AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुजरात फिरताना मिळाली बिझनेस आयडिया, आता कोटींची उलाढाल करतेय ‘ही’ तरुणी

खरंतर, सध्या लोकं नोकरी सोडून बिझनेस करण्याच्या मागे आहेत. अशात उत्तम बिझनेस आयडीया असणंही महत्त्वाचं आहे. अशीच एक बिझनेस आयडीया एका तरुणीने अशी काही पूर्ण केली की आज यातून तिने लाखोंची कमाई केली आहे.

गुजरात फिरताना मिळाली बिझनेस आयडिया, आता कोटींची उलाढाल करतेय 'ही' तरुणी
| Edited By: | Updated on: Feb 08, 2021 | 12:50 PM
Share

नवी दिल्ली : नोकरी सोडून यशस्वीरित्या बिझनेस साकारणारे अनेक तरुण-तरुणी आपण पाहिले आहेत. असे अनेक दिग्गज आहेत ज्यांची कहानी आणि मेहनत आपल्याला नेहमीच प्रेरणा देते. आताही अशीच एक बातमी समोर आली आहे. खरंतर, सध्या लोकं नोकरी सोडून बिझनेस करण्याच्या मागे आहेत. अशात उत्तम बिझनेस आयडीया असणंही महत्त्वाचं आहे. अशीच एक बिझनेस आयडीया एका तरुणीने अशी काही पूर्ण केली की आज यातून तिने लाखोंची कमाई केली आहे. (Business Idea zouk success story how disha singh got this idea for business)

ही कहानी दिशा सिंगची आहे जी एका फिरण्यासाठी एका ट्रिपला गेली असता तिला बिझनेस आयडीया आली आणि त्याच कल्पनांनी तिने तिचा व्यवसाय सुरू केला. तिच्या या बिझनेस इतका चांगला चालला की आता आता तिच्या कंपनीची उलाढाल कोट्यवधीपर्यंत पोचली आहे.

कशी आली बिझनेस आयडिया ?

दिशा सिंहने आयआयएम अहमदाबाद इथं शिक्षण घेतलं आहे. ती जेव्हा दुसऱ्या वर्षाला होती तेव्हा ती कच्छला फिरण्यासाठी गेली होती. तिथे लोकल हस्तकलेला (handicrafts) एक्सप्लोअर करण्याची एक आयडिया तिला सुचली. यावरच तिने एक व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. हरस्टोरीने दिलेल्या माहितीनुसार, तिने यानंतर 2016 मध्ये Zouk च्या माध्यमातून बॅग, पर्स आणि इतर सामानाला क्राफ्ट करत आधुनिक आणि आकर्षक बनवण्याचा निर्मण घेतला.

म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तिने गुजरातमध्ये विकायला असलेल्या क्राफ्टच्या सामानाला नव्या पद्धतीने आणि नव्या डिझाइनसह विकण्यास सुरूवात केली. यामध्ये तिच्या एक बाब लक्षात आली की तिचे सामान परदेशी ब्रँडसारखे आहे आणि त्यामुळे तिने आणखी वस्तू बनवण्यास सुरुवात केली. यामध्ये खादी आणि इत्यादींनी बनवलेल्या पिशव्यांचे कामही सुरू झालं.

तिने सगळ्यात आधी या बिझनेसमध्ये तब्बल 20 लाख रुपयांची गुंतवणूक केली. यानंतर तिने 2017 मध्ये जॉकचं पहिलं उत्पादन लॉन्च केलं आणि त्याची 50 हून अधिक प्रदर्शनांमध्ये मांडलं होतं. यानंतर तिने या व्यवसायाला ऑनलाईन सुरू केलं. यामुळे तिच्या व्यवसायाला एक वेगळीच गती आली. आज, दिशासोबत अनेक लोक काम करत असून तिच्या उत्पादनास मोठी मागणी आहे. अधिक माहितीनुसार. या व्यवसायामध्ये तिच्या कंपनीची 5 कोटींहून अधिक उलाढाल झाली असल्याचं बोललं जात आहे. (Business Idea zouk success story how disha singh got this idea for business)

संबंधित बातम्या – 

फक्त 5 लाखांमध्ये सुरू करा ‘हा’ बिझनेस, दर महिना कमवाल 70,000 रुपये

Business Idea : फक्त 50 हजारात सुरू करा व्यवसाय, महिन्याला भरभरून कमवाल

नोकरी सोडून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, रोज कमवाल 4000 रुपये

घर बसल्या परदेशात सुरू करा व्यवसाय, ‘या’ गोष्टी केल्या तर बक्कळ पैसा कमवाल

Special Story : कमी वेळेत गुंतवणुकीचे असे 6 पर्याय ज्यातून बक्कळ कमवाल

फक्त 50 हजार लावून कमवा 2.50 लाख, आताच सुरू करा डबल फायदा असलेला ‘हा’ बिझनेस

(Business Idea zouk success story how disha singh got this idea for business)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.