Travel | IRCTCची ‘रामायण यात्रा’, स्वस्तात करता येणार ‘या’ धार्मिक स्थळांची सफर!

ही यात्रा एक प्रकारचे हॉलिडे पॅकेज आहे, ज्यात आयआरसीटीसी भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांचे दर्शन घडवणार आहे.

Travel | IRCTCची ‘रामायण यात्रा’, स्वस्तात करता येणार ‘या’ धार्मिक स्थळांची सफर!
आयआरसीटीसी भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांचे दर्शन घडवणार आहे.
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 1:24 PM

मुंबई : आयआरसीटीसी रेल्वे व विमान तिकिटांसोबतच अनेक हॉलिडे पॅकेजेस देखील पुरवते. अशाच एका पॅकेजमध्ये आयआरसीटी ‘रामायण यात्रा’ घडवणार आहे. ही यात्रा एक प्रकारचे हॉलिडे पॅकेज आहे, ज्यात आयआरसीटीसी भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांचे दर्शन घडवणार आहे. जर तुम्हालाही भगवान रामाशी संबंधित असलेल्या या धार्मिक स्थळांना भेट द्यायची असेल, तर हे हॉलिडे पॅकेज तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या पॅकेजमध्ये आपण सहजपणे आणि कमी खर्चात अनेक ठिकाणी फिरू शकता (IRCTC holiday tour Ramayan Yatra Package).

या रामायण यात्रेमध्ये अयोध्याचाही समावेश असणार आहे. तसेच, राम मंदिर बांधण्यात येत असलेल्या ‘रामजन्मभूमी’ ठिकाणालाही तुम्ही भेट देता येईल. याशिवाय अयोध्येच्या अलाना नंदीग्राम, प्रयाग, चित्रकूट यासारख्या ठिकाणीही प्रवाशांना फिरवले जाईल. अशा परिस्थितीत आपल्याला या पॅकेजशी संबंधित खास वैशिष्ट्ये माहित असणे गरजेचे आहे. चला तर, जाणून घेऊया ‘या’ हॉलिडे पॅकेजची वैशिष्ट्ये :

कोणती ठिकाणे असतील सामील?

या रामायण यात्रेमध्ये अयोध्या, नंदीग्राम, प्रयागराज, श्रृंगेरपूर, चित्रकूट या ठिकाणी फिरता येणार आहे. यात प्रवाश्यांसाठी बाथ, आश्रम दर्शन करण्याचीही व्यवस्था आयआरसीटीसी करणार आहे.

किती दिवसांचा असेल हा प्रवास?

ही संपूर्ण ट्रिप 6 दिवस, 5 रात्रीची असेल. या सहलीमध्ये तुमचा मुक्काम, प्रवास, जेवणाचा खर्चही आयआरसीटीसी देईल.

कुठून सुरु होणार प्रवास?

या पॅकेजमध्ये आपण इंदूर, देवास, उज्जैन, शुजालपूर, शेहोर, संत हिरडाराम नगर, विदिशा, बीना, झांसी येथून प्रवास सुरू करू शकता. तसेच आपण याच स्थानकांवर आपला प्रवास पूर्ण देखील करू शकता. मध्य प्रदेशातील लोकांसाठी ही यात्रा फार सोपी ठरणार आहे (IRCTC holiday tour Ramayan Yatra Package).

किती खर्च येईल?

या संपूर्ण पॅकेजमध्ये 5670 रुपयांसह काही अतिरिक्त खर्च देखील असतील. अशा परिस्थितीत संपूर्ण प्रवासासाठी तुम्हाला 6930 रुपये मोजावे लागतील. ज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ट्रेनमार्गे जाता येईल. तुमची सर्व व्यवस्था त्यातही केली जाईल. तसेच, जर तेथे 5 वर्षांपेक्षा जास्त वयाचे मूल असेल, तर आपल्याला तिकीटाची संपूर्ण रक्कम द्यावी लागेल.

कसे बुक कराल तिकीट?

आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपण या यात्रेचे तिकीट बुक करू शकता. किंवा आपण थेट या लिंकवर क्लिक करून देखील पॅकेज बुक करू शकता. यात आपण कोणतीही अतिरिक्त सुविधा निवडल्यास त्यासाठी आपल्याला स्वतंत्रपणे पैसे द्यावे लागतील.

प्रवास कधी सुरू होईल?

26 फेब्रुवारीपासून हा यात्रा प्रवास सुरू होईल. म्हणजेच, आता तिकीट बुक करण्यासाठी तुमच्याजवळ केवळ 25 दिवस शिल्लक राहिले आहेत. यामध्ये हॉटेल, मुक्काम, जेवणाचे स्वतंत्र बुकिंग करण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त एकाच ठिकाणी पैसे द्यावे लागतील. याशिवाय सर्व व्यवस्था देखील आयआरसीटीसी करणार आहे.

(IRCTC holiday tour Ramayan Yatra Package)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.