Amazon, Flipkart वरून रोज कमावा 5,000 रुपये, धमाकेदार आहे ऑफर

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Feb 16, 2021 | 11:44 AM

Amazon, Flipkart आणि Snapdeal सारख्या ई-कॉमर्स कंपन्यां त्यांच्यासोबत काम करण्याची एक उत्तम संधी देत आहेत.

Amazon, Flipkart वरून रोज कमावा 5,000 रुपये, धमाकेदार आहे ऑफर

नवी दिल्ली : कोरोनाच्या भीषण संकटानंतर जर तुम्ही कामाच्या शोधत असाल किंवा तुम्हाल बिझनेस आयडिया हवी असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण, Amazon, Flipkart आणि Snapdeal सारख्या ई-कॉमर्स कंपन्यां त्यांच्यासोबत काम करण्याची एक उत्तम संधी देत आहेत. तुम्ही या कंपन्यांसाठी प्रॉडक्ट डिलिव्हरीचं काम करू शकता. या व्यवसायातून ई-कॉमर्स कंपनीतून तुम्हाला दिवसाला 5 हजार रुपये कमावण्याची संधी आहे. (business idea join amazon flipkart logistic partner and earn rs 5000 per day)

ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये (E-commerce companies) डिलिव्हरी कंपनी म्हणून तुम्हाला काम करावं लागणार आहे. यासाठी तुम्हाला या कंपन्यांचे लॉजिस्टिक पार्टनर व्हावं लागेल. अधिक माहितीनुसार, तुम्ही सुरुवातीला यामध्ये काही गुंतवणूक करू शकता. जसं की वाहने (दुचाकी, तीन चाकी आणि चारचाकी) यांची व्यवस्था करावी लागेल. यासाठी तुम्हाला एका दुकानाचीही गरत असणार आहे.

दुकान घेणं आहे फायद्याचं

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही एकूण खर्चाचा विचार केला तर तुम्हाला तब्बल 2 लाख रुपये खर्च येईल. तुम्ही कमी खर्चातही व्यवसाय करून नंतर गुंतवणूक वाढवू शकता. आता दुकान घेण्याचा फायदा असा की तुम्हाला एकावेळी अनेक ई-कॉमर्स कंपन्यांचे लॉजिस्टिक पार्टनर बनून काम पाहता येईल.

असा वाचवा तुमचा खर्च

या व्यवसायामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे डिलिव्हरी बॉईज. यासाठी तुम्ही फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर किंवा पोस्टर छापून जाहिरात करू शकता. यासाठी लागणाऱ्या वाहनांनाही तुम्ही भाडे तत्वावर घेऊ शकता. किंवा अशा तरुणांना शोधा ज्यांच्याकडे आधीच कार बाईक आहे. इतकंच नाही तर तुम्ही इंधनाचा खर्चही त्यांना करायला सांगून तसं पॅकेज द्या. अशा प्रकारे तुम्ही दुचाकी, इंधन खर्च आणि देखभाल या खर्चापासून वाचाल.

रोज कमवाल 5000 पेक्षा जास्त पैसे

जर तुम्ही अगदी पद्धतशीर आणि बचतीच्या दृष्टीने व्यवसाय सुरू केला तर या ई-कॉमर्सच्या वेबसाइटवरून तुम्ही रोज 5,000 रुपये आणि दर महिन्याला तब्बल 1,50,000 रुपये कमवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी पाच कंपन्यांचे लॉजिस्टिक पार्टनर तुम्ही बनू शकता. यामुळे तुमचा मासिक उत्पन्नाचा आकडा 7 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल. (business idea join amazon flipkart logistic partner and earn rs 5000 per day)

संबंधित बातम्या – 

नोकरदारांसाठी मोठी बातमी, EPFO लवकरचं 2020-21 च्या व्याजदराबाबत घोषणा करणार

Alert! 31 मार्च करा ‘हे’ महत्त्वाचं काम, अन्यथा खात्यातून पैसे नाही निघणार

बसल्या बसल्या डोकं लावलं, ‘कम्युनिटी लिविंग’चा बिझनेस उभारला, तीन मित्रांचा 40 कोटीचा डोलारा!

एक छोटीशी सुरुवात आणि 2.50 लाख तुमच्या खिशात, डबल फायद्याचा आहे ‘हा’ बिझनेस

(business idea join amazon flipkart logistic partner and earn rs 5000 per day)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI