
1958-59 मध्ये देशाचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी अर्थसंकल्प सादर केला आणि ते अर्थसंकल्प सादर करणारे देशाचे पहिले पंतप्रधान ठरले. कारण तेव्हा अर्थ मंत्रालय देखील पंडित नेहरूंकडेच होते.

पंडित नेहरूंनंतर इंदिरा गांधींनीही पंतप्रधान असताना अर्थसंकल्प सादर केला होता. त्या देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या. त्यानंतर निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. देशाच्या अर्थमंत्री पदाची कमान सांभाळणाऱ्या सीतारामन या दुसऱ्या महिला आहेत.

2016 मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पात मोठा बदल करण्यात आला. तेव्हा अरुण जेटली हे अर्थमंत्री होते. 2016 पूर्वी रेल्वे अर्थसंकल्प हा वेगळा मांडण्यात येत होता. मात्र 2016 नंतर सर्वसाधारण अर्थसंकल्पातच रेल्वे अर्थसंकल्प देखील विलिन करण्यात आला. यासोबतच अनेक वर्षांपासून सुरू असलेली परंपरा संपुष्टात आली.

देशात सर्वाधिक 10 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. त्यांनी अर्थमंत्री म्हणून 6 वेळा आणि उपपंतप्रधान म्हणून 4 वेळा अर्थसंकल्प सादर केला. एकदा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी अर्थसंकल्प मांडला होता.