ना रोटेशनल शिफ्ट, ना टार्गेटचं टेन्शन! घरबसल्या सुरू करा ‘हा’ व्यवसाय, व्हाल लखपती

ना रोटेशनल शिफ्ट, ना टार्गेटचं टेन्शन! घरबसल्या सुरू करा 'हा' व्यवसाय, व्हाल लखपती
business idea

रूफटॉप फार्मिंग (Rooftop Farming) किंवा किचन गार्डनचा पर्याय घर बसल्या कमाई करण्याचा एक उत्तम पर्याय आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Feb 15, 2021 | 12:32 PM

मुंबई : जर तुम्ही दिवसभर घरी बसून असाल आणि काही व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, रूफटॉप फार्मिंग (Rooftop Farming) किंवा किचन गार्डनचा पर्याय घर बसल्या कमाई करण्याचा एक उत्तम पर्याय आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही घरी राहूनही छतावर शेती करू शकता. इतकंच नाही तर कुटुंबासाठीही तुम्हाला शुद्ध भाज्या आणि फळं मिळतील. यातून पैसा कमावण्याचीही चांगली संधी आहे. (business idea rooftop farming is good idea for business here know about good income from home)

छतावरील शेती ही कमी गुंतवणुकीत जास्त नफा देणारी आहे. यामध्ये तुम्हाला छतावर भाज्या उगवाव्या लागतील आणि जर तुम्ही यामध्ये काही वेगळं शेतीचं तंत्र वापरलं तर तुम्ही कमी पाणी आणि कमी मातीशिवाय ही शेती करू शकता. सध्या लोक महागड्या भाज्या आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञानानं फळं पिकवतात, ज्याचा बाजारभावही जास्त आहे. त्यामुळे घरी भाज्या पिकवणं आरोग्यासाठीही चांगलं आहे.

कशी कराल छतावर शेती ?

छतावर शेती करण्यासाठी फार काही तंत्रज्ञान वापरण्याची गरज नाही. छतावर मर्यादित जागा असते त्यामुळे इथे तुम्ही भाज्या पिकवण्यासाठी हायड्रोपोनिक शेतीचा वापर करू शकता. हे एक इस्त्रायली तंत्र आहे. भाजीपाला पिकवण्यासाठी मातीची आवश्यकता नसते, परंतु केवळ पाण्यानेच त्याची लागवड करता येते.

या शेतीतून तुम्ही महागड्या भाज्या आणि फळांची लागवड करू शकता. यामध्ये एका वर्षात तब्बल 2 लाख रुपये कमवण्याची संधी तुम्हाला आहे. एक लाखात 400 झाडं लावण्याची प्रणाली आहे. यामध्ये दोन मीटर उंच टॉवरवर 35 ते 40 रोपं लावली जाऊ शकतात. असे तुम्ही 400 वनस्पती असलेले 10 टॉवर्स खरेदी करू शकता.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्यवसायाला मोठं करण्यासाठी तुम्ही याची जाहिरातही करू शकता. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यवसायाचं मार्केटिंग करणं सध्या सगळ्यात सोपं आहे. यामध्ये खर्चही कमी आहे. असं केल्याने कमी मेहनतीमध्ये जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं. (business idea rooftop farming is good idea for business here know about good income from home)

संबंधित बातम्या – 

गुजरात फिरताना मिळाली बिझनेस आयडिया, आता कोटींची उलाढाल करतेय ‘ही’ तरुणी

Business Idea : फक्त 50 हजारात सुरू करा व्यवसाय, महिन्याला भरभरून कमवाल

नोकरी सोडून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, रोज कमवाल 4000 रुपये

बचत खात्यात महिन्याला जमा करा फक्त 1 रुपया, 2 लाखांचा होईल फायदा

(business idea rooftop farming is good idea for business here know about good income from home)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें