SUV घेण्याच्या विचारात आहात? थोडी प्रतिक्षा करा, येत आहेत नवीन दमदार गाड्या

| Updated on: Mar 28, 2023 | 9:46 PM

मारुती सुझुकीपासून ते Kia आणि Hyundai पर्यंत कंपन्या आपली नवीन उत्पादने बाजारात आणणार आहेत. त्यांचे लाँचींग पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे.

SUV घेण्याच्या विचारात आहात? थोडी प्रतिक्षा करा, येत आहेत नवीन दमदार गाड्या
नवीन SUV
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : तुम्ही बाजारात स्वस्त पण शक्तिशाली SUV च्या (Budget SUV in India) शोधात असाल तर एक आनंदाची बातमी आहे. लवकरच 4 नवीन SUV भारतीय बाजारात दाखल होणार आहेत. मारुती सुझुकीपासून ते Kia आणि Hyundai पर्यंत कंपन्या आपली नवीन उत्पादने बाजारात आणणार आहेत. त्यांचे लाँचींग पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्ही नवीन SUV बुक करणार असाल तर थोडी वाट पहा. येथे आम्ही तुमच्यासाठी भारतात लॉन्च होणाऱ्या 4 SUV कारची यादी घेऊन आलो आहोत. विशेष म्हणजे त्यांची सुरुवातीची किंमत 7 लाख रुपये आहे.

Maruti Jimny 5 Door

Maruti Suzuki Jimny ची 5- डोअर आवृत्ती ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती आणि आधीच 25,000 पेक्षा जास्त बुकिंग प्राप्त झाली आहे. त्याची किंमत 10-12 लाखांदरम्यान असण्याची अपेक्षा आहे आणि ती महिंद्रा थार आणि फोर्स गुरखा यांना टक्कर देईल.

Maruti Suzuki Fronx Baleno-

आधारित क्रॉसओवर Maruti Fronx ची विक्री एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. हे ब्रेझा सारख्याच सबकॉम्पॅक्ट SUV लीगमध्ये ठेवले जाईल, परंतु त्याची किंमत Brezza पेक्षा कमी असेल. किंमती सुमारे 7-8 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.

हे सुद्धा वाचा

Kia Seltos Facelift

Kia Seltos ची अपडेटेड आवृत्ती 2023 च्या मध्यात लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. हे अपडेटेड हेडलॅम्प युनिट, नवीन एलईडी डीआरएल, नवीन फ्रंट फॅसिआ, नवीन फ्रंट ग्रिल, मोठा एअर-डॅम, नवीन एलईडी टेल लॅम्प आणि मागील बंपरसह येईल. ,

Hyundai Ai3

Hyundai टाटा पंच आणि मारुती इग्निसला टक्कर देण्यासाठी छोट्या एसयूव्हीवर काम करत आहे. ही मायक्रो एसयूव्ही त्याच प्लॅटफॉर्मवर आधारित असेल ज्यावर नुकतेच लॉन्च झालेले ग्रँड i10 निओस आणि ऑरा तयार केले गेले होते. हे अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज असेल आणि त्याची सुरुवातीची किंमत 7 लाख रुपये असू शकते.

(वरील सर्व किंमती एक्स-शोरूम आहेत. यामध्ये शहरानुसार बदल असू शकतो)