राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव, गुरुकुंज आश्रम मोझरीत व्यवस्था काय?

गोविंद हटवार, Tv9 मराठी

Updated on: Oct 07, 2022 | 2:02 PM

अत्यंत भावस्पर्शी व शिस्तबद्ध मौन श्रद्धांजलीचा हृदयस्पर्शी कार्यक्रम 14 ऑक्टोबरला होणार आहे.

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव, गुरुकुंज आश्रम मोझरीत व्यवस्था काय?
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव
Image Credit source: t v 9

स्वप्निल उमप, Tv9 मराठी, प्रतिनिधी, अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अखिल विश्वाला मानवतेचा संदेश दिला. क्रांतीदर्शी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा 54 वा पुण्यतिथी महोत्सव अर्थात् सर्व संत स्मृती मानवता दिन उद्या 8 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरपर्यंत होत आहे. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोझरी येथे हा कार्यक्रम होणार आहे. यातील अत्यंत भावस्पर्शी व शिस्तबद्ध मौन श्रद्धांजलीचा हृदयस्पर्शी कार्यक्रम 14 ऑक्टोबरला होणार आहे. यावेळी राज्यांतील संत-महंत, परदेशी पाहुणे, भाविक मंडळी व राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. 15 ऑक्टोबर रोजी गोपालकाला व व्यायाम प्रात्यक्षिकाच्या सादरीकरणाने पुण्यतिथी महोत्सवाची सांगता होणार आहे.

दोन वर्षे साध्या पध्दतीने झाला महोत्सव

कोरोना निर्बंधामुळे सलग दोन वर्षे पुण्यतिथी महोत्सव साजरा करता आला नाही. परंतु आता निर्बंध नसल्यामुळे सर्वधर्म समभावाचे प्रतीक असणाऱ्या श्रीक्षेत्र गुरुकुंज येथे राष्ट्रसंतांच्या या पुण्यतिथी महोत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली. उद्या पहाटे साडेचार वाजता तीर्थ स्थापना होईल.

पुण्यतिथी महोत्सवात विविध कार्यक्रम

दरवर्षी प्रमाणे यंदाही या महोत्सवामध्ये विविध प्रकारचे सामाजिक, धार्मिक, प्रबोधनात्मक, राज्यस्तरीय कीर्तन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा सर्व कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.

यंदाही या पुण्यतिथी सोहळ्याला लाखो गुरुदेव भक्त वाजत गाजत पालखी दिंड्यासह श्रीक्षेत्र गुरुकुंज येथे येणार आहेत. कार्यक्रमस्थळाच्या जागेचे विस्तारीकरण करून भव्य मंडप उभारण्यात आला आहे. पालख्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

पहाटे साडेचार वाजता तीर्थ स्थापना

महोत्सवाची सुरुवात 8 ऑक्टोबरला पहाटे साडेचार वाजता महासमाधी जवळ तीर्थस्थापना व चरणपादुका पूजनाने होईल. राजेंद्र कठाळे, सुभाष नेमाडे, वासुदेव कुरवाडे, राजेंद्र चव्हाण हे अखंड विणा वादनास प्रारंभ करतील. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतीमेची भव्य शोभायात्रा मानकर स्वामी (आळंदी) यांच्या संयोजनाखाली काढण्यात येईल.

पुण्यतिथी महोत्सवात दररोज सकाळी 5.30 ते 6.30 या वेळात सामुदायिक ध्यानावर शंकर महाराज, विठ्ठलदास काठोळे, अॅड. सचिन देव, सिमा तायडे, विजयादेवी, रामप्रियाजी, प्रकाश वाघ आपले चिंतन व्यक्त करतील. दररोज सकाळी 7 ते 8 या वेळात योगाचार्य तुळशीदास कपाळे योगासन व प्राणायमाचे प्रशिक्षण देणार आहेत.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI