सॉवरेन गोल्डमध्ये स्वस्तात करा गुंतवणूक आणि मिळवा जास्त रिटर्न, ‘ही’ आहे शेवटची तारीख

सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे यामध्ये जास्त अधिक परतावा मिळू शकतो.

सॉवरेन गोल्डमध्ये स्वस्तात करा गुंतवणूक आणि मिळवा जास्त रिटर्न, 'ही' आहे शेवटची तारीख

नवी दिल्ली : सोने हे गुंतवणूकीसाठी अत्यंत सुरक्षित मानलं जातं. सोन्यात गुंतवणूक करणं हा नफ्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा पर्याय आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला सराफा दुकानात जाण्याचीही गरज नाही. कारण आता व्हर्च्यूअलीही तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता. याला सॉवरेन गोल्ड बाँड असं म्हणतात. यामध्ये चांगला परतावाही मिळतो. सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे यामध्ये जास्त अधिक परतावा मिळू शकतो. (Investment News sovereign gold bonds open for subscription today key things to know before investing)

दिल्लीतल्या लक्ष्मीनगरस्थित गुंतवणूक मंत्रालयाचे संचालक सीए अमित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिजिकल गोल्डपेक्षा हा चांगला पर्याय आहे. आता राहिला प्रश्न सोनं शुद्ध आणि खरं असण्याचा तर सॉवरेन गोल्ड इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आहे. त्यामुळे त्याच्या शुद्धतेबद्दल मनात प्रश्न येण्याचं काही कारणच नाही.

मॅच्यॉरिटीपर्यंत कुठलाही कर आकारला जाणार नाही

सीए अमित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोवरन गोल्ड बाँडमध्ये तीन वर्षानंतरच लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आकारतं. म्हणजेच मॅच्यॉरिटीपर्यंत कोणताही भांडवली नफा कर घेतला जाणार नाही. पण यामध्ये तुम्ही कर्जही घेऊ शकता. कर्ज घेण्यासाठीदेखील हा एक उत्तम पर्याय आहे.

जानेवारी 15 पर्यंत आहे संधी

तुम्हाला जर सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याकडे 11 ते 15 जानेवारीपर्यंत संधी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, सॉवरेन गोल्ड बाँडसाठी सोन्याची किंमत प्रति ग्रॅम 5,104 रुपये इतकी ठरवण्यात आली आहे. तर सोवरन गोल्ड बाँड योजना 2020-21-एक्स सिरिज 11 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यानच खुली असणार आहे. त्यानंतर कोणाचेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट

फायनान्शियल एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, आरबीआयच्या सल्ल्याने सरकारने ऑनलाईन अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांना या किंमतीवर 50 रुपये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये, पैसे हे डिजिटल मोडद्वारे घेतले जाता. यामुळे गुंतवणूकदारांसाठी सोन्याच्या बाँडची किंमत प्रति ग्रॅम 5,054 रुपये असेल.

इथे खरेदी करा गोल्ड बाँड

सॉवरेन गोल्ड बाँड योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक ग्राहकाला अर्जासह पॅनकार्ड देणं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता. पण अशा योजनेत गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. (Investment News sovereign gold bonds open for subscription today key things to know before investing)

संबंधित बातम्या – 

अ‍ॅक्सिक बँकेचं ग्राहकांना मोठं गिफ्ट, वेळेआधी FD बंद केली तर नाही लागणार दंड

Alert | ATM कार्ड वापरताय ?, मग SBI ने सांगितलेल्या ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

(Investment News sovereign gold bonds open for subscription today key things to know before investing)

Published On - 4:52 pm, Mon, 11 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI