बंपर ऑफर! Jio चे चार असे प्लॅन ज्यामध्ये मिळेल अनलिमिटेड कॉलिंग आणि 4G इंटरनेट डेटा

आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशा चार पॉप्युलर योजनांविषयी सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड डेटासोबत मोफत व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएसची सुविधाही मिळणार आहे.

बंपर ऑफर! Jio चे चार असे प्लॅन ज्यामध्ये मिळेल अनलिमिटेड कॉलिंग आणि 4G इंटरनेट डेटा
रिलायन्स जिओचे तीन सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान

मुंबई : जीओ कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच ऑफर खास आणत असते. खरंतर, कंपनीने असे अनेक प्लॅन्स आणि ऑफर दिल्या आहेत. ज्याबद्दल बहुतेक वापरकर्त्यांना माहिती नसते. आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशा चार पॉप्युलर योजनांविषयी सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड डेटासोबत मोफत व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएसची सुविधाही मिळणार आहे. (reliance jio unlimited data voice calling and free sms plans starting with rs 129 here is all details)

या योजनांची सुरुवाती किंमत 129 रुपये आहे. ज्यामध्ये तुम्हाला 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. तर इतर चार योजनांमधली शेवटची योजना 555 रुपयांपर्यंत आहे. यामध्येही तुम्ही 84 दिवसांसाठी लाभ घेऊ शकता. जाणून घेऊयात अशा योजनेबद्दल

129 रुपयांची जिओची योजना

जिओने दिलेल्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 2 जीबी डेटा मिळणार. यामध्ये तुम्ही Jio ते Jio अनलिमिडेट कॉलिंग सुविधा, Jio ते नॉन Jio नेटवर्कसाठी 1000 मिनिटं अशी ऑफर देण्यात आली आहे. इतकंच नाहीतर यामध्ये 300 एसएमएस आणि जिओ अॅप्सदेखील वापरता येणार आहेत.

जिओची 149 रुपयांची योजना

या खास योजनेमध्ये तुम्हाला रोज एक जीबी डेटा मिळेल. या योजनेची व्हॅलिडिटी 24 दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिडेट कॉलिंगची सुविधाही देण्यात आली आहे.तर तुम्ही रोज 100 एसएमएससह अनेक अ‍ॅप्सही वापरू शकता.

199 मध्ये जिओचा प्लॅन

जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे. याशिवाय तुम्हाला दररोज 1.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएसही करता येणार आहेत. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि अनेक अ‍ॅप्सही वापरता येतील.

Jio चा 555 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनमध्ये तुम्हाला दिवसाला 1.5 जीबी डेटा मिळेल. म्हणजेच तुम्ही 84 दिवसांत एकूण 126 जीबी डेटा वापरू शकता. रोजचा डेटा संपल्यानंतर तुम्हाला 64 केबीपीएसच्या वेगाने इंटरनेट मिळेल. यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, रोज 100 एसएमएस करता येतील. (reliance jio unlimited data voice calling and free sms plans starting with rs 129 here is all details)

संबंधित बातम्या – 

Petrol Price Today : राज्यात आजही महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल महागलं, वाचा ताजे दर

FD Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘या चार’ बँकांची बंपर ऑफर, मुदत ठेवीवर देतायत जादा व्याज, वाचा सविस्तर

(reliance jio unlimited data voice calling and free sms plans starting with rs 129 here is all details)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI