Good News! आता एकच अकाऊंट 25 जणांमध्ये वापरा, Idea आणि Vodafone ची धमाकेदार ऑफर

| Updated on: Feb 18, 2021 | 9:04 AM

आता कंपनीने व्ही मोबाइल अॅपमध्ये (Vi Mobile App) आणखी एक धमाकेदार ऑफर आणली आहे.

Good News! आता एकच अकाऊंट 25 जणांमध्ये वापरा, Idea आणि Vodafone ची धमाकेदार ऑफर
Vi चे सुपरफास्ट स्पीड प्लॅन
Follow us on

मुंबई : व्होडाफोन आयडिया कंपनी ग्राहकांसाठी सतत नवीन खास सुविधा आणत असते. आता कंपनीने व्ही मोबाइल अॅपमध्ये (Vi Mobile App) आणखी एक धमाकेदार ऑफर आणली आहे. यामुळे आता एका अकाऊंटवर एकावेळी 25 लोक हे अॅप वापरू शकतात. म्हणजेच एकाने vi अॅपची सदस्यता घेतली तर तो त्यात आणखी 24 लोकांना जोडू शकतो. यामुळे सिनेमा आणि मालिका पाहणं खूपच सोपं झालं आहे. (adds up to 25 profiles users in vi mobile app can watch more movies and live tv channels together)

खरंतर, आधी व्होडाफोन – आयडिया मोबाईल अॅपध्ये सगळं कुटुंब प्रोफाईल तयार करून सुविधेचा लाभ घेऊ शकत होतं. तर Vi Movies आणि TV वर मनोरंजन पॅकेजचा आनंद घेऊ शकत होते. पण आता व्ही मोबाईल अ‍ॅपमध्ये 25 जण एकावेळी अॅप वापरू शकणार आहेत.

Vi मोबाइल अॅप करू शकता काम

व्होडाफोन-आयडिया सिम वापरणाऱ्या व्ही मोबाइल अॅपवर कुटुंब, मित्र आणि जवळचे सगळे मित्र या सुविधेचा लाभ घेऊ शकता. इतकंच नाहीतर वी मोबाइल अ‍ॅपवर बिले भरण्यासह रिचार्ज सुद्धा तुम्ही करु शकता.

मोफत बघा सिनेमा आणि सीरिअल

Vi मोबाईल अॅपमध्ये या खास सुविधेचा लाभ वोडाफोन आणि आयडिया दोन्ही कंपन्यांचे ग्राहक घेऊ शकता. यासोबतच Vi Mobile App आणि Colors, Zee TV आणि DD National सह अनेक लाईव्ह चॅनल्सही आहेत. तुम्ही ओटीपीच्या माध्यमातून या सुविधेचा आनंद घेऊ शकता. या व्यतिरिक्त कंपनीने Vi Movies आणि TV मध्ये आणखी कार्यक्रमांची भर घातली आहे.

अशा प्रकारे जोडा नवीन प्रोफाईल

टेलिकॉम टॉकच्या अहवालानुसार, तुम्ही तुमच्या मोबाईल क्रमांकावरून व्ही मोबाइल अॅपवर लॉग इन करू शकता. यानंतर यामध्ये 24 लोकांचं प्रोफाईल तुम्ही जोडू शकता. यामध्ये रिजार्ज, बिल भरणं, गेम्स, टीव्ही अशा अनेक सेवांचाही ग्राहक आनंद घेऊ शकता. (adds up to 25 profiles users in vi mobile app can watch more movies and live tv channels together)

संबंधित बातम्या – 

Petrol Diesel Price Today : शंभरी गाठूनही पुन्हा महागलं पेट्रोल-डिझेल, वाचा आजचे दर

बँकिंग क्षेत्रातली सगळ्यात मोठी चूक, सिटी बँकेने चुकून ट्रान्सफर केले 3650 कोटी आणि….

फ्लाईट बुकिंवर मिळवा थेट 1200 रुपयांची सूट, ICICI बँकेने शेअर केला ‘Promo Code’

(adds up to 25 profiles users in vi mobile app can watch more movies and live tv channels together)