Union budget of India : देशाचं बजेट सादर, तुम्हाला काय मिळालं?

| Updated on: Feb 01, 2021 | 3:49 PM

बजेटमधील सर्वात झटका देणारी बाब म्हणजे, पेट्रोल आणि डिझेल महागणार आहे. पेट्रोलवर 2.50 रुपये तर डिझेलवर 4 रुपयांचा सेस म्हणजेच अधिभार लावला जाणार आहे.

Union budget of India : देशाचं बजेट सादर, तुम्हाला काय मिळालं?
निर्मला सीतारमण
Follow us on

नवी दिल्ली : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प 2021-22 (Union budget of India) सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पावर कोरोना आणि लॉकडाऊनचं सावट होतं. वाढलेली बेरोजगारी, घसरलेली अर्थव्यवस्था, उद्योगांना चालना, सर्वसामान्यांना दिलासा देणं अशी अनेक आव्हानं मोदी सरकारसमोर होती. बजेटमधील सर्वात झटका देणारी बाब म्हणजे, पेट्रोल आणि डिझेल महागणार आहे. पेट्रोलवर 2.50 रुपये तर डिझेलवर 4 रुपयांचा सेस म्हणजेच अधिभार लावला जाणार आहे. त्यामुळे विविध राज्यातील आणि विविध जिल्ह्यातील स्थानिक करांची भर होऊन, पेट्रोल शंभरी पार होणार हे निश्चित आहे. (FM Nirmala Sitharaman to presented Budget 2021 today what you will get?)

पेट्रोल-डिझेल महागणार

पेट्रोल-डिझेल महागणार आहे म्हणजे सर्वच महागणार हे साधं गणित आहे. पेट्रोलवर अडीच रुपये तर डिझेलवर चार रुपयांचा अधिभार लावण्यात येणार आहे. मात्र दिलासादायक म्हणजे, हे अधिभार लावताना आधीचे अधिभार जसे एक्साईज ड्युटी आणि स्पेशल अतिरिक्त एक्साईज ड्युटी हटवण्यात येईल असं निर्मला सीतारमण म्हणाल्या. पेट्रोल सध्या ऑल टाईम हाय आहे. मुंबईत पेट्रोल जवळपास 93 रुपये लिटरवर पोहोचलं आहे. तर डिझेलचा दर 84 च्या घरात आहे.

सोने चांदी खरंच स्वस्त होणार?

बजेटमधील दिलासादायक बाब म्हणजे सोने-चांदीवरील सीमा शुल्क 2.5 टक्क्यांनी कमी करण्याचा विचार आहे. म्हणजे सीमा शुल्क 12.5 टक्क्यांवरुन 10 टक्क्यांवर आणण्याबाबत सीतारमण यांनी सांगितलं. त्यामुळे दागिने स्वस्त होण्याची आशा आहे.

काय महागणार?

अपारंपरिक ऊर्जा जसे सोलार पॅनल-इन्व्हर्टर, यांच्यावरील कर 5 वरुन 20 टक्क्यांवर करण्यात आला. शिवाय ऑटो पार्टच्या काही गोष्टीवर कस्टम ड्युटी वाढवली. त्यामुळे त्या वस्तू महागण्याची चिन्हं आहेत. याशिवाय मोबाईलवरील कस्टम ड्युटी वाढवल्याने, मोबाईल महागणार आहेत.

काय स्वस्त?

आयर्न स्टील कस्टम ड्युटीत सूट मिळणार आहे. शिवाय तांब्यावरील कस्टम ड्युटीत सूट दिल्याने तांब्याच्या वस्तू स्वस्त होतील. कपड्याच्या हातमागावर सूट मिळणार आहे. केमिकलवरील कस्टम ड्युटी, तसंच सोने-चांदीवरील स्टॅम्प ड्युटी कमी करण्याचा , चामड्याच्या वस्तूवरी कस्टम ड्युटी कमी होणार आहे.
त्यामुळे या वस्तू स्वस्त होतील.

घरे

परवडणाऱ्या घरांच्या व्याजाची मर्यादा वाढवली, एक वर्षापर्यंत सूट वाढवण्यात आली आहे. परवडणारी घरं आणि भाड्याची घरं जुलै 2019 मध्ये 1.5 लाखाच्या व्याजावर सूट देण्यात आली. जर तुम्ही घर खरेदी करणार असाल, तर कर्ज 2022 पर्यंत घेणार असाल तर तुम्हालाही या सुविधेचा लाभ मिळेल

टॅक्स स्लॅब

यंदाच्या टॅक्सस्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 75 पेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना करमाफीची घोषणा निर्मला सीतरमण यांनी केली. पेन्शननं कमाई असलेल्यांसाठी कर भरावा लागणार नाही.

शेती

मोदी सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट MSP देण्याची घोषणा केली.   केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. 2020-21 मध्ये शेतकऱ्यांना 75 हजार 060 कोटी रुपये गव्हासाठी देण्यात आले.  2020-21 मधील खरेदी सुरु, केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर धान्य खरेदी केली, असं निर्मला सीतारमण म्हणाल्या.

संबंधित बातम्या  

Union Budget 2021 highlights : टॅक्स स्लॅब ते उद्योग व्यापार, काय महाग, काय स्वस्त, अर्थसंकल्प जसाच्या तसा! 

Union Budget 2021 Marathi LIVE : आजच्या बजेटमध्ये आत्मनिर्भरतेचं दर्शन:पंतप्रधान नरेंद्र मोदी