आधी कारचा धमाका, आता दिवाळीत दणक्यात ई-स्कूटरची एन्ट्री होणार, सर्व कंपन्यांची झोप उडणार?

आधी कारचा धमाका झाला. आता दिवाळीत दणक्यात ई-स्कूटरची एन्ट्री होणार आहे. यासाठी कंपनीने महत्वाचा करार केला आहे.

आधी कारचा धमाका, आता दिवाळीत दणक्यात ई-स्कूटरची एन्ट्री होणार, सर्व कंपन्यांची झोप उडणार?
TWO WHEELER
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 09, 2026 | 11:57 AM

भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कारनंतर आता इलेक्ट्रिक टू-व्हीलरचा धमाका होण्याची तयारी सुरू झाली आहे. विनफास्ट कंपनीच्या इलेक्ट्रिक कारची चांगली विक्री होत आहे. ही कंपनी भारतीय बाजारात विनफास्ट इलेक्ट्रॉनिक कार विकणारी चौथी कंपनी ठरली आहे. सप्टेंबर महिन्यात या कंपनीने 2964 इलेक्ट्रिक कारची विक्री केली आहे. आता विनफास्ट कंपनीची इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात येणार आहे.

15 राज्यात कंपनीचे विशेष लक्ष 

Loading...

कंपनीने आता टू-व्हीलर बाजारात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने नवा करार केला आहे. कंपनीने 50 हून अधिक इलेक्ट्रिक मोटरसायक डीलर पार्टनरसोबत करार केला आहे. या अंतर्गत कंपनी 15 राज्यात डिस्ट्रीब्यूश फुटप्रिंटची स्थापना करण्याच्या तयारीत आहे. कंपनीकडून व्हिएतनामच्या दौऱ्यात या कराराला अंतिम स्वरुप देण्यात आलं. या दौऱ्यावेळी भारतीय डीलर्सचे प्रतिनिधी देखील होते. विनफास्ट रिटेल पार्टनरच्या साहाय्याने भारतातील 34 शहरांमध्ये 50 हून अधिक इलेक्ट्रिक टू-व्हीलर शोरूम उघडणार आहेत. कंपनीचं दिल्ली-एनसीआर,महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालच्या बाजारात शोरूममसाठी विचार करत आहे. कंपनी आधीच इलेक्ट्रिक वाहनाच्या व्यवसायात सक्रिय आहे. यासाठी कंपनीने स्वतंत्र्य नेटवर्क विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीसाठी भारत ही सर्वात महत्वाची आणि बाजारपेठ आहे.

 कंपनी सध्या विकतेय इलेक्ट्रिक कार 

कंपनी भारतीय पार्टनरसोबत हा करार कंपनीच्या अपेक्षा आणि इतर बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. कंपनीने भारतीय बाजारात चांगली विक्री होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्याचबरोबर भारतीय बाजारात नेमकी कोणती इलेक्ट्रिक स्कूटर आणली जाणार, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु कंपनीच्या ई-स्कूटरविषयी ग्राहकांना उत्सुकता लागली आहे.  या कंपनीच्या इलेक्ट्रिक कारविषयी बोलायचं झालं तर कंपनी सध्या भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक कार विकते. आता ब्रँडच्या पोर्टफोलिओमध्ये VF6, VF7 आणि MPV7 यांचा समावेश आहे. यापैकी दोन इलेक्ट्रिक एसयूव्ही आहेत. तर एक इलेक्ट्रिक एमपीव्ही आहे. या कारचा वेगळा चाहता आणि ग्राहकवर्ग आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us