
तुमचं मोठं कुटुंब असेल आणि तुम्हाला वाहन खरेदी करायचं असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, आता एका कंपनीची कार एसयूव्ही लवकरच येत आहे. तुम्हाला अपग्रेड फीचर्ससह बरंच काही खास या वाहनात मिळू शकतं. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.
आजकाल इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. बहुतेक लोक इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यास प्राधान्य देतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे इलेक्ट्रिक वाहने लोकांना पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींपासून मुक्त होण्यास मदत करतात. लोकांची पसंती पाहता अनेक कंपन्या आपल्या नव्या इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या विचारात आहेत. यापैकीच एक कंपनी Volvo आहे, जी भारतीय बाजारपेठेत आपला ईव्ही पोर्टफोलिओ वाढवण्याच्या तयारीत आहे.
कंपनी Volvo Ex30 नावाची आपली नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही कार भारतात नुकत्याच लाँच झालेल्या टेस्लाच्या मॉडेल वायला टक्कर देऊ शकते. चला तर मग आम्ही तुम्हाला या कारबद्दल सविस्तर सांगतो.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्होल्वोची इलेक्ट्रिक एसयूव्ही Volvo Ex30 नुकतीच भारतातील रस्त्यांवर टेस्टिंग करताना दिसली आहे. लवकरच ही कार भारतात लाँच होऊ शकते. ही Volvo ची सर्वात छोटी आणि परवडणारी इलेक्ट्रिक एसयूव्ही असणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात ही कार व्होल्वो ईएक्स 40 आणि ईसी 40 च्या खालील सेगमेंटमध्ये येते.
जागतिक बाजारात विकली जाणारी Volvo Ex30 कंपनीच्या सस्टेनेबल एक्सपीरियंस आर्किटेक्चर प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. मात्र, त्याच्या आंतरराष्ट्रीय मॉडेलमध्ये दोन बॅटरी पॅक पर्याय आहेत. भारतात कंपनी सिंगल मोटर आणि ड्युअल मोटर एडब्ल्यूडी (ऑल-व्हील ड्राइव्ह) दोन्ही व्हेरियंटमध्ये 69 किलोवॉट एनएमसी बॅटरी पॅक ऑफर करण्याची शक्यता आहे. ही पॉवरट्रेन जास्तीत जास्त 427 बीएचपीपर्यंत पॉवर जनरेट करू शकते आणि एकदा फुल चार्ज केल्यावर 474 किमीची रेंज देऊ शकते.
Volvo Ex30 चे डिझाइन व्होल्वो ईएक्स 90 एसयूव्हीसारखेच दिसते. चाचणीदरम्यान दिसलेले वाहन पूर्णपणे झाकलेले असले तरी अजूनही स्लीक एलईडी हेडलाइट्स, सिग्नेचर थोर हॅमर एलईडी डीआरएल आणि पिक्सेल स्टाइल टेललाइट्स सारखे काही खास डिझाइन घटक आहेत.
इंटिरिअरमध्ये बोलायचे झाले तर Volvo Ex30 मध्ये आंतरराष्ट्रीय मॉडेलप्रमाणेच मिनिमलिस्टिक डिझाइन मिळू शकते. यात 12.3 इंचाची व्हर्टिकल माउंटेड टचस्क्रीन असण्याची शक्यता आहे, जी व्होल्वोच्या अद्ययावत गुगल आधारित इन्फोटेनमेंट ओएसने सुसज्ज असेल.
रिपोर्ट्सनुसार, कंपनी एक्स 30 कार भारतातच असेंबल करण्याच्या योजनेवर विचार करत आहे. तसे झाल्यास कारची किंमत परवडणारी ठरू शकते. कंपनीने अद्याप या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या लाँचिंगची तारीख जाहीर केलेली नसली तरी सणासुदीच्या सीझनपर्यंत ती लाँच होण्याची शक्यता आहे. ही कार 42 ते 45 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत लाँच केली जाऊ शकते.