अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपमधील ‘या’ कंपनीचा 2887 कोटींना सौदा?

| Updated on: Jun 16, 2021 | 10:39 AM

एथॅम इन्व्हेस्टमेंट अँण्ड इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेड सुरुवातीला 90 टक्के म्हणजे 2,587 कोटी रुपये जमा करेल. त्यानंतर उर्वरित 300 कोटींची रक्कम वर्षभरात टप्प्याटप्याने जमा केली जाईल. | relaince home finance

अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपमधील या कंपनीचा 2887 कोटींना सौदा?
अनिल अंबानींना मोठा झटका
Follow us on

मुंबई: कर्जाच्या बोझ्यामुळे बिकट अवस्थेत सापडलेले उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या रिलायन्स होम फायनान्स कंपनीला खरेदीदार मिळाल्याची माहिती समोर येत आहे. एथॅम इन्व्हेस्टमेंट अँण्ड इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेडने (Authum Investment and Infrastructure) रिलायन्स होम फायनान्स कंपनी खरेदी करण्यासाठी 2,887 कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शविली आहे. हा व्यवहार अंतिम टप्प्यात असून लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा होऊ शकते. (Authum Investment and Infrastructure place a highest bid for Anil Ambani relaince home finance aquistion)

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहावर बँकांचे हजारो कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे हा व्यवहार पार पडल्यास बँक ऑफ बडोदाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाला 2,887 कोटी रुपये मिळतील. सूत्रांच्या माहितीनुसार, एथॅम इन्व्हेस्टमेंट अँण्ड इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेड सुरुवातीला 90 टक्के म्हणजे 2,587 कोटी रुपये जमा करेल. त्यानंतर उर्वरित 300 कोटींची रक्कम वर्षभरात टप्प्याटप्याने जमा केली जाईल.

रिलायन्स होम फायनान्सच्या लिलाव प्रक्रियेला 31 मे रोजी सुरुवात झाली होती. येत्या 19 जूनला ही प्रक्रिया संपुष्टात येत आहे. बँकांच्या समूहाकडून ही लिलाव प्रक्रिया राबवण्यात आली होती. अनेक बड्या कंपन्यांनी रिलायन्स होम फायनान्स विकत घेण्यासाठी बोली लावली होती. मात्र, यामध्ये एथॅम इन्व्हेस्टमेंट अँण्ड इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेडचा प्रस्ताव सर्वांच्या पसंतीस उतरल्याचे समजते. एथॅम इन्व्हेस्टमेंट अँण्ड इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेड ही बिगरबँकिंग वित्तीय संस्था आहे. गेल्या 15 वर्षापासून ही कंपनी या क्षेत्रात कार्यरत आहे. या कंपनीचे नेटवर्थ 1500 कोटींच्या आसपास आहे.

रिलायन्स इन्फ्रावरील कर्जाचा बोजा कमी होणार

अनिल अंबानी समूहातील रिलायन्स पॉवर या कंपनीकडून Reliance Infrastructure कंपनीला 1325 कोटी रुपयांचे शेअर्स आणि वॉरंट जारी करण्यात येणार आहेत. यामध्ये 59.5 कोटी प्रिफेन्शियल शेअर्सचा समावेश आहे. रिलायन्स पॉवरकडून रविवारी शेअर बाजार नियमकांना याबद्दलची माहिती देण्यात आली.

13 जून रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रिलायन्स पॉवर 10 रुपयांच्या इश्यू प्राईसने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला 59.5 कोटी इक्विटी शेअर्स देईल. तसेच 73 कोटी रुपयांचे वॉरंटसही इश्यू करण्यात आले आहेत. त्यामुळे रिलायन्स पॉवरच्या डोक्यावरीक कर्जाचा भार 1325 कोटी रुपयांनी कमी होणार आहे. चालू आर्थिक वर्षात रिलायन्स पॉवरचे एकत्रित कर्ज 3200 कोटी रुपयांपर्यंत कमी होणार आहे. तसेच नव्या समभागांमुळे रिलायन्स पॉवर कंपनीत रिलायन्स इन्फ्रा आणि अन्य प्रवर्तकांची भागीदारी 25 टक्क्यांपर्यंत वाढेल. रिलायन्स इन्फ्राच्या आठ लाख शेअरधारकांना याचा फायदा मिळणार आहे.

 

इतर बातम्या:

रिलायन्स इन्फ्रावरील कर्जाचा बोजा कमी होणार, रिलायन्स पॉवर 1325 कोटींचे शेअर्स, वॉरंट जारी करणार

शेअर बाजार नियमकांची मोठी कारवाई; अदानी ग्रूपच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव कोसळले

अंबानी VS अदानी : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तुलनेत 2 महिन्यांच्या कालावधीत अदानी एंटरप्रायजेसचा शेअर्स 6 पट वाढला, गुंतवणूकदार झाले श्रीमंत

(Authum Investment and Infrastructure place a highest bid for Anil Ambani relaince home finance aquistion)