Kia Car discontinues Variants: KIA चा सर्वात मोठा निर्णय! सर्वाधिक पसंती असलेल्या 3 गाड्यांचे व्हेरिएंट्स बंद; पाहा सर्व डिटेल्स
कियाच्या गाड्यांनी अल्पावधीतच भारतातील रस्त्यांवर क्रेझ अन् आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कियाच्या सोनेट, सिरोस, कॅरेन्स क्लॅव्हिस आणि सेल्टोस या आलिशान गाड्यांनी सर्वांनाच भुरळ घातली आहे. अशातच आता कंपनीने या टॉपच्या गाड्यांमधील अनेक व्हेरिएंट बंद केले आहेत.

Kia Car discontinues Variants: भारताच्या ऑटो मार्केटमध्ये किया कंपनीने आपला दबदबा निर्माण केला आहे. कियाच्या गाड्यांनी अल्पावधीतच भारतातील रस्त्यांवर क्रेझ अन् आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कियाच्या सोनेट, सिरोस, कॅरेन्स क्लॅव्हिस आणि सेल्टोस या आलिशान गाड्यांनी सर्वांनाच भुरळ घातली आहे. अशातच आता कंपनीने या टॉपच्या गाड्यांमधील अनेक व्हेरिएंट बंद केले आहेत.
सेल्टोसचे कोणते व्हेरिएंट बंद करण्यात आले?
किया कंपनीने सेल्टॉसमधील १.५-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह येणारे सर्व iMT गिअरबॉक्स व्हेरिएंट पूर्णपणे बंद केले आहेत. लॉन्चच्या वेळी, हे कॉम्बिनेशन HTE (O) (कन्व्हिनियन्स पॅक), HTK, आणि HTK (O) (प्रीमियम पॅक) मध्ये उपलब्ध होते, परंतु आता या तीन ट्रिम्स काढून टाकण्यात आल्या आहेत. iMT नंतर, 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनच्या खरेदीदारांकडे आता फक्त 7-स्पीड DCT गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, ADAS शिवायचे स्टँडर्ड एक्स लाइन व्हेरिएंट्स देखील बंद करण्यात आले आहेत, याचा अर्थ NA पेट्रोल, टर्बो पेट्रोल आणि टर्बो डिझेल असलेले स्टँडर्ड एक्स लाइन ट्रिम्स यापुढे उपलब्ध नसतील.
कॅरेन्स क्लॅव्हिसमध्ये काय बदललं?
दुसरीकडे कॅरेन्स क्लॅव्हिसमधील 1.5 लिटर टर्बो इंजिनमधून iMT गिअरबॉक्स पूर्णपणे काढण्यात आलेला नाही. फक्त HTX टर्बो पेट्रोल iMT व्हेरिएंट बंद करण्यात आला आहे. हे इंजिन-गिअरबॉक्स संयोजन आता फक्त HTX+ ट्रिममध्ये उपलब्ध असेल. दरम्यान, डिझेल रेंजमधील बेस मॉडेल HTE 1.5 लिटर डिझेल MT बंद झाल्यामुळे, डिझेल लाइनअप आता HTE (O) ट्रिमपासून सुरू होईल. या वर्षी मार्चमध्ये कियाने कॅरेन्स क्लॅव्हिस ICE च्या GT Line आणि X Line गाड्या काही अद्ययावत ट्रिम्ससह सादर केल्या होत्या. यापैकी, 1.5L टर्बो पेट्रोल DCT असलेले HTX (O) A व्हेरिएंट, जे क्लॅव्हिसचे सर्वात स्वस्त ADAS मॉडेल होते, ते आता विक्रीसाठी उपलब्ध नाही.
सोनेट व्हेरिएंट्स बंद
कंपनीच्या सब-कॉम्पॅक्ट SUV, सोनेटमधील मुख्य बदल म्हणजे 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसोबत येणारा iMT गिअरबॉक्स. पूर्वी उपलब्ध असलेले HTK+ टर्बो पेट्रोल iMT आणि HTX टर्बो पेट्रोल iMT व्हेरिएंट्स आता बंद करण्यात आले आहेत. या बदलानंतर, सोनेटमधील 1.0L टर्बो पेट्रोल iMT पर्याय आता फक्त HTK (O) आणि HTK+ (O) ट्रिम्सपुरता मर्यादित आहे.