Budget 2022: अर्थसंकल्पातून ज्येष्ठ नागरिकांच्या आहेत या काही माफक अपेक्षा, एन्युटी इनकम टॅक्स होईल का फ्री?

| Updated on: Jan 26, 2022 | 7:45 PM

अर्थ संकल्पामध्ये ज्येष्ठ नागरिकांची अशी मागणी आहे की ,व्याजदर वाढवले जावेत याशिवाय एन्युटी इनकमला टॅक्स फ्री केले जावेत. सध्या यावर टॅक्स भरावा लागतो.

Budget 2022: अर्थसंकल्पातून ज्येष्ठ नागरिकांच्या आहेत या काही माफक अपेक्षा, एन्युटी इनकम टॅक्स होईल का फ्री?
Follow us on

ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) सुद्धा येणाऱ्या दिवसामध्ये जे अर्थसंकल्प सादर केले जाणार आहे त्या अर्थसंकल्पातून खूपच अपेक्षा आहेत. अर्थसंकल्प (Budget 2022) येण्यासाठी आता आठवड्यातील काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. प्रत्येकाला अर्थमंत्री (Finance Minister) निर्मला सीतारमण यांच्याकडून खूपच अपेक्षा आहेत, अशातच ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा येणाऱ्या अर्थसंकल्पापासून खूप सार्‍या अपेक्षा आहेत. व्याजदर कमी झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) खूप सार्‍या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ज्येष्ठ नागरिक त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी फिक्स्ड इनकम मध्ये गुंतवणूक करतात. बँक फिक्स्ड डिपॉजिट्स अधिकतर ज्येष्ठ नागरिकांची पहिली पसंती असते. या फिक्स डिपॉझिट वर सध्याच्या काळामध्ये 6 टक्के पेक्षा कमी व्याजदर मिळत आहे. येणाऱ्या अर्थसंकल्पातून या फिक्स डिपॉझिट रक्कमेवर असणाऱ्या व्याजदरात(Interest Rate) वाढ व्हावी ,अशी ज्येष्ठ नागरिकांना माफक अपेक्षा आहे. याशिवाय एन्युटी इनकमला टॅक्स फ्री केले जावे. सध्या या इनकमवर टॅक्स लावला जात आहे.

एन्युटी इनकम टॅक्स फ्री केला जावा

नेशनल पेंशन सिस्टम (एनपीएस) व अन्य पेंशन स्कीम द्वारे मिळणाऱ्या एन्युटी किंवा पेंशन टॅक्स भरावा लागतो. एक रकमी मिळणाऱ्या किमतीवर टॅक्स सवलत मिळालेली आहे परंतु मासिक किंवा वार्षिक तत्वावर मिळणाऱ्या रकमेवर हा एन्युटी टॅक्स भरावा लागतो म्हणूनच जेष्ठ नागरिक एकरकमी रक्कम स्वीकारतात त्यानंतर यांना खूप मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते त्याचबरोबर येणाऱ्या अर्थसंकल्पातून सरकार या अर्थसंकल्पामध्ये एन्युटी इनकम टॅक्स फ्री करेल अशी अपेक्षा ठेवत आहे.

व्याजदरात वाढ व्हावी

एकंदरीत कोरोनाच्या उद्भवलेली परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून आरबीआय इकोनॉमिक ग्रोथ सुनिश्चित करण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून या व्याज दरांमध्ये घट करण्यात आली आहे. व्याजदर कमी असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. बँकेमध्ये फिक्स इन्कम म्हणून ठेवलेल्या गुंतवणुकीवर त्यांना कमी व्याजदर मिळत आहे आणि यामुळे होणारा लाभ सुद्धा कमी होत आहे. सरकारला जेष्ठ नागरिकांना व्याजदराच्या माध्यमातून मिळणारी कमाई साठी व्याजदर वर वाढीवर विचार करणे गरजेचे आहे म्हणूनच या किमती वरील व्याजदर वाढवावा असा विचार ज्येष्ठ नागरिकांच्या मनामध्ये येत आहे. याशिवाय सरकारने एफ डी(Fixed Deposit) वर स्पेशल व्याजदराची घोषणा करावी अशी ज्येष्ठ नागरिकांची माफक अपेक्षा आहे.

पोस्ट ऑफिस मध्ये गुंतवणूक करण्याची मर्यादा वाढवावी.

अर्थसंकल्पातून ज्येष्ठ नागरिकांना खूप साऱ्या अपेक्षा आहेत. ज्येष्ठ नागरिक पोस्ट ऑफिसमध्ये काही विशिष्ट रक्कम गुंतवणूक करत असतात आणि म्हणूनच या रकमेवरची जी मर्यादा असते ती वाढवण्याची मागणी ज्येष्ठ नागरिक करत आहेत याशिवाय सरकारने पब्लिक प्रोविडेंट फंड
(PPF) मध्ये गुंतवणुकी रकमेवरची मर्यादा देखील हटवावी.

इन्शुरन्स प्रीमियमवर टॅक्स सवलतीची मागणी

कोरोना महामारी नंतर इन्शुरन्स प्रीमियममध्ये वाढ झालेली आहे अशा तसेच ज्येष्ठ नागरिकांना इन्शुरन्स वर आकारले जाणाऱ्या टॅक्स वर सवलत मिळावी ,जेष्ठ नागरिक यांच्या इन्शुरन्स प्रीमियम वर विशेष लक्ष द्यावे. ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन उत्पादनांचे लॉन्चिंग केली जावी जेणेकरून जो टॅक्स एफिशिएंट असावा. ज्येष्ठ नागरिकांच्या इन्कम वाढवण्यावर विचार केला जावा पेन्शन डिडक्शन आणि इन्शुरन्स टॅक्समधील सवलतीवर बदल करण्याची गरज आहे.

Home Loan Tax Rebate: स्वप्नातील घराला कर सवलतीचा नजराणा, 5 लाखांपर्यंत मिळू शकते कर सवलत

Budget 2022 : कृषी क्षेत्राच्या नजरेतून अर्थसंकल्प ; सरकारच्या भूमिकेवरच सर्वकाही अवलंबून..!

Budget 2022: यंदाच्या बजेटमध्ये सरकार राष्ट्रीय आरोग्य अभियानाची व्याप्ती वाढवणार? जाणून घ्या महत्वाचे मुद्दे!