शिर्डी आणि शनि शिंगणापूरला जाणाऱ्या भक्तांसाठी स्वस्तात पॅकेज, IRCTC कडून मोठी ऑफर

भारतील रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) आता तुमच्यासाठी एकास खास ऑफर आणली आहे. ज्यामध्ये तुम्ही कमी किंमतीत शिर्डी आणि शनि शिंगणापूर मनसोक्स भक्तीभावाने फिरू शकता.

शिर्डी आणि शनि शिंगणापूरला जाणाऱ्या भक्तांसाठी स्वस्तात पॅकेज, IRCTC कडून मोठी ऑफर
Shirdi Sai Temple
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 8:36 AM

नवी दिल्ली : जर तुम्ही यंदा मार्चमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर आपण शिर्डी आणि शनि शिंगणापूरला जाण्याचा एक चांगला पर्याय आहे. यातहीस . भारतील रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) आता तुमच्यासाठी एकास खास ऑफर आणली आहे. ज्यामध्ये तुम्ही कमी किंमतीत शिर्डी आणि शनि शिंगणापूर मनसोक्स भक्तीभावाने फिरू शकता. जाणून घेऊयात काय आहे IRCTC च्या या टूर पॅकेजची माहिती… (shirdi and shani shingnapur trip with irctc tour package check price and other details)

IRCTC च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रिप 13 मार्च 2021 पासून सुरू होणार आहे. टूर पॅकेज 1 रात्र आणि 2 दिवस आहे. यामध्ये विमानने प्रवास देण्यात आला आहे. दिल्लीपासून या प्रवासाला सुरुवात होणार आहे.

प्रवासाचं वेळापत्रक – 2 दिवसाच्या सहलीचं…

पहिला दिवस – दिल्ली विमानतळावरून 14:20 वाजता फ्लाईट (SG-887). 16:10 वाजता शिर्डी विमानतळावर पोहोचणार.

शिर्डी विमानतळावरून तुम्हाला एसी कारने हॉटेलवर घेऊन जाण्यात येईल.

यानंतर संध्याकाळी तुम्हाला शिर्डीमध्ये होणारे कार्यक्रम दाखवले जातील. तिथे तुम्ही साई बाबांचं दर्शनही कराल.

यानंतर रात्री तुम्हाला परत हॉटेलवर घेऊन जाण्यात येईल.

दुसरा दिवस-

दुसर्‍या दिवशी नाश्ता उरकल्यानंतर तुम्ही शिंगणापूरसाठी निघाल. तिथे दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला पुन्हा हॉटेलवर नेऊन लंच आणि नंतर तुम्ही चेकआऊट कराल.

यानंतर दुपारी 3 वाजता शिर्डी विमानतळावर तुम्ही पोहोचाल. तिथून तुम्हाला दिल्लीसाठी फ्लाईट मिळेल. शिर्डीहून दिल्ली (एसजी -888) ची फ्लाईट संध्याकाळी 16:40 वाजता आहे. संध्याकाळी 18:30 वाजता तुम्ही दिल्ली विमानतळावर पोहोचाल.

या सहलीसाठी किती होणार खर्च ?

वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, या पॅकेजसाठी तुम्हाला 13,625 रुपये मोजावे लागणार आहेत. यामध्ये फ्लाइटच्या खर्चापासून ते हॉटेल्स, ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरपर्यंतच्या सर्व गोष्टींचा समावेश आहे. तर कोणत्याही कोणत्याही नैसर्गिक किंवा सामाजिक इजा झाल्यास त्याला आपण जबाबदार असणार नाही, असं आयआरसीटीसीनं स्पष्टपणे सांगितलं आहे.

शिर्डी साई बाबा मंदिरासाठी कोविड -19 चे नियम

अधिक माहितीनुसार, शिर्डी इथे दर्शनासाठी जाणाऱ्या लोकांना मंदिरातल्या गेटवर / आणि शिर्डी विमानतळावर कोरोना निगेटिव्ह असल्याचा RT-PCR रिपोर्ट दाखवावा लागणार आहे. यासोबत शासनाने मंजूर केलेला आयडी प्रूफ सर्व भाविकांसाठी अनिवार्य आहे. इतर माहितीसाठी तुम्ही आयआरसीटीसी https://www.irctctourism.com च्या अधिकृत वेबसाईटवर लॉगइन करू शकता. (shirdi and shani shingnapur trip with irctc tour package check price and other details)

संबंधित बातम्या – 

Indian railways : रेल्वे देत आहे स्वस्तात तिरूपति फिरण्याची ऑफर, आताच करा ‘या’ कोडसह बुकिंग

Vacation Trip | ‘वन डे’ पिकनिकची योजना आखताय? मग, पुण्याजवळील ‘या’ वॉटर पार्कला नक्की भेट द्या!

IRCTC Tour Package | अवघ्या 5 हजार रुपयांत करा वडोदरातल्या ‘या’ सुंदर ठिकाणांची सफर…

(shirdi and shani shingnapur trip with irctc tour package check price and other details)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.