एफडीमधून भरघोस रिटर्न मिळण्याच्या खास टीप्स, धमाकेदार आहे प्लॅन

खासकरून महागाई दराच्या (Inflation) तुलनेत एफडी रिटर्न शुन्यावर गेला आहे असं म्हणायला हरकत नाही.

एफडीमधून भरघोस रिटर्न मिळण्याच्या खास टीप्स, धमाकेदार आहे प्लॅन
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 8:16 AM

नवी दिल्ली : बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिट (FD) करणं हा गुंतवणूकदारांसाठी (Investment Option) सगळ्यात सुरक्षित, सोपा आणि भरघोस रिटर्न देणारा प्लॅन ठरला आहे. पण आता व्याजदर घसरत (Low Interest Rates) असताना लोकांना आकर्षक रिटर्न मिळणं कठीण झालं आहे. खासकरून महागाई दराच्या (Inflation) तुलनेत एफडी रिटर्न शुन्यावर गेला आहे असं म्हणायला हरकत नाही. यामुळे आता गुंतवणुकीसाठी गॅरंटी रिटर्न (Guaranteed Return) मिळेल अशा ठिकाणी सेव्हिंग्ज करणं महत्त्वाचं आहे. (get guaranteed return from fd tax benefits and life insurance here is the tips)

म्‍युच्युअल फंड (MF), बॉन्ड (Bonds), पीपीएफ (PPF) यांसारख्या अनेक खास गुंतवणूक योजना बाजारात उपलब्ध आहेत. पण गुंतवणूकदार अधिक काळासाठी म्हणजे 20-25 वर्षांपर्यंत चांगलं उत्पन्न मिळेल अशा शोधात आहे. यामुळे ग्राहकांसाठी गॅरंटी रिटर्न पॉलिसी अत्यंत महत्त्वाची आहे. यामध्ये एफडीकडून चांगला रिटर्न मिळतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो टॅक्स फ्री असतो. यामध्ये जीवन विमासुद्धा उपलब्ध आहे.

विम्याच्या पैशाच्या 10 वेळा रिस्क कव्हर

– गॅरंटीड रिटर्न प्लॅनमध्ये गुंतवणूक करणार्‍याला वार्षिक प्रीमियमच्या दहा पट रिस्क कव्हर मिळतो. म्हणजे, जर एखाद्या व्यक्तीने वार्षिक 2 लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि मध्येच त्याचा मृत्यू झाला तर, त्याच्या कुटुंबियांना यामध्ये 20 लाख रुपये मिळतील.

ना आधी कर, ना मॅच्युअरिटी रिटीनंतर

– गॅरंटीड रिटर्न योजना ही संपूर्ण टॅक्स फ्री आहे. यामध्ये गुंतवलेल्या पैशांवर आणि मुदतपूर्तीच्या रक्कमेवर कोणताही कर आकारला जात नाही.

– सकरारी क्षेत्रातील बँकांकडून देण्यात आलेल्या दीर्घ मुदतीच्या ठेवीवर व्याज दर 5.4 टक्के आहे.

– गॅरंटीड रिटर्नमध्ये 30 वर्षांच्या व्यक्तीने पॉलिसीची मुदत 30 वर्षांच्या सेवानिवृत्ती फंडासाठी महिन्याला 5 हजार रुपये गुंतवला तर त्याला एकरकमी 50 लाख रुपये मिळू शकतात.

– पीपीएफमध्ये 20 वर्षांपूर्वी व्याज दरवर्षी 11-12 टक्के होते. आता हे फक्त 7.1 टक्के व्याज देत आहे.

– देश वेगाने विकसित अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करीत आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांत हे व्याजदर 3-5 टक्क्यांनी घसरतील अशी अपेक्षा आहे. (get guaranteed return from fd tax benefits and life insurance here is the tips)

संबंधित बातम्या – 

बंपर ऑफर! Jio चे चार असे प्लॅन ज्यामध्ये मिळेल अनलिमिटेड कॉलिंग आणि 4G इंटरनेट डेटा

Petrol Price Today : राज्यात आजही महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल महागलं, वाचा ताजे दर

FD Interest Rate | ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘या चार’ बँकांची बंपर ऑफर, मुदत ठेवीवर देतायत जादा व्याज, वाचा सविस्तर

(get guaranteed return from fd tax benefits and life insurance here is the tips)

Non Stop LIVE Update
कलंकित, वाया गेलेला मंत्री; जालन्यातून जरांगेंची पुन्हा भुजबळांवर टीका
कलंकित, वाया गेलेला मंत्री; जालन्यातून जरांगेंची पुन्हा भुजबळांवर टीका.
वयाच्या 48व्या वर्षी प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल चौथ्यादा करणार लग्न?
वयाच्या 48व्या वर्षी प्रमोद महाजनांचा मुलगा राहुल चौथ्यादा करणार लग्न?.
भाजपच्या स्क्रिप्टनुसार शिंदे बोलतात, मुख्यमंत्र्यांवर कुणाची टीका
भाजपच्या स्क्रिप्टनुसार शिंदे बोलतात, मुख्यमंत्र्यांवर कुणाची टीका.
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही.
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?.
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा.
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं..
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्....
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?.