28 KM माइलेज, 6 एअरबॅग्ज अन् किंमत फक्त 4.76 लाखांपासून! ‘या’ आहेत Tata च्या बजेटमधील कार्स

तुम्ही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर टाटाच्या सर्वात परवडणाऱ्या आणि सर्वोत्तम ५ कार कोणत्या आहेत हे जाणून घ्या. याच्या किंमती फक्त 4.76 लाखांपासून सुरु होतात.

28 KM माइलेज, 6 एअरबॅग्ज अन् किंमत फक्त 4.76 लाखांपासून! या आहेत Tata च्या बजेटमधील कार्स
Tata budget friendly cars
| Updated on: Nov 15, 2026 | 2:55 PM

नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत आहात, पण बजेट मर्यादित आहे? मग Tata Motors च्या या कार तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतात. कमी किंमत, आकर्षक डिझाइन, आधुनिक फीचर्स आणि सुरक्षेवर विशेष भर अशी या कारची वैशिष्ट्ये आहेत. विशेष म्हणजे, कंपनीच्या काही मॉडेल्समध्ये 6 एअरबॅग्जसह पेट्रोल आणि सीएनजीचे पर्यायही मिळतात. Tiago पासून Punch आणि Altroz पर्यंतच्या या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.76 लाख रुपयांपासून सुरू होते. जाणून घेऊया या पाच कारचे फीचर्स, इंजिन आणि मायलेज.

1. Tata Tiago: कमी बजेटमध्ये दमदार पर्याय

Tata Tiago ही कंपनीच्या सर्वात परवडणाऱ्या कारपैकी एक आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4,76,990 रुपये आहे. आकर्षक फ्रंट ग्रिल, एलईडी हेडलॅम्प्स आणि स्टायलिश अलॉय व्हील्समुळे तिचा लूक अधिक उठावदार झाला आहे. फीचर्सच्या बाबतीतही Tiago मागे नाही. कारमध्ये 10.25 इंचांची टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay, ऑटो क्लायमेट कंट्रोल तसेच 360 डिग्री कॅमेरा यांसारख्या सुविधा मिळतात. सुरक्षेसाठी सर्व व्हेरिएंटमध्ये 6 एअरबॅग्ज, ESP आणि रिअर पार्किंग सेन्सर्स देण्यात आले आहेत. इंजिनबद्दल सांगायचे झाल्यास, यात 1.2 लिटरचे पेट्रोल इंजिन असून ते 85 bhp पॉवर आणि 113 Nm टॉर्क निर्माण करते. पेट्रोलसोबतच ट्विन-सिलिंडर CNG पर्यायही उपलब्ध आहे. 5-स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सचे पर्याय मिळतात.

Loading...

मायलेज: पेट्रोलमध्ये सुमारे 19 kmpl आणि CNG मध्ये 28 km/kg पर्यंत.

2. Tata Aeris: कमी किमतीत प्रीमियम सेडानचा अनुभव

कॉम्पॅक्ट सेडान खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी Tata Aeris हा एक आकर्षक पर्याय आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5,29,990 रुपये आहे. ब्लॅक फ्रंट स्ट्रिप, एलईडी DRL आणि आकर्षक टेललॅम्प्समुळे कारला आधुनिक लूक मिळतो. आतील बाजूस सॉफ्ट-टच डॅशबोर्ड, लेदरेट सीट्स, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि 10.25 इंचांची Harman टचस्क्रीन देण्यात आली आहे. याशिवाय वायरलेस चार्जर, 360 डिग्री कॅमेरा आणि तब्बल 419 लिटरची बूट क्षमता हेही तिचे महत्त्वाचे आकर्षण आहे. सुरक्षेच्या दृष्टीने 6 एअरबॅग्ज, हिल होल्ड कंट्रोल आणि कॉर्नरिंग स्टेबिलिटी कंट्रोल यांसारखी फीचर्स मिळतात. इंजिन पर्यायांमध्ये 1.2 लिटर पेट्रोल इंजिन (86 PS) आणि ट्विन-सिलिंडर iCNG इंजिन (75.5 PS) यांचा समावेश आहे. दोन्ही पर्यायांमध्ये मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स मिळतात.

मायलेज: पेट्रोलमध्ये सुमारे 20.5 kmpl आणि CNG मध्ये 28.06 km/kg.

3. Tata Punch: SUV चा लूक आणि दमदार फीचर्स

SUV सारखा रुबाबदार लूक असलेली छोटी कार हवी असेल, तर Tata Punch विचारात घेण्यासारखी आहे. या मायक्रो SUV ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5,74,990 रुपये आहे. 193 मिमी ग्राउंड क्लीअरन्स, मस्क्युलर बॉडी क्लॅडिंग, कनेक्टेड एलईडी टेललॅम्प्स आणि 90 डिग्रीपर्यंत उघडणारे दरवाजे यामुळे ती आकर्षक दिसते. कारच्या केबिनमध्ये 10.25 इंच टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हॉइस असिस्टेड इलेक्ट्रिक सनरूफ, अॅम्बियंट लाइटिंग आणि 366 लिटर बूट स्पेस मिळतो. सुरक्षेच्या बाबतीतही Punch मजबूत आहे. या कारला Bharat NCAP कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. यात 6 एअरबॅग्ज आणि 360 डिग्री कॅमेरा यांसारखी फीचर्स आहेत. इंजिन पर्यायांमध्ये 1.2 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन (87 bhp), ट्विन-सिलिंडर CNG आणि 118 bhp पॉवर देणारे 1.2 लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन उपलब्ध आहेत. मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सचे पर्यायही मिळतात.

मायलेज: पेट्रोलमध्ये 20.09 kmpl आणि CNG मध्ये 26.99 km/kg पर्यंत.

4. Tata Altroz: प्रीमियम लूक आणि दमदार सेफ्टी

हॅचबॅक कारमध्ये प्रीमियम फीचर्स आणि स्टायलिश डिझाइनला प्राधान्य देणाऱ्यांसाठी Tata Altroz चांगला पर्याय ठरू शकते. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5,99,990 रुपये आहे. एअरोडायनॅमिक डिझाइन, फ्लश डोअर हँडल्स आणि 16 इंचांचे अलॉय व्हील्स यामुळे कारला स्पोर्टी लूक मिळतो. Altroz च्या केबिनमध्ये ट्विन 10.25 इंच डिस्प्ले, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, एअर प्युरिफायर, सनरूफ, वायरलेस चार्जिंग आणि 345 लिटरची बूट क्षमता देण्यात आली आहे. सुरक्षेसाठी या कारमध्ये 6 एअरबॅग्ज, TPMS आणि 360 डिग्री कॅमेरा मिळतो. Bharat NCAP कडून या कारला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. Altroz चे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात पेट्रोल, CNG आणि डिझेल असे तीन इंजिन पर्याय मिळतात. यात 1.2 लिटर पेट्रोल इंजिन, ट्विन-सिलिंडर CNG आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन (90 PS) उपलब्ध आहे. ट्रान्समिशनसाठी मॅन्युअल, AMT आणि 6-स्पीड DCA पर्याय मिळतात.

मायलेज: पेट्रोलमध्ये 19.33 kmpl, डिझेलमध्ये 23.64 kmpl आणि CNG मध्ये 26.20 km/kg पर्यंत.

कोणती Tata कार ठरेल तुमच्यासाठी योग्य?

कमी बजेटमध्ये कार हवी असल्यास Tiago, तर सेडानचा पर्याय शोधत असाल तर Aeris विचारात घेता येईल. SUV सारखा लूक आणि जास्त ग्राउंड क्लीअरन्स हवा असल्यास Punch चांगली निवड ठरू शकते. तर प्रीमियम फीचर्स आणि पेट्रोल, डिझेल व CNG असे विविध इंजिन पर्याय हवे असतील तर Altroz वर लक्ष केंद्रित करू शकता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us