AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today : शंभरी गाठूनही पुन्हा महागलं पेट्रोल-डिझेल, वाचा आजचे दर

आजही देशातल्या अनेक भागांमध्ये शंभरच्या पार इंधन पोहोचलं आहे. आज पेट्रोल डिझेलच्या दरात 34 पैशांपेक्षा वाढलं आहे.

Petrol Diesel Price Today : शंभरी गाठूनही पुन्हा महागलं पेट्रोल-डिझेल, वाचा आजचे दर
Petrol-Diesel Price Today
| Edited By: | Updated on: Feb 18, 2021 | 7:45 AM
Share

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये (Petrol Diesel Price Today) सातत्याने वाढ होत आहे. ऐन महागाईत गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे वावही वाढत आहे. आजही देशातल्या अनेक भागांमध्ये शंभरच्या पार इंधन पोहोचलं आहे. आज पेट्रोल डिझेलच्या दरात 34 पैशांपेक्षा वाढलं आहे. (Petrol Diesel Price Today Expensive petrol and diesel again today read the latest rates)

खरंतर, तेल कंपन्या रोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी करतात. त्यानुसार आज सलग दहाव्या दिवशी ही वाढ झाली आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये तर पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. दिल्लीत 34 पैसे वाढीसह 89.88 वर पोचलं तर मुंबईतील पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 96.32 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच मेट्रो शहरांमध्ये इंधनाच्या किंमती वाढल्याचं पाहायला मिळालं आहे.

दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलचे दरांनी कहर केला आहे. गुरुवारी दिल्लीतल्या अनेक शहरांमध्ये 30 ते 35 पैशांनी इंधनामध्ये वाढ झाली आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, गुरुवारी कोलकातामध्ये पेट्रोल 91.11 लिटर भाव आहे. डिझेलबद्दल बोलायचं झालं तर आज दिल्लीत डिझेल 80.27 रुपये प्रति लिटर दराने विकलं जात असून मुंबईत डिझेलचा दर प्रति लिटर 87.31 तर कोलकातामध्ये डिझेलचा दर प्रति लिटर 83.86 रुपये आहे.

प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर

नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 89.88 रुपये प्रति लिटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today): 96.32 रुपये प्रति लिटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today): 91.11 रुपये प्रति लिटर

पुणे (Pune Petrol Price Today) : 95.95 रुपये प्रति लिटर

प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 80.27 रुपये प्रति लिटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 87.32 रुपये प्रति लिटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 83.86 रुपये प्रति लिटर

पुणे (Pune Diesel Price Today) : 85.63 रुपये प्रति लिटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (Petrol Diesel Price Today Expensive petrol and diesel again today read the latest rates)

संबंधित बातम्या – 

परभणीत देशातील सर्वात महाग इंधन, पेट्रोल 98 रुपयांच्या पार, वाहनचालक त्रस्त

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीनं शंभरी गाठली, पुण्यात काँग्रेसचं मोदी सरकारविरोधात आंदोलन

(Petrol Diesel Price Today Expensive petrol and diesel again today read the latest rates)

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.