फक्त झोपा, नेटफ्लिक्स पाहा आणि 25 लाख मिळवा, ‘या’ कंपनीची भन्नाट ऑफर

यूकेस्थित लक्झरी बेडिंग कंपनी क्राफ्टेड बेड्सने नेटफ्लिक्स पाहणे आणि झोपणे हे महत्त्वाचे काम असल्याचंही सांगितलेय. कंपनी UK मध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना 24,000 पौंड म्हणजेच 24,82,322.40 रुपये कमावण्याची संधी देतेय. अंथरुणावर झोपण्यासाठी आणि फक्त Netflix पाहण्यासाठी हे पैसे मिळत आहेत.

फक्त झोपा, नेटफ्लिक्स पाहा आणि 25 लाख मिळवा, 'या' कंपनीची भन्नाट ऑफर
प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्लीः पैसा कमावण्यासाठी लोक बरेच कष्ट करतात. रात्रंदिवस कष्ट करून त्यांना थोडेफार पैसे मिळतात. पण झोपण्याचेही पैसेही मिळाले तर कोणाला नको असतील. तेसुद्धा थोड थोडके नव्हे, तर थेट 25 लाख रुपये मिळतील. त्यामुळे आश्चर्यचकित होऊन जाऊ नका. लंडनस्थित एक कंपनी लोकांना झोपण्याच्या बदल्यात नेटफ्लिक्स बघून 25 लाख रुपये कमवण्याची संधी देते. क्राफ्टेड बेड्स असे या कंपनीचे नाव आहे.

नोकरीत काय करावे?

यूकेस्थित लक्झरी बेडिंग कंपनी क्राफ्टेड बेड्सने नेटफ्लिक्स पाहणे आणि झोपणे हे महत्त्वाचे काम असल्याचंही सांगितलेय. कंपनी UK मध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना 24,000 पौंड म्हणजेच 24,82,322.40 रुपये कमावण्याची संधी देतेय. अंथरुणावर झोपण्यासाठी आणि फक्त Netflix पाहण्यासाठी हे पैसे मिळत आहेत. कंपनी सध्या यासाठी अर्ज मंजूर करीत आहे. निवडलेल्या अर्जदारांना झोपण्यासाठी चांगले पैसे मिळतील. बॅड कंपनीने सांगितले की, आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम मॅट्रेस देण्यासाठी मॅट्रेस टेस्टरची स्थिती निर्माण करण्यात आलीय. कंपनीचे म्हणणे आहे की, जो कर्मचारी मॅट्रेस टेस्टर म्हणून काम करेल तो दर आठवड्याला नवीन चांगल्या दर्जाच्या मॅट्रेसची चाचणी घेईल. याशिवाय इतर काही जबाबदाऱ्या आणि नियम अस्तित्वात आहेत.

अर्ज करणार्‍या व्यक्तीला आठवड्यातून 37.5 तास घालवावे लागणार

या भूमिकेसाठी अर्ज करणार्‍या व्यक्तीला आठवड्यातून 37.5 तास घालवावे लागतील. मग त्याला गादी किती आरामदायक आहे हे कंपनीला सांगावे लागेल. कंपनी दर आठवड्याला नवीन गादी त्या व्यक्तीच्या घरी पाठवेल. तुम्हाला किती आरामदायक वाटते यावर त्या व्यक्तीला गादीचे मूल्यांकन करावे लागेल. तुम्ही आठवड्यातून साडेतीन तास झोपू शकता किंवा Netflix पाहू शकता.

कोण आणि कसे अर्ज करू शकतो?

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी व्यक्तीचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे. यासह ती व्यक्ती ब्रिटनची रहिवासी असणे आवश्यक आहे. हे अत्यावश्यक आहे की एखादी व्यक्ती कोणत्याही अडथळ्याशिवाय एकट्या गादीची चाचणी घेऊ शकते. याशिवाय रिव्ह्यू फॉर्म भरण्यासाठी तो लिहिण्याचे उत्तम कौशल्य असावे. तुम्हालाही नोकरीसाठी अर्ज करायचा असेल, तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. यासाठी कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर लिंक देण्यात आलीय. तुम्ही त्यावर क्लिक करू शकता.

संबंधित बातम्या

भारतातील पहिला ‘स्किल इम्पॅक्ट बॉण्ड’ लाँच; 50,000 तरुणांना होणार फायदा

EPFO Alert: …तर पीएफमध्ये आलेले व्याजाचे पैसे गायब होणार, चुकूनही हा नंबर शेअर करू नका

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI