कंपनीने या SUV ची विक्री केली बंद, वेबसाईटवरून कार हटवली, आता याच कारवर मिळतोय 5.50 लाख रुपयांची सूट
Volkswagen Tiguan R-Line वर नोव्हेंबरमध्ये 5.50 लाखांची बंपर सूट. कंपनीकडून SUV चा स्टॉक क्लिअर करण्याची तयारी? किती आहे कारची किंमत?

फोक्सवॅगन नोव्हेंबर महिन्यात आपल्या कारवर आकर्षक डिस्काउंट देत आहे. यामध्ये Volkswagen Tiguan R-Line या प्रीमियम SUV वर सर्वाधिक 5.50 लाख रुपयांपर्यंत फायदे दिले जात आहेत. या ऑफरमध्ये 3.50 लाख रुपये कॅश डिस्काउंट आणि 2 लाख रुपये एक्सचेंज बोनसचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या SUV वर पहिल्यांदाच इतकी मोठी सूट मिळत असल्याचे सांगितले जात आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 47.11 लाख रुपये आहे.
Tiguan R-Line वर एवढी मोठी सूट देण्यामागे कंपनीचा स्टॉक क्लिअर करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. फोक्सवॅगनने ही SUV आपल्या अधिकृत वेबसाइटवरून हटवली आहे. तसेच, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार भारतीय बाजारात या मॉडेलची विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, कंपनीकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
डिझाइन आणि प्रीमियम फीचर्स
Volkswagen Tiguan R-Line मध्ये आकर्षक आणि स्पोर्टी डिझाइन देण्यात आले आहे. यामध्ये स्लीक हेडलॅम्प्सना काचेने झाकलेल्या आडव्या पट्टीने जोडण्यात आले आहे. त्यावर खास ‘R’ बॅज देण्यात आला आहे. SUV मध्ये 19-इंच अलॉय व्हील्स आणि डायनॅमिक 3D LED लॅम्प्स मिळतात.
इंटिरियरमध्येही प्रीमियम अनुभव देण्यावर भर देण्यात आला आहे. सीट्सवर ‘R’ बॅजिंग, डॅशबोर्डवर इल्यूमिनेटेड ‘R’ लोगो, मसाज फंक्शन, अॅडजस्टेबल लंबर सपोर्ट आणि कस्टमाइजेबल अॅम्बियंट लाइटिंग देण्यात आली आहे.
15-इंच टचस्क्रीनसह आधुनिक तंत्रज्ञान
या SUV मध्ये 15-इंचाची मोठी इन्फोटेनमेंट स्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल, IDA व्हॉइस असिस्टंट, व्हॉइस एन्हान्सर आणि पॅनोरॅमिक सनरूफ यांसारखी फीचर्स आहेत. सुरक्षेसाठी 21 लेव्हल-2 ADAS फीचर्स, 9 एअरबॅग्ज, पुढील आणि मागील डिस्क ब्रेक्स तसेच हेड-अप डिस्प्ले देण्यात आला आहे.
2.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनची ताकद
भारतीय बाजारातील Tiguan R-Line मध्ये 2.0-लिटर TSI EVO पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 201 bhp पॉवर आणि 320 Nm टॉर्क निर्माण करते. यासोबत 7-स्पीड DSG गिअरबॉक्स आणि 4Motion ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टम मिळते.
डिस्क्लेमर: Tiguan R-Line वरील डिस्काउंटची माहिती विविध प्लॅटफॉर्मवरील उपलब्ध माहितीनुसार देण्यात आली आहे. प्रत्यक्ष सवलत शहर, डीलर, व्हेरिएंट आणि उपलब्ध स्टॉकनुसार बदलू शकते. त्यामुळे गाडी खरेदी करण्यापूर्वी अधिकृत डीलरकडून ऑफरची संपूर्ण माहिती आणि अंतिम किंमत तपासून घ्यावी.