आता स्पर्श न करता काढा एटीएममधून पैसे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

आता तुम्ही एटीएम मशिनला स्पर्श न करताही पैसे काढू शकणार आहात. (Withdraw Money Contactless from ATM)

आता स्पर्श न करता काढा एटीएममधून पैसे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
एटीएम
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 6:29 PM

नवी दिल्ली : तंत्रज्ञान क्षेत्रात दररोज नवनवे बदल होत आहेत. यानुसार आता तुम्ही एटीएम मशिनला स्पर्श न करताही पैसे काढू शकणार आहात. कोरोनानंतर अनेक बँकांतर्फे Contactless Transaction ची सुविधा देणे सुरु करण्यात आली आहे. मात्र अद्याप ही सुविधा पूर्णपणे Contactless झालेली नाही. सध्या यात मानवी शरीराचा स्पर्श (Human body touch) गरजेचा आहे. पण लवकरच ही सुविधा सर्व बँकांमध्ये लागू केली जाण्याची शक्यता आहे. (Withdraw Money Contactless from ATM)

नुकतंच एटीएमच्या मास्टरकार्डने AGS ट्रान्झेक्ट टेक्नॉलॉजी (AGS Transact Technologies) सोबत करार केला आहे. या करारानुसार आता युजर्सला 100 टक्के Contactless Transaction ची सुविधा मिळणार आहे. हे कार्ड मिळण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजीटल असणार आहे. यासाठी युजर्सला मोबाईल अॅपद्वारे एटीएम मशीनचा क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे.

यानंतर युजर्सला फोनवर डेबिट कार्डचा नंबर आणि पैसे काढण्याची रक्कम टाकावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर एटीएमद्वारे तुमचा व्यवहार पूर्ण करण्यात येईल आणि नंतर मशीनद्वारे तुम्हाला पैसे मिळतील.

आतापर्यंतच्या अनेक Contactless Transaction सुविधेत युजर्सला पैसे आणि एटीएम पिन टाकण्यासाठी मशीनला स्पर्श करावा लागत होता. मात्र आता क्यूआर कोड स्कॅन करुन एटीएम मशीनवरील सर्व पर्याय तुम्हाला मोबाईलमध्ये पाहता येणार आहे. यानंतर तुम्ही जी प्रक्रिया स्क्रीनवर करता तीच करायची आहे. ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर एटीएमद्वारे तुम्हाला पैसे मिळतील.

एटीएम फसवणुकीला आळा

दरम्यान ज्या बँका मास्टरकार्ड नेटवर्क एटीएम कार्ड वापरतात त्यांना AGS कंपनीला संपर्क करु शकतात. या कंपनीचे मुख्य तांत्रिक अधिकारी महेश पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएमच्या Contactless Transaction मुळे अनेक फसवणुकीला आळा बसेल. गेल्या दोन वर्षांपासून या प्रोजेक्टवर काम सुरु आहे. कोरोनाच्या पूर्वीपासून या टेक्नोलॉजीवर काम करत होतो. आमचा हेतू एटीएम फसवणुकीला आळा घालणे हा आहे.

बँक ऑफ बडोदामध्ये Contactless सुविधा 

बँक ऑफ बडोदा ही AGS टेक्नोलॉजीसोबत काम करणारी पहिली बँक ठरली आहे. यापूर्वी या बँकेची सेवा ही पूर्णपणे Contactless नव्हती. मात्र आता पैसे काढण्याचेी सुविधा 100 टक्के Contactless झाली आहे. जर कोणत्याही बँकेला या सुविधेसोबत काम करायचे असेल, तर त्यांना सॉफ्टवेअर अपडेट करावे लागले. त्यासोबतच ATMच्या स्विचमध्येही काही बदल करावे लागतील. (Withdraw Money Contactless from ATM)

संबंधित बातम्या : 

मोदी सरकार ‘या’ कंपनीला देणार 100 कोटी, हजारो कर्मचाऱ्यांना थेट फायदा

मास्टरकार्डच्या नेटवर्कवरून क्रिप्टोकरन्सी खरेदी करण्याची संधी

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.