ये युजर्सला Puretech 80 आणि 110 इंजिन पर्याय मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

महिंद्रा बोलेरो नियो प्लस

ही महिंद्राच्या सर्वाधिक लोकप्रिय कारमधील एक आहे. ही कार ऑगस्ट 2022 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. ही कार 2.18 सीसीसह 2.2 लीटर डिझेल इंजिनसह बाजारात दाखल होणार आहे. युजर्सला यामध्ये 7 आणि 9 सीटर व्हेरिएंट मिळणार आहे. मॅन्यूअल आणि ऑटोमॅटीक ट्रांसमिशनसह येत असलेल्या या एसयुव्हीची किंमत 10 ते 12 लाख रुपये असू शकते.

ह्युंदाई क्रेटा फेसलिफ्ट

ह्यूंदाईची लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयुव्हीचे फेसलिफ्ट व्हर्जन सप्टेंबर 2022 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. ही कार 1.5 एल पेट्रोल इंजिन, 1.5 एल डिझेल इंजिन तसेच 1.4 एल टर्बो पेट्रोल इंजिनसह उपलब्ध होणार आहे. या कारची संभाव्या एक्सशोरुम किंमत 11 ते 18 लाख असू शकते.

मारुती S-Cross 2022

मारुती सुझुकी S-Cross 2022 हे मॉडेल सप्टेंबर 2022 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. ही कार 1.5 लीटर के सीरीज पेट्रोल इंजिनसह येण्याची शक्यता आहे. युजर्सला यात ग्रॉस ब्लॅक ग्रील, एलईडी हेडलँप, नवीन बंपर आदी फीचर्स मिळणार आहे. याची किंमत 9 ते 13 लाखांच्या दरम्यान असू शकते.