AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घर बसल्या परदेशात सुरू करा व्यवसाय, ‘या’ गोष्टी केल्या तर बक्कळ पैसा कमवाल

खास म्हणजे या व्यवसायासाठी तुम्हाला कसलीही गुंतवणूक करण्याची गरज नाही आणि तुम्ही सध्या केलेल्या गुंतवणूकीमध्येच तुम्ही परदेशात व्यवसाय वाढवू शकता.

घर बसल्या परदेशात सुरू करा व्यवसाय, 'या' गोष्टी केल्या तर बक्कळ पैसा कमवाल
| Edited By: | Updated on: Jan 11, 2021 | 6:53 PM
Share

नवी दिल्ली : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे लोक आता नोकऱ्या सोडून व्यवसायाकडे वळले आहेत. अशात अनेकजण हे परदेशात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असतात. यामुळे परदेशात व्यवसाय सुरू करण्याचा आम्ही एक उत्तम पर्याय तुम्हाला सांगणार आहोत. ज्याने तुम्ही कमी दिवसांत चांगला नफा कमवू शकता. सगळ्यात खास म्हणजे या व्यवसायासाठी तुम्हाला कसलीही गुंतवणूक करण्याची गरज नाही आणि तुम्ही सध्या केलेल्या गुंतवणूकीमध्येच तुम्ही परदेशात व्यवसाय वाढवू शकता. जर तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही हा व्यवसाय कमी गुंतवणूकीने सुरू करू शकता आणि त्याची भारत सोडून इतर देशांमध्ये निर्यात करू शकता. (business idea know how start your business and sale product in other countries)

यासाठी, तुम्हाला फक्त काही वस्तूंची विक्री सुरू करावी लागेल ज्याची परदेशामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यासाठी तुम्हाला भारतासारखा नाही तर परदेशी ग्राहकांच्या हिशोबाने व्यवसाय करावा लागेल. जसं की आता भारतातल्या अनेक हस्तकलेच्या वस्तूंची परदेशात मोठी मागणी आहे. त्यामुळे भारतातून या वस्तू तुम्ही परदेशात विकू शकता. कारण बाहेर अशा वस्तूंची चांगली किंमत मिळते.

कसा कराल तुम्ही व्यवसाय?

जर तुम्हालाही परदेशात व्यवसाय सुरू करायचा असेल तर ऑनलाईन वेबसाईटद्वारे तुम्ही वस्तूंची विक्री करू शकता. यासाठी Ebay.com हे एक उत्तम व्यासपीठ आहे. इथे तुम्हाला फक्त खातं तयार करून वस्तूंचे फोटो आणि माहिती किंमतीसह अपलोड करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला ऑर्डर मिळण्यास सुरुवात होईल. ऑर्डरनुसार तुम्ही माल त्या देशात पाठवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणये यामध्ये खूप बचत आहे आणि कमी विक्री झाली तरीही तुम्ही चांगला नफा मिळवू शकता.

कोणीही उघडू शकतं खातं?

ईबेद्वारे व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणीही खातं उघडू शकतं आणि व्यवसाय करू शकतं. यासाठी अगदी सोप्या पद्धतीने आयडी उघडावा लागेल. या विक्रीमधून तुम्हाला मिळालेली फी ईबेवर देखील भरावी लागणार आहे. त्यानुसार पुढे तुमचा माल विकला जाईल.

कोणती कागदपत्रं आहेत महत्त्वाची ?

तुम्हालाही यामध्ये व्यवसाय करायचा असल्यास काही महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता आहे. परदेशात माल पाठवण्यासाठी तुम्हाला आधी कंपनी आणि जीएसटीची नोंदणी करावी लागेल. यासाठी चालू खातं उघडणं आणि सीमाशुल्क विभागाकडून निर्यात परवाना मिळवणं महत्त्वाचं आहे. (business idea know how start your business and sale product in other countries)

संबंधित बातम्या – 

सॉवरेन गोल्डमध्ये स्वस्तात करा गुंतवणूक आणि मिळवा जास्त रिटर्न, ‘ही’ आहे शेवटची तारीख

अ‍ॅक्सिस बँकेचं ग्राहकांना मोठं गिफ्ट, वेळेआधी FD बंद केली तर नाही लागणार दंड

(business idea know how start your business and sale product in other countries)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.