AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alert! 31 मार्च करा ‘हे’ महत्त्वाचं काम, अन्यथा खात्यातून पैसे नाही निघणार

सध्याच्या सगळ्या आर्थिक आणि बँकेशी निगडिक व्यवयायामध्ये पॅनकार्ड महत्त्वाचं असतं.

Alert! 31 मार्च करा 'हे' महत्त्वाचं काम, अन्यथा खात्यातून पैसे नाही निघणार
विविध 12 भाषांमध्ये मोबाईल App - या Appसाठी भाषेची काही अडचण नाही. कारण देशातील विविध 12 भाषांमध्ये हे App उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. त्यात इंग्रजी भाषेचा समावेश तर आहेच.
| Edited By: | Updated on: Feb 16, 2021 | 11:04 AM
Share

मुंबई : आधार कार्ड आणि पॅन (PAN) म्हणजे कायमस्वरूपी खातं क्रमांक यालाच स्थायी खाते क्रमांकही म्हणतात. सध्याच्या सगळ्या आर्थिक आणि बँकेशी निगडिक व्यवयायामध्ये पॅनकार्ड महत्त्वाचं असतं. मग ते एखाद्या बँकेत खातं उघडण्याचं काम असो किंवा व्यवसाय सुरू करण्यापर्यंत पॅनकार्ड सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आहे. PAN नंबरद्वारे केलेले आर्थिक व्यवहार वैध मानले जातात. अनेक यामुळे मोठी फसवणूकही टाळता येते. (how to link aadhaar card and pan card to bank accounts before 31 march 2021 know how to link aadhaar)

सध्या पॅन नंबरला आधार क्रमांकाशी जोडण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2021 आहे. तुम्ही अद्याप तुमचा पॅन आधारशी लिंक केलेला नसेल तर आधी हे काम करा. अन्यथा 31 मार्चनंतर, ज्यांना पॅन आधारशी जोडलं जाणार नाही त्यांचे पॅनकार्ड 1 एप्रिल 2021 पासून डिअॅक्टिव्हेट केलं जाईल.

एकदा का जर तुमचं पॅनकार्ड बंद झालं तर ते पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल. हल्ली इनकम टॅक्स रिटर्न (आयटीआर) दाखल करण्यासाठी, पॅन कार्जसह आधार क्रमांक देणंसुद्धा आवश्यक असणार आहे. याची शेवटची तारीख 30 जून 2020 होती, जी 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे तातडीने हे काम करून घ्या.

पॅनकार्ड होऊ शकतं बाद किंवा आकारला जाऊ शकतो दंड

पॅनकार्ड आधारशी लिंक न केल्यास ते बाद ठरते. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2021 नंतर कोणतेही बाद झालेले पॅनकार्ड जर तुम्ही वापरले तर प्राप्तिकर कलम 272 बी अंतर्गत 10,000 रुपये दंड आकारला जातो. त्यामुळे जर करदात्यांनी 31 मार्चपर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक केलं नाही तर पॅनकार्ड बाद होऊ शकतं.

पॅनकार्ड रद्द झालं तर काय अडचणी येतील?

जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल, पण ते आधारशी लिंक नसेल तर ते अवैध ठरवले जाईल आणि त्याचा काही उपयोग होणार नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची आधार योजना घटनात्मक वैध म्हणून घोषित केली होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैध पॅन कार्डशिवाय रिटर्न भरणंदेखील शक्य नाही.

पॅनकार्ड कसे जोडाल आधार कार्डशी?

– आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर लॉगइन करा.

– इथे तुम्हाला आधार लिंक करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.

– त्यानंतर तुमचा पॅन नंबर, आधार क्रमांक, तुमचे नाव खाली असलेल्या बॉक्समध्ये भरा.

– यानंतर कॅप्चा कोड काळजीपूर्वक पाहा आणि बॉक्समध्ये भरा.

– सर्व माहिती भरल्यानंतर आधारशी लिंक अशा पर्यायावर क्लिक करा. (how to link aadhaar card and pan card to bank accounts before 31 march 2021 know how to link aadhaar)

संबंधित बातम्या – 

एफडीमधून भरघोस रिटर्न मिळण्याच्या खास टीप्स, धमाकेदार आहे प्लॅन

बंपर ऑफर! Jio चे चार असे प्लॅन ज्यामध्ये मिळेल अनलिमिटेड कॉलिंग आणि 4G इंटरनेट डेटा

Petrol Price Today : राज्यात आजही महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल महागलं, वाचा ताजे दर

(how to link aadhaar card and pan card to bank accounts before 31 march 2021 know how to link aadhaar)

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल