बसल्या बसल्या डोकं लावलं, ‘कम्युनिटी लिविंग’चा बिझनेस उभारला, तीन मित्रांचा 40 कोटीचा डोलारा!

गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण वातावरणाकडे, ग्रामीण जीवनशैलीकडे लोकांचा कल वाढत चालला आहे.

बसल्या बसल्या डोकं लावलं, 'कम्युनिटी लिविंग'चा बिझनेस उभारला, तीन मित्रांचा 40 कोटीचा डोलारा!
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 4:56 PM

हैदराबाद : गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण वातावरणाकडे, ग्रामीण जीवनशैलीकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. लोक त्यांच्या जीवनशैलीमध्ये निसर्गाचा देखील समावेश करु लागले आहेत, ज्यात किचन फार्मिंगपासून ते जेवणात ऑर्गॅनिक पदार्थांचा वापर वाढला आहे. तसेच लोक खेड्यांमध्ये फिरण्याला प्राधान्य देऊ लागले आहेत. कोरोना विषाणूमुळे, वर्क फ्रॉम होम संस्कृती देखील वाढत आहे. बरेच लोक शहरातील धकाधकीचं जीवन बाजूला सारुन गावांमध्ये जाऊन काम करु लागले आहेत. (Know about Community living business in which 3 people started Naandi project for life with nature)

निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची आणि फिरण्याची आवड वाढू लागली आहे. नागेश बटुला आणि विजय दुर्गा या दोन वास्तुविशारदांनी (आर्किटेक्ट) ही प्रथा व्यवसायात आणली आहे. त्यांनी या ट्रेण्डचा व्यवसाय सुरु केला आहे. त्यांनी लोकांच्या मागणीनुसार रिअल इस्टेट प्रोजेक्ट तयार केला आहे. यामध्ये तुम्ही शहरात मिळणाऱ्या सुविधांसह गावाशी जोडलेले असता. या प्रकल्पात राहणाऱ्या लोकांना त्यांची खासगी स्पेस मिळतेच, सोबत ते निसर्गाच्या सानिध्यात राहतात.

वास्तविक, लोक निसर्गाच्या सानिध्यात राहणे पसंत करतात, जिथे पूर्णपणे ग्रामीण वातावरण आहे आणि लोक त्यांच्या चांगल्या आणि पक्क्या घरात राहतात. याला कम्युनिटी लिविंग असे नाव दिले जात आहे, ज्यात लोक यांत्रिकीकृत जगापासून वेळ काढून लोकांसह निसर्गाच्या सानिध्यात राहतात. असाच एक प्रकल्प नागेश आणि विजयसह राजेंद्र कुमार यांनी बनवला आहे. या प्रोजेक्टअंतर्गत त्यांनी एका छोट्याशा आणि हिरव्यागार गावाची रचना केली आहे. जेणेकरुन लोकांना निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडेल.

काय आहे प्रकप्ल?

नागेश, विजय आणि राजेंद्र या तीन जणांनी हा गृहनिर्माण प्रकल्प तयार केला आहे, ज्यामध्ये लोकांना राहण्यासाठी घरे उपलब्ध करुन देण्यात येतील. सोबतच यामध्ये वीकेंड फार्मिंगचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पाची छायाचित्रे पाहिल्यानंतर, लोक निसर्गाच्या सानिध्यात कसे राहू शकतील, याची कल्पना येईल. हैदराबादपासून 17 किमी अंतरावर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. ‘नांदी’ असं असं या प्रकल्पाचं नाव आहे. तब्बल 36 एकरांमध्ये हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रक्लपामधील 6.5 एकर जमीनीवर शेती केली जाते. सोबतच 73 फार्म युनिट्सचा समावेश करण्यात आला आहे.

प्रकल्पात खास काय?

या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पाहून तुमच्या लक्षात येईल की, यामध्ये तुम्ही ग्रामीण जीवनशैलीचा पूर्णपणे आनंद घेऊ शकता. या प्रकल्पात हर्बल गार्डन, सामूहिक शेती (कलेक्टिव फार्मिंग), वैयक्तिक शेती (पर्सनल फार्मिंग), गोशाळा, जिम, कुंभारकाम, जैव-पूल, क्लब हाऊस, गेस्ट रूम, तलाव, कम्युनिटी इवेंट्स, सोशल इवेंट्स आणि बोर्ड गेम्सची सुविधा आहे.

हा प्रकल्प उभारताना या तिघांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. इकॉनॉमिक टाइम्सच्या म्हणण्यानुसार आता त्यांची कंपनी 40 कोटींपेक्षा जास्त व्यवसाय करीत आहे. येथील रहिवासी येथे भाज्या पिकवतात आणि सौरऊर्जेद्वारेही वीजेची निर्मिती केली जाते. यासह, हा प्रकल्प लोकांच्या जीवनशैलीत बदल करीत आहे, तसेच पर्यावरणालाही त्याचा फायदा होत आहे.

हेही वाचा

मोबाईलवरून दररोज पाठवता येणार 18 लाख रुपये; ‘या’ बँकेची नवी सुविधा

एक छोटीशी सुरुवात आणि 2.50 लाख तुमच्या खिशात, डबल फायद्याचा आहे ‘हा’ बिझनेस

ना रोटेशनल शिफ्ट, ना टार्गेटचं टेन्शन! घरबसल्या सुरू करा ‘हा’ व्यवसाय, व्हाल लखपती

(Know about Community living business in which 3 people started Naandi project for life with nature)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.