AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्लाईट बुकिंवर मिळवा थेट 1200 रुपयांची सूट, ICICI बँकेने शेअर केला ‘Promo Code’

बँक ग्राहकांना घरगुती उड्डाणांवर 10 टक्के सवलत देणार आहे. नेट बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

फ्लाईट बुकिंवर मिळवा थेट 1200 रुपयांची सूट, ICICI बँकेने शेअर केला 'Promo Code'
| Edited By: | Updated on: Feb 17, 2021 | 11:11 AM
Share

नवी दिल्ली : कोरोनाच्या या भीषण संकटानंतर आता तुम्हीही कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण ICICI Bank आपल्या ग्राहकांना आता एक ऑफर देत आहे. यामध्ये तुम्ही स्वस्तात हवाई सफर करू शकणार आहात. मिळालेल्या माहितीनुसार, बँक ग्राहकांना घरगुती उड्डाणांवर 10 टक्के सवलत देणार आहे. नेट बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. यासंबंधी एक ट्वीट करून बँकेने माहिती दिली आहे. (offers on flight ticket get 10 percent discount on domestic flights with icici bank promo code)

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, 29 मार्च 2021 पर्यंत प्रवासी या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. ICICI NetBanking वरून तुम्ही फिरण्यासाठी तिकीट बुक करू शकता. यामध्ये तुम्हाला घरेलू उड्डाणांवर 1200 रुपयांपर्यंतच डिस्काऊंट देण्यात आलं आहे. सगळ्यात खास म्हणजे तुम्ही दर रविवारी आणि सोमवारी या ऑफरचा लाभ घेऊ शकता. पण यासाठी तुमच्या खात्यामध्ये किमान व्यवहार 3500 रुपये असणं महत्त्वाचं आहे.

या वेबसाइटवरून करा बुकिंग

या ऑफरमध्ये वापरकर्ता फक्त एकदाच बुक करू शकतो अशी माहितीही बँकेकडून देण्यात आली आहे. तर ही ऑफर फक्त कन्फर्म बुकिंगवर लागू होईल. ऑफरचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना बुकिंग करतांना इंटरनेट बँकिंग वापरावं लागेल. Www.yatra.com या वेबसाईटवरून तुम्ही बुकिंग करू शकता.

या गोष्टी लक्षात असुद्या –

– बुकिंगच्या वेळी तुम्हाला प्रोमो कोडमध्ये ICICINB सबमिट करावा लागेल.

– बँकेने दिलेल्या अधिकृत BIN नंतर लगेचच सूट लागू होईल.

– जर कार्डची BIN सीरिज बँकेशी जुळली नाही तर तुम्ही बँकेशी संपर्क साधू शकता.

– रद्द झालेल्या तिकिटावर पुन्हा बुकिंगनंतर सूट लागू होणार नाही. (offers on flight ticket get 10 percent discount on domestic flights with icici bank promo code)

संबंधित बातम्या –

SBI देतेय महिन्याला 10000 रुपये कमावण्याची संधी, वाचा काय आहे नेमकी योजना?

Amazon, Flipkart वरून रोज कमावा 5,000 रुपये, धमाकेदार आहे ऑफर

Travel | स्वस्तही आणि मस्तही! चेन्नईमध्ये फिरण्याचा प्लॅन करताय, तर ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या!

Tour Package | IRCTCचे स्वस्तात ‘शिर्डी’ दर्शन, विमानातून सफर आणि प्रवासाठी एसी गाड्याही मिळतील!

(offers on flight ticket get 10 percent discount on domestic flights with icici bank promo code)

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.