AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Donald Trump : तांदळासाठी झगडा, ट्रम्प यांना जोरदार झटका, या देशाने 4800000 रुपयांची डील थांबवली

Rice Deal -Donald Trump : अमेरिकेला एक मोठा झटका बसला. आशियातील चीन, भारत या बड्या शक्तींशी ट्रम्प यांनी पंगा घेतलेला असतानाच आता इतर देश अमेरिकेच्या दादागिरीविरोधात उभे ठाकले आहे. 4800000 रुपयांची डील थांबवण्यात आली आहे.

Donald Trump : तांदळासाठी झगडा, ट्रम्प यांना जोरदार झटका, या देशाने 4800000 रुपयांची डील थांबवली
ट्रम्प यांना झटका
| Updated on: Aug 29, 2025 | 4:36 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जपानच्या दौऱ्यावर आहेत. त्याचवेळी एक मोठी घडामोड घडली. अमेरिकेाला थेट मॅसेज गेला. रात्रीतूनच जपान सरकारने असा आदेश काढला की ट्रम्प यांचा तिळपापड झाला. जपानच्या या खेळीमुळे 4800000 रुपयांची मोठी डील अमेरिकेच्या हातून निसटणार आहे. 550 अब्ज डॉलरची ही मेगा डील अचानक थांबवण्यात आली. गुंतवणूक करारासाठी जपानचे वाणिज्य सल्लागार रयोसेई अकाजावा हे गुरुवारी अमेरिकेला जाणार होते. पण अखेरच्या मिनिटांना त्यांचा दौरा रद्द झाला.

काय होता हा करार?

अमेरिकेने जपानवर 25 टक्के टॅरिफ लावले आहे. पण जर जपान अमेरिकेत 550 अब्ज डॉलरची गुंतवणूक करेल तर अमेरिका 15 टक्के टॅरिफ करेल असे आश्वासन देण्यात आले होते. त्यासाठी अकाजावा हे अमेरिकेला जाणार होते. पण त्याचवेळी ट्रम्प यांनी बेताल वक्तव्य केले. आता जपानने जी 550 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे, तो पैसा अमेरिकेचा आहे, आम्ही हवा तसा त्याचा वापर करू असे ट्रम्प म्हणाले. मग इथंचे ठिणगी पेटली. जपानने शेवटच्या टप्प्यात अकाजावा यांचा दौरा रद्द केला.

जपानच्या बाजारात अमेरिकेचा तांदुळ

तर टॅरिफ आडून अमेरिका जपानच्या कृषी जगतात घुसखोरी करू इच्छित होता. एक हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी ट्रम्प प्रयत्न करत होते. अमेरिकेचा तांदुळ जपानच्या बाजारात यावा यासाठी ट्रम्प यांचे प्रयत्न सुरू होते. जपानच्या शेतकऱ्यांचा या अमेरिकन तांदळाला विरोध आहे. जपानच्या बाजारात अमेरिकन तांदळाची आयात नको अशी मागणी मार्चपासून होत होती. पण टॅरिफ कमी करण्यासाठी जपान सरकार तयारही झाले होते. पण ट्रम्प यांनी भावना दुखावल्याने जपानने ऐन वेळी या कराराला वाटण्याच्या अक्षदा लावल्या. जपानी लोक हे चिकट भात खाण्यावर भर देतात. तांदळाशी जपानी लोकांचे सांस्कृतीक नाळ जोडलेली आहे. तांदळाविषयी या देशात आदरभाव आहे.

जपानमध्ये तांदळाची आयात होते. पण अमेरिकन तांदळाला सर्वाधिक विरोध आहे. टॅरिफ लावल्यापासून अमेरिकन तांदळाची आयात जपानने घटवली आहे. तर दुसरीकडे भारताच्या तांदळाची जपानमधील आयात गेल्या दोन वर्षात वाढलेली आहे. ही आयात जवळपास दुप्पट झाली आहे. गेल्या वर्षी जपानने भारताकडून $5.74 मिलियन (50,62,54,224 रुपये) तांदळाची खरेदी केली होती. आता पंतप्रधान मोदी हे जपानच्या दौऱ्यावर असताना ही घडामोड भारताच्या पथ्यावर पडेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत
Sunetra Pawar : शरद पवार यांना न सांगताच सुनेत्रा पवार मुंबईत.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत काय म्हणाले शरद पवार ?.
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार
सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत मला माहिती नाही - शरद पवार.
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली
Sharad Pawar : सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबद्दल शरद पवारांची पहिली.
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.