AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian railways : रेल्वे देत आहे स्वस्तात तिरूपति फिरण्याची ऑफर, आताच करा ‘या’ कोडसह बुकिंग

जर तुम्हीही एप्रिल महिन्यात कुठेतरी फिरण्याचा प्लॅन करत असाल तर आज तुम्हाला आम्ही खास बातमी सांगणार आहोत.

Indian railways : रेल्वे देत आहे स्वस्तात तिरूपति फिरण्याची ऑफर, आताच करा 'या' कोडसह बुकिंग
| Edited By: | Updated on: Feb 12, 2021 | 8:35 AM
Share

नवी दिल्ली : कोरोनाच्या कठीण काळात आता कुठे आपलं मानसिकरित्या स्थिर होत असताना सगळं पुर्वीसारखं झाल्याचं वाटत आहे. अशात अनेकजण निसर्गाचा आनंद घेण्याचा ठरवतात आणि फिरण्याचा प्लॅन करतात. जर तुम्हीही एप्रिल महिन्यात कुठेतरी फिरण्याचा प्लॅन करत असाल तर आज तुम्हाला आम्ही खास बातमी सांगणार आहोत. आयआरसीटीसीकडून एका उत्तम ऑफर देण्यात आली आहे. ज्यामध्ये तुम्ही कुठलीही काळजी न करता स्वस्तात प्रवास करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा प्रवास एक रात्र आणि दोन दिवसांचा असणार आहे. जाणून घेऊयात नेमकी काय आहे खास योजना. (indian railways offer to visit tirupati in cheap rates with family here is the check date details here)

आयआरसीटीसीने तिरुपतीला फिरण्यासाठी जाण्याची प्रवाश्यांसाठी खास ऑफर आणली आहे. तिरुपती हे आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात सगळ्यात लोकप्रिय मंदिर आहे. तिरुपतींना तिरुमाला म्हणूनसुद्धा ओळखलं जातं. जे भगवान विष्णू यांना समर्पित श्री वेंकटेश्वर मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.

किती होणार खर्च ?

या योजनेबद्दल सगळ्यात खास म्हणजे या सहलीमध्ये तुम्हाला प्रवासासोबतच राहण्याचीही सोय करू देण्यात आली आहे. आता या सहलीसाठी जर तुम्ही एकटेच जाणार असाल तर तुम्हाला 16000 रुपये मोजावे सागणार आहेत. तर या व्यतिरिक्त जर तुम्ही दोन लोकांसोबत गेलात तर त्यासाठी तुम्हाला 14200 रुपये द्यावे लागतील आणि तुम्ही जर तीन लोकांसोबत गेलात तर तुम्हाला 14100 रुपये द्यावे लागणार आहेत.

लहान मुलांचा किती होईल खर्च ?

या सहलीसाठी जर तुमच्यासोबत 5 ते 11 वर्षांचं मूल असेल तर पलंगासह मुलास 13200 रुपये द्यावे लागतील. इतकंच नाही तर तुम्हाला बेडिंगमध्ये मुलासाठी 12900 रुपयेही खर्च करावा लागेल. अशात जर तुमच्या मुलाचं वय 2 ते 4 वर्षांच्या आत असेल तर तुम्हालाया यासाठी 12900 रुपये मोजाले लागणार आहेत.

तुम्ही ‘या’ तारखांना फिरण्यासाठी जाऊ शकता

या सहलीमध्ये फिरण्यासाठी तुम्ही 10 एप्रिल 2021, 17 एप्रिल 2021, 24 एप्रिल 2021, 1 मे 2021, 8 मे 2021, 15 मे 2021, 22 मे 2021 आणि 29 मे 2021 रोजी फिरण्यासाठी निघू शकता. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पॅकेजचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला बुकिंगच्या वेळी Code:WMA17 वापरावा लागेल. तरच तुम्ही बुकिंग करू शकता.

यासाठी तुम्ही अधिकृत आणि पक्की माहिती मिळवण्यासाठी या https://www.irctctourism.com/tourpackageBooking?packageCode=WMA17 लिंकवर जा. यामध्ये तुम्हाला सर्व पश्नांची उत्तरं मिळतील. (indian railways offer to visit tirupati in cheap rates with family here is the check date details here)

संबंधित बातम्या – 

Petrol Price : राज्यात आज पेट्रोल स्वस्त की महाग? वाचा तुमच्या शहरातले दर

Travel | पर्यटनाला चालना देण्यासाठी ‘या’ राष्ट्रीय उद्यानात पहिल्यांदाच सायकल सफारी! तुम्हीही घेऊ शकता आनंद…

Travel | IRCTCची ‘रामायण यात्रा’, स्वस्तात करता येणार ‘या’ धार्मिक स्थळांची सफर!

Special Story | महाराष्ट्रातलं ‘कैलास’, सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं ‘भीमाशंकर

(indian railways offer to visit tirupati in cheap rates with family here is the check date details here)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.