आदित्य मित्तल कोण आहेत?; जगातील सर्वात मोठ्या स्टील कंपनीची सूत्रे हाती घेणार

| Updated on: Feb 12, 2021 | 7:41 AM

जगातील सर्वात मोठ्या ArcelorMittal या स्टील कंपनीची सूत्रे एका तरुण उद्योजकाच्या हाती जाणार आहेत. (Aditya Mittal will be the New CEO of ArcelorMittal )

आदित्य मित्तल कोण आहेत?; जगातील सर्वात मोठ्या स्टील कंपनीची सूत्रे हाती घेणार
Follow us on

नवी दिल्ली: जगातील सर्वात मोठ्या ArcelorMittal या स्टील कंपनीची सूत्रे एका तरुण उद्योजकाच्या हाती जाणार आहेत. कंपनीचे फायनान्स चीफ आदित्य मित्तल यांना नवीन सीईओ म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ते त्यांचे वडील लक्ष्मी निवास मित्तल यांची जागा घेतील. लक्ष्मी मित्तल आता कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहणार आहेत. (Aditya Mittal will be the New CEO of ArcelorMittal )

ArcelorMittal कंपनीत मित्तल कुटुंबाची 35 टक्के भागीदारी आहे. लक्ष्मी निवास मित्तल यांनी 1976मध्ये कंपनी सुरू केली होती. आदित्य यांनी 1997 मध्ये कंपनीचे कामकाज पाहणे सुरू केले होते. तेव्हापासून त्यांनी कंपनीच्या विविध फिल्डमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. सध्या त्यांच्याकडे कंपनीच्या प्रेसिडेंट आणि चीफ फायनान्शियल ऑफिसर पदाची जबाबदारी होती. ते 45 वर्षाचे आहेत.

भारतात जन्म, इंडोनेशियात बालपण

आदित्य यांचा जन्म 22 जानेवारी 1976मध्ये झाला होता. त्यांचा जन्म भारतात झाला. मात्र, बालपण इंडोनेशियात गेलं. त्यांनी जकार्ता इंटरनॅशनल स्कूलमधून हायस्कूलपर्यंतचं शिक्षण घेतलं. ते अर्थशास्त्राचे पदवीधर आहेत. अमेरिकेच्या पेनसिलवेनियाच्या व्हॉर्टन स्कूलमधून त्यांनी अर्थशास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर 1997मध्ये त्यांनी कुटुंबाच्या व्यवसायात प्रवेश केला. तेव्हापासून त्यांनी कंपनीत मोठं योगदान दिलं आहे.

20 टक्के कामगार कपात करणार

आदित्य यांनी पद सांभाळताच काही मोठे निर्णय घेतले आहेत. कंपनीत 1 अब्ज डॉलर कॉस्ट कटिंग करण्यात येणार आहे. त्यानुसार कंपनीतून 20 टक्के कामगारांची कपात करण्यात येणार आहे. सध्या कंपनीत 1 लाख 90 हजार कामगार काम करत आहेत. ही कपात येत्या दोन वर्षात करण्यात येणार आहे. त्याशिवाय उत्पादन वाढवण्याचा आणि कॉन्ट्रॅक्टरची संख्या कमी करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

फॉर्च्यूनच्या यादीत

सध्या ते कंपनीचे विद्यमान ग्लोबल चीफ फायनान्शिअल ऑफिसरही असून कंपनीचे यूरोपमधील सीईओ सुद्धा आहेत. 2009मध्ये फॉर्च्यून मॅगझीनने “40 under 40” च्या यादीत त्यांचा समावेश केला होता. त्यात ते चौथ्या क्रमांकावर होते. त्यांनी मेघा मित्तल यांच्याशी विवाह केला आहे. मेघा या जर्मन फॅशन कंपनी Escada च्या मालकीन होत्या. त्यांची प्री-वेडिंग कोलकाता येथे व्हिक्टोरिया मेमोरिअलमध्ये झाली होती. त्यात अभिनेता शाहरुख खानने परफॉर्म केला होता.

ग्लोबल बिझनेस लीडर

जानेवारी 2008मध्ये त्यांची यूरोपियन बिझनेस लीडर ऑफ द फ्यूचर म्हणून निवड झाली होती. (Aditya Mittal will be the New CEO of ArcelorMittal )

 

संबंधित बातम्या:

Special Report : दोन दिवसांच्या वाढीनंतर सोन्याचे भाव घसरले, जाणून घ्या तोळ्याचा भाव

आता स्पर्श न करता काढा एटीएममधून पैसे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

मोदी सरकार ‘या’ कंपनीला देणार 100 कोटी, हजारो कर्मचाऱ्यांना थेट फायदा

(Aditya Mittal will be the New CEO of ArcelorMittal )