व्हिस्की पिण्यात भारत कितव्या नंबरवर? जगातल्या 20 देशांना टाकलं मागे

कोणतीही पार्टी असो किंवा कार्यक्रम दारु असते म्हणजे असते. फक्त सेलिब्रिटींच्याच पार्टीत नाही तर, सामान्य लोक देखील दारू मोठ्या प्रमाणात पितात... यामध्ये भारताने 20 देशांना मागे टाकलं आहे...

व्हिस्की पिण्यात भारत कितव्या नंबरवर? जगातल्या 20 देशांना टाकलं मागे
फाईल फोटो
| Updated on: Nov 07, 2025 | 12:16 PM

भारतातच नाही तर, देशात दारु पिणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. पण यामध्ये भारत अव्वल स्थानी आहे… हे आम्ही नाही सांगत, तर एक रिपोर्ट सांगत आहे. जागतिक अल्कोहोल संशोधन फर्म IWSR च्या आकडेवारीनुसार, रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, सलग तिसऱ्या सहा महिन्यात जगातील 20 प्रमुख बाजारपेठांमध्ये भारताने एकूण अल्कोहोल (TBA) वापरात सर्वाधिक वाढ नोंदवली आहे. आयडब्ल्यूएसआरच्या एका मीडिया रिपोर्टमधील ताज्याआकडेवारीनुसार, जानेवारी-जून 2025 या कालावधीत भारतात टीबीएचं प्रमाण 7 टक्क्यांनी वाढून 440 दशलक्ष 9 -लिटर केसना पार केलं आहे.

IWSR चं स्टँडर्ड मेजर, 9-लिटर केस, 12 स्टँडर्ड 750 मिलीलीटर बाटल्यांच्या समतुल्य आहे. स्पिरिट्स क्षेत्रात, भारतीय व्हिस्कीने बाजारपेठेत वर्चस्व गाजवलं असून ते 7 टक्क्यांनी वाढून 130 दशलक्ष 9 लिटर केसेसपर्यंत पोहोचलं आहे.

भारताने या 20 देशांना टाकलं मागे…

आईडब्ल्यूएसआरच्या आशिया-पॅसिफिक संशोधन प्रमुख सारा कॅम्पबेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताचं रँकिंग आयडब्ल्यूएसआरने ट्रॅक केलेल्या सर्व 20 जागतिक बाजारपेठांमधील टीबीए व्हॉल्यूममधील वाढीच्या टक्केवारीवर आधारित आहे. ज्यामध्ये चीन, अमेरिका, ब्राझील, रशिया, मेक्सिको, जर्मनी, जपान, युके, स्पेन, दक्षिण आफ्रिका, इटली, फ्रान्स, पोलंड, फिलीपिन्स, थायलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया आणि नेदरलँड्स यांसारखे देश सामिल आहेत.

5 वा सर्वांत मोठा अल्कोहल मार्केट ठरु शकतो भारत…

आयडब्ल्यूएसआरच्या अंदाजानुसार, भारत जागतिक स्तरावर दारूच्या प्रमाणात पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा मार्केट बनण्याच्या मार्गावर आहे. भारत अल्कोहल व्यवसायात 2027 पर्यंत जपान आणि 2033 पर्यंत जर्मनीला मागे टाकेल असा देखली अंदाज वर्तवला जात आहे. चीन, ब्राझील, अमेरिका आणि मेक्सिको या देशांना भारत मागे टाकू शकतो…

भारतातील प्रीमियम आणि त्यावरील अल्कोहोल श्रेणींनी एकूण वाढीपेक्षा चांगली कामगिरी केली, 2025 च्या पहिल्या सहा महिन्यात व्हॉल्यूम आणि मूल्य दोन्हीमध्ये 8 टक्क्यांनी वाढ झाली. प्रमुख क्षेत्रांमध्ये, रेडी-टू-ड्रिंक ड्रिंगमध्ये 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे, त्यानंतर बिअर 7 टक्के आणि स्पिरिट्स 6 टक्क्यांनी वाढलं, तर वाइनची वाढ स्थिर राहिली आहे.

अमेरिकन व्हिस्कीमध्ये घट

अमेरिकन व्हिस्कीमध्ये 10 टक्क्यांनी घट पाहायला मिळाली आहे. कॅम्पबेल यांनी एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटल्यानुसार भारत पेय अल्कोहोल उद्योगासाठी सर्वात महत्वाच्या जागतिक बाजारपेठांपैकी एक बनत आहे. या वाढीचं श्रेय “सर्व श्रेणींच्या मागणीतील सातत्यपूर्ण वाढ आणि प्रीमियमीकरणाच्या स्थिर ट्रेंडला” दिलं.

रिपोर्टमध्ये पुढे सांगण्यात आलं आहे की, स्कॉच माल्टने भारतीय सिंगल माल्टपेक्षा काही प्रमाणात आघाडी घेतली, तर ब्लेंडेड स्कॉच स्थिर राहिली. तर फ्लेवर्ड व्होडकाने त्याचा वाढीचा ट्रेंड सुरुच आहे.