अंबानी यांच्या ‘वंतारा’ चा महागडा आईस्क्रीम बँड, एका चमच्याची किंमत ऐकून येईल चक्कर

देशच काय तर आशियातील श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांनी आता आईस्क्रीम बँडमध्ये एन्ट्री केली आहे. या आईस्क्रीमला वंतारा क्रीमरी असे नाव देण्यात आले आहे. अत्यंत खास दूधाने ते तयार केले जात असून त्याची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्या पलिकडे आहे.

अंबानी यांच्या वंतारा चा महागडा आईस्क्रीम बँड, एका चमच्याची किंमत ऐकून येईल चक्कर
Vantara Creamery
| Updated on: May 19, 2026 | 7:46 PM

देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांच्या कुटुबियांकडे देशाचे लक्ष असते. आता अंबानी कुटुंबियांनी अचानक आईस्क्रीमच्या बिझनसमध्ये प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी तयार केलेल्या अंबानी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट ‘वंतारा’ अचानक फूड बिझनसमध्ये उतरुन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. मुंबईच्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह येथे ‘वंतारा क्रीमरी (Vantara Creamery)’ नावाच्या एका लक्झरी बँडचे लाँचिंग झाले आहे. ज्याची किंमत ऐकून सर्वसामान्य माणसांचे तोंडचे पाणी पळेल. या आईस्क्रीमच्या एका चमच्याची ( स्कूप) किंमत ७५० रुपयांनी सुरु होऊन १००० रुपयांपर्यंत आहे.

अॅनिमल वेल्फेअर सेंटर वा कमर्शियल डेअरी?

वास्तविक, सामान्य गाईंच्या तुलनेत गीर गायीचे ( एक शुद्ध भारतीय प्रजात ) A2 दूध प्रमाणात कमी आणि गुणवत्ते घट्ट आणि पोषक असते. वंतारा क्रीमरीचा दावा आहे की ते कोणत्याही सर्वसामान्य दूध वा मिल्क पावडरचा वापर करत नाहीत. तर जामनगरच्या फॅसिलिटीमध्ये रेस्क्यू केलेल्या आणि नैसर्गिक गवत चरणाऱ्या गीर गायींचे १०० टक्के शुद्ध आणि ऑर्गेनिक A2 दूधापासून हे उच्च प्रतीचे आईस्क्रीम तयार करतात. या दुर्लभ आणि प्रीमियम बेस इंग्रीडिएंटचा खर्च जास्त आणि मर्यादित उपलब्धता आणि स्मॉल बॅच मॅन्युफॅक्चरिंगमुळे या आईस्क्रीमचे दर गगनाला भिडणारे आहेत.

मेन्यूचा विचार करता कंपनीने मलाई कुल्फी, फिल्टर कॉफी आणि केसर पेढा सारख्या १७ पारंपारिक भारतीय पदार्थांची निवड केली आहे. यांना चार वेगवेगळ्या श्रेणीत वाढले जाते. या पदार्थांना तयार करण्यासाठी कोणताही शॉर्टकट वापरला जात नाही. न कोणता कृत्रिम फ्लेव्हर, न प्रिझर्वेटिव्ह , न वनस्पती तेल. या पदार्थांना जुन्या काळातील प्रथेप्रमाणे अगदी निगुतीने तयार केले जाते.

ब्रँड व्हॅल्युने वाढली किंमत

आईस्क्रीमचे शौकीन आणि मार्केट एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार ७५० रुपये एका स्कूपची किंमत ही सामुग्री पेक्षा ‘अंबानी’ ब्रँड नेम आणि त्याची एक्सक्लूसिविटीची किंमत आहे. कोणत्याही भेसळी शिवाय शुद्ध आईस्क्रीम भारताच्या अनेक भागात खूप स्वस्तात मिळत असते. परंतू वंताराने यास एक ‘स्टेटस सिंबल’ बनवून सादर केले आहे.

हे लोकप्रिय ब्रँडही शुद्ध सामुग्री वापरतात, पण…

Iceberg Organic Ice Cream हा एक खूप लोकप्रिय ब्रँड असून तो १०० टक्के A2 दूध आणि जैविक धागा खडीसाखरेचा वापर करतो. याच्या १२५ एमएल कपची किंमत सुमारे १३० ते १५० रुपये आहे. तसेच Highland Farms हा ब्रँड देखील ऑर्गेनिक A2 मिल्क प्रोडक्ट्ससाठी ओळखला जातो. यांच्या विशिष्ट पारंपारिक पद्धतीने तयार केलेल्या A2 मिल्क कुल्फीचा पॅक ३८० रुपयांना मिळतो.

Follow Us