ना टाटा, ना इन्फोसिस…अदानी ग्रुप बनला भारताचा वेगाने वाढणारा ब्रँड, एका वर्षात 80% टक्के व्हॅल्यू वाढली

अदानी ग्रुप आता भारतातील सर्वात वेगाने वाढणारा ब्रँड आहे. टाटा ग्रुप अजूनही नंबर वन आहे, परंतु अदानी ग्रुप देखील वेगाने वाढत आहे.

ना टाटा, ना इन्फोसिस...अदानी ग्रुप बनला भारताचा वेगाने वाढणारा ब्रँड, एका वर्षात 80% टक्के व्हॅल्यू वाढली
| Updated on: Jun 27, 2025 | 8:05 PM

अदानी ग्रुप हा साल 2025 चा सर्वात वेगाने वाढणारा भारतीय ब्रँड ठरला आहे. अदानी ब्रँडचे मुल्य गेल्यावर्षीच्या 3.55 अब्ज डॉलरच्या तुलनेत यंदा सुमारे 80 टक्के वाढून या वर्षी 6.46 अब्ज डॉलर झाले आहे. ही वाढ 2.91 अब्ज डॉलर इतकी आहे. ही माहीती जगातल्या सर्वात मोठ्या लंडनस्थित ‘ब्रँड फायनान्स’ या ब्रँड व्हॅल्यूचे निरीक्षण करणाऱ्या कन्सल्टटन्सीने जाहीर केली आहे.

या वेगाने अदानी ग्रुपला भारताच्या टॉप ब्रँडमध्ये 16 वे स्थानावरून आता 13 व्या स्थानावर नेले आहे. हा वेग या ब्रँडचा मजबूत गती आणि टीकाऊ विकासाच्या प्रति समर्पण दर्शवित आहे. ब्रँड फायनान्सने म्हटले आहे की भारत आपल्या आर्थिक स्थितीला मजबूत करीत आहे. अशा वेळी या ब्रँडची कामगिरी केवळ त्याची मजबूती दर्शवत नसून भारतीय अर्थव्यवस्थेअंतर्गत भारतीय अर्थव्यवस्थेतील मोठ्या ट्रेंडचे प्रतिबिंब देखील दर्शवते.

अदानी ग्रुपच्या वाढीचे कारण

अदानीच्या ब्रँडच्या मुल्यात प्रभावशाली वाढ 82 टक्के आहे. हे एकात्मिक पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणे, हरित ऊर्जेच्या महत्त्वाकांक्षेत वाढ आणि प्रमुख भागधारकांमध्ये सुधारित ब्रँड इक्विटी या कारणांमुळे हे शक्य झाले आहे. ब्रँड फायनान्सच्या मते, ही वाढ बाजारातील गुंतागुंतींना तोंड देण्यासाठी ग्रुपचे रणनिती आणि लवचिकतेचे प्रतिबिंब आहे.

कोणत्या कंपनीची किती ब्रँड व्हॅल्यु

‘इंडिया 100’ 2025च्या रिपोर्टनुसार टॉप- 100 भारतीय ब्रँडचे एकूण ब्रँड व्हॅल्यू आता 236.5 अब्ज डॉलर आहे. भारताचा जीडीपी आर्थिक वर्ष 2025-26 साठी 6 ते 7 टक्क्यांदरम्यान वाढण्याचा अंदाज आहे. सार्वजनिक-खाजगी भागीदारी आणि मजबूत घरगुती मागणीने हे प्रेरित आहे.अशा परिस्थितीत, जागतिक आव्हाने असूनही, भारतीय ब्रँड संधींचा फायदा घेण्यासाठी चांगल्या स्थितीत आहेत.

टाटा ग्रुप याबाबतीत पुढे

टाटा ग्रुप सर्वात मूल्यवान ब्रँडच्या रुपात सर्वात पुढे आहे.टाटा कंपनीचा ब्रँड व्हॅल्यू आता 31.6 अब्ज डॉलर आहे, जो गेल्या वर्षीपेक्षा 10 टक्के अधिक आहे. त्यानंतर इन्फोसिस आणि HDFC ग्रुप आहे.यांचा ब्रँड व्हॅल्यू अनुक्रमे 16.3 अब्ज डॉलर आणि 14.2 अब्ज डॉलर आहे. अन्य ब्रँडमध्ये एलआयसी, एचसीएल टेक, लार्सन एण्ड टुब्रो ग्रुप आणि महिंद्रा ग्रुप यांचा समावेश आहे. या सर्वांच्या ब्रँड व्हॅल्यूतही वाढ झाली आहे. ताज हॉटेल्सचा सलग चौथ्या वर्षी भारताचा सर्वात मजबूत ब्रँड मानला गेला आहे.