AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Union Budget 2023 : बजेट पाहा याची देही याची डोळा, केव्हा आणि किती वाजता सादर होईल अर्थसंकल्प

Union Budget 2023 : उद्या अर्थमहोत्सव बघण्यासाठी अनेक साधनांचा वापर करता येईल. तुमच्या खिशातील मोबाईलवर बजेट लाईव्ह बघता येईल.

Union Budget 2023 : बजेट पाहा याची देही याची डोळा, केव्हा आणि किती वाजता सादर होईल अर्थसंकल्प
| Edited By: | Updated on: Feb 01, 2023 | 12:21 PM
Share

नवी दिल्ली : देशाचा अर्थमहोत्सव उद्या बघता येईल. देशाची आर्थिक नाडी भारतालाच नाही तर जगाला कळणार आहे. भारताची घोडदौड आणि भविष्यातील घडामोड याची वित्तंबातमी तुम्हाला मिळेल. 1 फेब्रुवारी 2023 रोजी देशाचा अर्थसंकल्प (Union Budget) सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील. सीतारमण यांच्या कार्यकाळातील हा पाचवा अर्थसंकल्प आहे. कोरोना काळात देशात डिजिटल बजेटची परंपरा सुरु झाली. यंदा ही डिजिटल बजेट असेल. पेपरलेस बजेटवर यंदा भर देण्यात येणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अर्थसंकल्पीय भाषण तुम्हाला लाईव्ह बघता येईल. संसद टीव्ही आणि दूरदर्शनवर भाषणाचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल. तसेच पत्र सूचना कार्यालय(PIB) बजेट 2023 चे लाईव्ह स्ट्रीमिंग त्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर करेल.

टीव्ही9 मराठीसह इतर वृत्त वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण पाहता येईल. युट्यूबवरही तुम्हाला बजेट 2023 चे लाईव्ह प्रक्षेपण बघता येईल. विविध सरकारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, फेसबूक, ट्विटर आणि युट्यूबवर बजेटचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

तुम्ही Union Budget Mobile App वर अर्थसंकल्पाविषयीचे सर्व कागदपत्रे पाहु शकता. हे अॅप हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये आहे. या दोन्ही भाषेत बजेटसंबंधीचा सर्व तपशील तुम्हाला पाहता येईल.  हा तपशील तुम्हाला डाऊनलोड करता येईल. त्याआधारे निवांत वाचन करता येईल.

हे अॅप अँड्राईड आणि आईओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे अॅप तुम्हाला www.indiabudget.gov.in वर जाऊन डाऊनलोड करता येईल. डाऊनलोड झाल्यानंतर तुम्हाला बजेटची इत्यंभूत माहिती मिळेल.  तुम्ही ही माहिती जतन करु शकता. ती वाचू शकतात.

केंद्र सरकार दरवर्षी संसदेत एक बजट सत्र (budget session) आयोजीत करते. या अर्थसंकल्पात देशाचा आर्थिक विकास आणि त्यासंबंधीच्या विविध निर्णयाची माहिती देण्यात येते. केंद्रीय अर्थमंत्रीच या बजेट सत्रातून पुढील आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करतात.

2021 मध्ये केंद्र सरकारने पहिल्यांदा पेपरलेस अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी संसदेचे सदस्य, सर्वसामान्य जनतेला अर्थसंकल्पाचा तपशील देण्यासाठी अॅप देण्यात आले होते. “Union Budget Mobile App” ची सुरुवात त्यावेळी करण्यात आली होती.

1 फेब्रुवारी, 2023 रोजी जेव्हा केंद्रीय अर्थमंत्री त्यांचे भाषण पूर्ण करतील. तेव्हा अर्थसंकल्पाची इंत्यभूत माहिती, तपशील मोबाईल अॅपवर उपलब्ध होईल. हे मोबाईल अॅप हिंदी आणि इंग्रजी भाषेत आहे.

बजेट 2023 साठी खालील लिंकवर क्लिक करा

अर्थसंकल्प 2023 लाईव्ह टीव्ही

Budget 2023 LIVE : अर्थसंकल्पाच्या पेजवर जाण्यासाठी क्लिक करा

Budget 2023 : अर्थसंकल्पाच्या घोषणा आणि परिणाम

Budget 2023 : बजेट 2023 च्या हायलाईटस

चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.