
Success Story : सध्या कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इन्टेलिजेन्सचे (एआय) जग आहे. एआयमध्ये रोज नवनवीन क्रांतीकारक बदल होत आहेत. याच बदलांचा वेध घेत तरुणांना आज चांगली नोकरी मिळवता येऊ शकते. एआयच्या जगात आज प्रत्येक महिन्याला कोट्यवधी रुपये कमवणारे तरूण-तरुणी आहेत. त्यांच्या यशोगाथा याआधीही तुम्ही ऐकल्या असतील. पण सध्या मात्र एआयच्या मदतीने अवघ्या 25 व्या वर्षी कोट्यधीश होणाऱ्या एका तरुणाची जगभरात चर्चा होत आहे. या तरुणाने त्याचा प्रवास Reddit या सोशल मीडिया मंचावर शेअर केला आहे.
या तरुणाने Reddit वर दिलेल्या माहितीनुसार वयाच्या 18 वर्षी त्याने करोडपती होण्याची स्वप्न पाहिले होते. मात्र तो 18 व्या वर्षी करोडपती होऊ शकला नाही. त्याचे हे स्वप्न अधुरे राहिल्यानंतर मी आता 40 वर्षांचा होईपर्यंत हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही, असे त्याला वाटू लागले. मात्र त्याने 21 व्या वर्षी नवनवीन कौशल्य शिकण्यास सुरुवात केली. त्याच्या याच मोहिमेत वयाच्या 22 व्या वर्षी त्याने फ्रिलान्सिंगच्या माध्यमातून एआय आणि मशीन लर्निंगच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. त्याने या क्षेत्रात मोठी मेहनत घेतली. एआय आणि मशीन लर्निंग शिकल्यानंतर त्याला वयाच्या 22 वर्षी अमेरिकेतून एक मोठा प्रोजेक्ट मिळाला. त्याच्या आयुष्यात हा टर्निंग पॉइंट ठरला. त्याने या काळात नवनवीन गोष्टी शिकणे चालूच ठेवल्या. परिणामी वयाच्या 25 वर्षी तो कोट्यधीश झाला.
मिळालेल्या कामाच्या जीवावरच तो अवलंबून नव्हता. त्याने आलेले पैसे इतरही ठिकाणी गुंतवले. त्याने 49 लाख रुपये म्युच्यूअल फंडात, 46 लाख रुपये अमेरिकेतील शेअर बाजारात, 5 लाख रुपये क्रिप्टो करन्सी तर 25 हजार रुपये सोन्यात गुंतवले. यातून त्याच्या पैशांचे मूल्य आणखी वाढले. दरम्यान हा तरुण आज करोडपती झालेला असला तरी त्याचे पाय जमिनीवरच आहे. मी भविष्यात आणखी मेहनत करणार आहे, असे त्यांने सांगितले आहे.
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)