
मुंबई : भारतात सेल्टॉस कारच्या माध्यमातून कियाने चांगला जम बसवला आहे. या गाडीला चांगली मागणी आहे. त्यामुळे कंपनीने भारतात नवी किया सेल्टॉस गाडी सादर केली आहे. लवकरच ही गाडी ग्राहकांना विकत घेता येणार आहे. त्यामुळे या गाडीबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. कारण मिड साईज एसयुव्हीची भारतात खूप मागणी आहे. त्यामुळे नव्या सेल्टॉसमध्ये काय फरक आहे असा प्रश्न पडला आहे. जुन्या सेल्टॉस तुलनेत असा काय बदल केला आहे की, गाडी खरेदी करावी असा प्रश्न कारप्रेमींना पडला आहे. नव्या गाडीत काय अपग्रेड केलं आहे. गेल्या दिवसांपासून अपडेटेड वर्जनबाबत प्रतिक्षा होती. अखेर ही नवी कोरी सेल्टॉस सादर करण्यात आली आहे. चला जाणून घेऊया जुन्या आणि नव्या गाडीतील फरकाबाबत…
कियाची सेल्टॉसं नवं मॉडेल तुम्हाला खरेदी करायचं असेल तर 14 जुलैपासून बुकिंग सुरु होणार आहे. ही गाडी तुम्ही किया अॅप किंवा कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून बूक करू शकता. सेल्टॉसच्या सध्याच्या ग्राहकांना के कोड घेतल्यास डिलीव्हरी लवकर मिळणार आहे. या गाडीच्या किमतीबाबत कोणतीच घोषणा केलेली नाही.
किया सेल्टॉस फेसलिफ्ट तीन पॉवरट्रेन पर्यायसह येते. या गाडीत पाच ट्रान्समिशन पर्याय उपलब्ध आहे. एटी, डीसीटी, आयव्हीटी, आयएमटी आणि एमटी असे पर्याय देण्यात आले आहेत. कियाच्या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये 1.5 लिटर पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन कायम ठेवण्यात आलं आहे. नव्या सेल्टॉसमध्ये 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनची पॉवर मिळणार आहे. जुन्या सेल्टॉस गाडीत 1.5 लिटर पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेलं इंजिन आहे. यात 1.4 लिटर इंजिन ऑप्शन होतं. पण नव्या एमिशन नियमानंतर हे मॉडेल बंद केलं आहे.
किया सेल्टॉसमध्ये जबरदस्त फीचर्स आहेत. त्यामुळे नव्या सेल्टॉसमध्ये काही फीचर्स अपडेट करण्यात आले आहेत. तसेच काही नवीन फीचर्स अॅड करण्यात आले आहे. त्यामुळे कारप्रेमींचा ड्रायव्हिंगचा आणखी चांगला आनंद घेता येणार आहे. ड्युअल पेन पॅनोरमिक सनरुफ, 17 फीचर्ससह एडीएएस लेव्हल 2.0, ड्युअल झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, व्हायरलेस अॅप्पल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटो, दोन 10.25 इंचाचे ड्युअल डिस्प्ले, एलेक्सा होम टू कार कनेक्टिव्हिटीस किया कनेक्ट आणि 8 वे पॉवर्ड अडजेस्टमेंटसह व्हेंटिलेटेड फ्रंट सीट असणार आहे.